Karnataka Election 2023 : कर्नाटकात महाराष्ट्र एकीकरण समिती अन् राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा पराभव

Karnataka assembly Election result 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे चित्र बऱ्यापैकी स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळाले आहे. परंतु राज्याचे लक्ष असलेल्या महाराष्ट्र एकीकरण समिती आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व उमेदवारांचा पराभव झाला आहे.

Karnataka Election 2023 : कर्नाटकात महाराष्ट्र एकीकरण समिती अन् राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा पराभव
Follow us
| Updated on: May 13, 2023 | 4:12 PM

बंगळुरू : कर्नाटक विधानसभा निवडणूक निकालाचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत सत्ताधारी भाजपचा पराभव झाला आहे. भाजपने आपला पराभव मान्य केला आहे. राज्यात काँग्रेसने बहुमताचा आकडा पूर्ण केला आहे. काँग्रेसने उद्या तातडीने पक्षातील आमदारांची बैठकही बोलवली आहे. महाराष्ट्राच्या द्दष्टीने सीमावर्ती भागातील निकाल महत्वाचे होते. परंतु सीमावर्ती भागात न शिवसेना ठाकरे गटाचा करिश्मा चालला नाही अन् राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांचीही जादू चालली नाही. या ठिकाणी महाराष्ट्र एकीकरण समिती आणि राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवाराचा दारूण पराभव झाला.

राष्ट्रवादीला नाकारले

राष्ट्रवादीकडून ही निवडणूक गंभीरतेने घेतल्याचे दिसले नाही. शरद पवारांसारखा नेता असूनही त्यांनी कर्नाटकात निपाणी वगळता कोठेही प्रचार केल्याचे दिसले नाही. राष्ट्रवादीचे उमेदवार पुढीलप्रमाणे होते. १. निपाणी (बेळगाव) – उत्तमराव पाटील२. जेवर हिप्पारगी (विजापूर) – मन्सूर साहेब बिलाही ३. बसवन बागेवाडी (विजापूर) – जमीर अहमद इनामदार ४. नागथन (विजापूर) – कुलप्पा चव्हाण ५. येलबर्गा (कोप्पल) – हरी आर ६. रानबेन्नूर (हवेरी) – आर. शंकर ७. हाग्री बोम्मनहल्ली (विजयनगर) – सुगुना के ८. विराजपेट (कोडोगो) – एस. वाय. एम. मसूद फौजदार ९. नरसिंहराज (मैसूर) – रेहाना बानो

हे सुद्धा वाचा

महाराष्ट्र एकीकऱण समितीचे सर्व उमेदवार पराभूत

  • बेळगाव दक्षिणमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचे रमाकांत कोंडुरकर यांना 64487 मते, भाजपचे अभय पाटील 77094 मते
  • बेळगाव उत्तरमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचे अमर येळ्ळूरकर यांना केवळ 6473 मते मिळाली तर काँग्रेसचे आसिफ सैत 48614 मते
  • बेळगाव ग्रामीणमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचे आर. एम. चौगुले यांना 41247 मते तर काँग्रेसचे लक्ष्मी हेब्बीकर 106590 मते
  • निपाणीत महाराष्ट्र एकीकरण समितीचे जयराम मिरजकर यांना केवळ 369 मते तर भाजप शशिकला जोले 72952 मते मिळाली
  • यमकनर्डी मतदार संघातून महाराष्ट्र एकीकरण समितीचे मारुती नाईक यांना 1963 मते तर काँग्रेस सतीश जरखोली यांना 97863 मते
  • खानापूरमधून महाराष्ट्र एकीकरण समितीचे मुरलीधर पाटील यांना 9666 मते, भाजचे विठ्ठल हालगेकर यांना 91775 मते मिळाली.
  • बेळगाव जिल्ह्यातील १८ जागांपैकी ११ जागांवर काँग्रेसने विजय मिळवला तर ७ जागा भाजपने जिंकल्या. भाजपच्या एका बंडखोर उमेदवाराने काँग्रेसच्या तिकिटावर विजय मिळवला.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.