Karnataka Election 2023 : कर्नाटकातील सर्वात श्रीमंत आमदार होणार का मुख्यमंत्री? संपत्ती 1,413 कोटी रुपये

Karnataka assembly Election result 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे चित्र बऱ्यापैकी स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळाले आहे. आता मुख्यमंत्री कोण होणार? ही चर्चा सुरु झाली आहे. राज्यातील सर्वात श्रीमंत आमदार या चर्चेत पुढे आहे.

Karnataka Election 2023 : कर्नाटकातील सर्वात श्रीमंत आमदार होणार का मुख्यमंत्री? संपत्ती 1,413 कोटी रुपये
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 13, 2023 | 4:13 PM

बंगळुरू : कर्नाटक विधानसभा निवडणूक निकालाचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत सत्ताधारी भाजपचा पराभव झाला आहे. भाजपने आपला पराभव मान्य केला आहे. राज्यात काँग्रेसने बहुमताचा आकडा पूर्ण केला आहे. काँग्रेसने उद्या तातडीने पक्षातील आमदारांची बैठकही बोलवली आहे. आता काँग्रेसचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण असणार? याची चर्चा सुरु झाली आहे. राज्यातील सर्वात श्रीमंत आमदार याच पक्षाचा आहे आणि मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत ते आहेत.

कोण आहे सर्वात श्रीमंत आमदार

काँग्रेसचे नेते डी.के.शिवकुमार यांनी 12 मे रोजी एक ट्वीट केले होते. त्यात त्यांनी मुख्यमंत्री पदासाठी आपण शर्यतीत असल्याचे स्पष्ट केले होते. ते सध्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहे. यामुळे कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील विजयाचे श्रेय त्यांच्यांकडे जाते. त्यांनी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष म्हणून केलेल्या कामांचा आपल्या तीन वर्षांचा कार्यकाळाचा व्हिडिओ ट्रेलर जारी केला होता. ते राज्यातील सर्वात श्रीमंत आमदारही आहे. त्यांनी आपल्या निवडणूक शपथपत्रात दिलेल्या माहितीनुसार त्यांची संपत्ती 1,413 कोटी रुपये आहे.

हे सुद्धा वाचा

d k shivakumar with president kharge

अनेक आरोप, संधी हिरावणार का?

शिवकुमार यांच्यावर अनेक आरोप आहेत. 2019 मध्ये त्यांना मनी लॉन्ड्रींग प्रकरणात अटकही झाली होती. त्यांच्या मागे ED, आयकर विभाग आणि CBI लागली आहे. ED दोन प्रकरणात त्यांची चौकशी करत आहे. त्यातील एक प्रकरण नॅशनल हेराल्डशी संबंधित आहे. उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती जमवल्याच्या प्रकरणात CBI कडून चौकशी सुरु आहे. 2019 मध्ये अटक झाल्यानंतर 50 दिवस ते तिहार तुरुंगात होते.

48 जागांवर प्रभाव

डीके शिवकुमार का म्हैसूर विभागातून येतात. ते वोक्कालिगा कम्युनिटीचे आहेत. या समुदायाचा राज्यातील 48 जागांवर प्रभाव आहे. डी.के. शिवकुमार आव्हान स्वीकारणारे नेतृत्व असून सोनिया गांधी यांची मर्जी राखणारे नेते असल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

देवगौडा यांचा केला होता पराभव

डीके शिवकुमार यांनी 1985 मध्ये पहिली निवडणूक लढवली होती. जेडीएसचे प्रमुख एचडी देवगौडा समोर होते. शिवकुमार यांचा या निवडणुकीत त्यांचा पराभव केला होता. 1989 मध्ये शिवकुमार यांनी पुन्हा निवडणूक लढवली आणि जिंकले. त्याच वर्षी काँग्रेसची सत्ताही आली. 1991-92 मध्ये वयाच्या अवघ्या 30 व्या वर्षी ते मंत्री झाले. त्यानंतर कोणीही निवडणूक हरले नाही.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.