Karnataka Election 2023 : कर्नाटकात ३८ वर्षांत कोणताही पक्ष बनवू शकला नाही सलग दुसऱ्यांदा सरकार

Karnataka assembly Election result 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे चित्र बऱ्यापैकी स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत भाजपला सरकार बनवण्याची संधी मिळणार नाही. यामुळे गेल्या ३८ वर्षांच्या इतिहासाची पुनरावृत्ती होणार नाही, असे चित्र आहे.

Karnataka Election 2023 : कर्नाटकात ३८ वर्षांत कोणताही पक्ष बनवू शकला नाही सलग दुसऱ्यांदा सरकार
Karnataka assembly Election 2023
Follow us
| Updated on: May 13, 2023 | 12:44 PM

बंगळुरू : कर्नाटक विधानसभा निवडणूक निकालाचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. दुपारी १२ वाजेपर्यंतच्या कलानुसार भाजपला सत्तेतून जावे लागणार आहे. राज्यात काँग्रेसने बहुमताचा आकडा पार केला आहे. त्यामुळे काँग्रेसचा स्वबळावर सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निवडणुकीत भाजपचा पराभव होताना दिसत आहे. गेल्यावेळी १०४ जागा जिंकणारा भाजप या निवडणुकीत ६९ जागांवरच आघाडीवर आहे. दुसरीकडे काँग्रेसने १२८ जागांवर आघाडी घेतली आहे. भाजपच्या पराभवास एक कारण गेल्या ३८ वर्षांचा इतिहास आहे.

दुसऱ्यांदा संधी नाही

कर्नाटकातील जनता कोणत्याही पक्षाला सलग दुसऱ्यांदा संधी देत नाही. गेल्या ३८ वर्षांपासून ही परंपरा सुरु आहे. यापूर्वी १९८५ मध्ये रामकृष्ण हेगडे यांना दोन वेळा संधी मिळाली होती. ते 10 जानेवारी 1983 ते 7 मार्च 1985 दरम्यान पहिल्यांदा मुख्यमंत्री होते. त्यानंतर पुन्हा निवडणुका झाल्या. 1985 मधील या निवडणुकीत त्यांना पुन्हा संधी मिळाली. त्यावेळी ते 8 मार्च 1985 ते 13 ऑगस्ट 1988 दरम्यान मुख्यमंत्री होते.

हे सुद्धा वाचा

८४ जागा महत्वाच्या

कर्नाटकमधील २२४ जागांपैकी ८४ जागा अशा आहेत, ज्याठिकाणी आमदारास दुसऱ्यांदा संधी मिळत नाही. या जागाच कर्नाटकमधील सत्ता बदलण्यासाठी सहाय्यक ठरतात. यामुळे यंदाही या जागांमुळे भाजपची सरकार बनवण्याची संधी गेली आहे.

काँग्रेस अलर्ट

कर्नाटकात भाजपकडून ऑपरेशन लोटस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेस अलर्ट झाली आहे. काँग्रेस नेत्यांनी आपले आमदार सुरक्षित ठिकाणी ठेवण्याची व्यवस्था केली आहे. आपले आमदार फुटू नयेत यासाठी ऑपरेशन हस्था सुरु केले आहे. या ऑपरेशन हस्थामध्ये काँग्रेस नेते डीके शिवकुमार, बीके हरिप्रसाद आणि खुद्द मल्लिकार्जुन खरगे आहेत. या ऑपरेशनुसार विजयी उमेदवारांना काऊंटिंग सेंटरवरूनच हेलिकॉप्टरने सुरक्षित ठिकाणी नेण्यात येणार आहे. उद्या दुपारी 12 वाजता काँग्रेसच्या विजयी आमदारांची बैठक होणार आहे. त्यावेळी हे सर्व आमदार हजर राहणार आहेत.

जेडीेएस किंगमेकर नाहीच

एक्झिट पोलच्या निष्कर्षानुसार जेडीएस राज्यात किंगमेकरची भूमिका निभावेल असं वाटत होतं. जेडीएसच्याच हाती सत्तेच्या चाव्या असतील असंही चित्र होतं. मात्र, प्रत्यक्षात मतदारांनी काँग्रेसच्या पारड्यात भरभरून मतदान करत काँग्रेसला सत्तेत बसवलं आहे. त्यामुळे राज्यात जेडीएसच्या हातात सत्तेच्या चाव्या राहणार नसल्याचं दिसत आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.