‘सरकार असो सहकार, स्वाहाकार हाच मंत्र’ हीच यांची घोषणा, जयंत पाटलांवर भाजपची जोरदार टीका

पनवेलमध्ये इंजिनिअरिंग कॉलेज उभारण्याच्या नावाखाली सरकारकडून नाममात्र दरात मिळवलेल्या जमिनीचा काही भाग महामार्ग विस्तारीकरणात गेल्यानंतर त्याचा मोबदला संबंधित शिक्षणसंस्थेनं मिळवल्याचं प्रकरण समोर आलंय. महत्वाची बाब म्हणजे ही संस्था राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याशी संबंधित असल्याची माहिती मिळतेय.

'सरकार असो सहकार, स्वाहाकार हाच मंत्र' हीच यांची घोषणा, जयंत पाटलांवर भाजपची जोरदार टीका
केशव उपाध्ये, जयंत पाटील
Follow us
| Updated on: Oct 20, 2021 | 1:56 PM

मुंबई : पनवेलमध्ये इंजिनिअरिंग कॉलेज उभारण्याच्या नावाखाली सरकारकडून नाममात्र दरात मिळवलेल्या जमिनीचा काही भाग महामार्ग विस्तारीकरणात गेल्यानंतर त्याचा मोबदला संबंधित शिक्षणसंस्थेनं मिळवल्याचं प्रकरण समोर आलंय. महत्वाची बाब म्हणजे ही संस्था राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याशी संबंधित असल्याची माहिती मिळतेय. एका वृत्तपत्राने याबाबत बातमी दिली आहे. त्यावरुन आता जोरदार राजकारण रंगताना दिसत आहे. प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी याबाबत ट्वीटरवरुन जयंत पाटील यांच्यावर जोरदार टीका केलीय. (Keshav Upadhyay criticizes NCP state president Jayant Patil over Land Issue in Panvel)

‘दोन्ही हातांनी मिळेल ते लुटायचे हीच तर राज्य सरकारातील मंत्र्याची खासियत. आधी सरकारकडून जमिन घ्यायची मग सरकारनेच अधिग्रहीत केली म्हणून सरकारकडून भरभक्कम मोबदला घ्यायचा. सरकार असो सहकार, स्वाहाकार हाच मंत्र हीच यांची घोषणा’, अशा शब्दात केशव उपाध्ये यांनी जयंत पाटलांवर निशाणा साधलाय.

14 पैकी 2 एकर जमिनीचा 30 पट मोबदला मिळवला!

जयंत पाटली हे रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री असताना 2004 मध्ये या संस्थेला ही जमीन देण्यात आली होती. त्यावर संस्थेनं अजूनही महाविद्यालय उभारलं नाही. मात्र, सरकारकडून मिळालेल्या 14 एकरपैकी दोन एकर जमीन सरकारच्याच भूसंपादनासाठी देऊन संस्थेनं तीसपट मोबदला मिळवल्याची माहिती मिळतेय. पनवेल तालुक्यातील शिराढोण हे गाव आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांचे मूळ गाव आहे. मुंबई-गोवा महामार्गालत कर्नाळा पक्षी अभयारण्याच्या अलीकडे वसलेल्या या गावाची आकारीपड आणि गुरचरण जमीन महामार्गाला लागून आहे.

‘भाजपावर टीका करून सत्य लपत नसते’

दरम्यान, मुंबई ड्रग्स प्रकरणावरुन राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. अल्पसंख्यांक विकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबीसह भाजपवर जोरदार टीका केलीय. मलिकांच्या या टीकेलाही केशव उपाध्ये यांनी पलटवार केलाय. नवाब मलिक मंत्रिपदाचे भान सोडून एनसीबीने अटक केलेल्या आरोपींची वकिली सुरू केल्याचे दिसते. तथापि, मीडिया ट्रायलमध्ये भारतीय जनता पार्टीवर टीका करून कोणी निर्दोष ठरणार नाही आणि सत्यही लपणार नाही. असत्याची कास धरून स्वतःला आरोपी करू नका, असा टोला केशव उपाध्ये यांनी लगावला.

भाजपावर टीका करून आरोपींची सुटका होऊ शकत नाही

अंमलीपदार्थांच्या विरोधात कारवाई करणाऱ्या एनसीबीने एका जहाजावर छापा मारून काहीजणांना पकडले. याबाबत राज्याचे नवाब मलिक पत्रकार परिषदांच्या माध्यमातून मीडिया ट्रायल चालवत आहेत आणि आरोपींना मदत होईल, अशा रितीने तपासी यंत्रणेवर टीका करत आहेत. त्यामध्ये ते पुन्हा पुन्हा भारतीय जनता पार्टीलाही ओढत आहेत. पण अशा रितीने भाजपावर टीका करून आरोपींची सुटका होऊ शकत नाही. त्यासाठी न्यायालयानेच निकाल द्यावा लागतो. तपासी यंत्रणेला सातत्याने न्यायालयासमोर उभे रहावे लागत आहे. भाजपाचे कोणी दोषी असेल तर त्यालाही शिक्षा होईलच, असंही उपाध्ये म्हणाले.

इतर बातम्या :

VIDEO: पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे नितीन गडकरींना भेटल्या, राजकीय चर्चा झाली का?; पंकजांनी दिलं थेट उत्तर

वाजवा रे वाजवा! नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील फटाके विक्री बंदीचा निर्णय अखेर मागे

Keshav Upadhyay criticizes NCP state president Jayant Patil over Land Issue in Panvel

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.