शेतकरी, ST कर्मचाऱ्यांना दिलेल्या आश्वासनपूर्तीसाठी पैसा नसतो, आमदाराच्या माफीसाठी कसा? केशव उपाध्येंचा सवाल

शेतकऱ्यांसाठी पैसे नसतात पण स्वतःच्या आमदाराच्या गैरव्यवहारावर पांघरूण घालण्यासाठी कोट्यवधींची माफी करता. वा रे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray )सरकार, अशा शब्दात उपाध्ये यांनी टीका केलीय.

शेतकरी, ST कर्मचाऱ्यांना दिलेल्या आश्वासनपूर्तीसाठी पैसा नसतो, आमदाराच्या माफीसाठी कसा? केशव उपाध्येंचा सवाल
keshav upadhye
Follow us
| Updated on: Jan 13, 2022 | 2:19 PM

मुंबई: भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी महाविकास आघाडी सरकारवर (MVA) निशाणा साधलाय. नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना तुम्ही कबूल करूनही प्रोत्साहन भत्ता देत नाही. शेतकऱ्यांसाठी पैसे नसतात पण स्वतःच्या आमदाराच्या गैरव्यवहारावर पांघरूण घालण्यासाठी कोट्यवधींची माफी करता. वा रे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray )सरकार, अशा शब्दात उपाध्ये यांनी टीका केलीय. एसटी कामगारांनी तडफडून आत्महत्या केल्या पण तुम्हाला पाझर फुटला नाही. पण स्वतःच्या आमदाराच्या गैरव्यवहारावर पांघरूण घालण्यासाठी थेट मंत्रिमंडळाचा निर्णय घेतला गेल्याचं उपाध्ये म्हणाले. अतिवृष्टी,अवकाळी पाऊस,गारपिटीत सापडलेल्या शेतकऱ्यांना द्यायलापैसा नाही.पण स्वतःच्या आमदाराच्या गैरव्यवहारावर पांघरूण घालायला सरकारी तिजोरीचे कोट्यवधींचे नुकसान.वा रे ठाकरे सरकार, असं केशव उपाध्ये म्हणाले आहेत. अनियमित बांधकामे करा फक्त शिवसेनेचे आमदार असाल की तुम्हाला सगळ माफ हेच उद्धव ठाकरे सरकारच धोरण असल्याचं उपाध्ये म्हणालेत.

केशव उपाध्ये याचं ट्विट

शेतकरी प्रोत्साहन निधीची आठवण

केशव उपाध्ये यांनी ठाकरे सरकावर शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन टीका केलीय. ठाकरे सरकारनं नियमितपणे जे शेतकरी कर्ज भरतील त्यांना प्रोत्साहन निधी देणार असल्याची घोषणा केली होती. त्याची अद्याप अंमलबजावणी करण्यात आलेली नाही, त्यावरुन केशव उपाध्ये यांनी ठाकरे सरकारला सवाल केला आहे. नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना तुम्ही कबूल करूनही प्रोत्साहन भत्ता देत नाही. शेतकऱ्यांसाठी पैसे नसतात पण स्वतःच्या आमदाराच्या गैरव्यवहारावर पांघरूण घालण्यासाठी कोट्यवधींची माफी करता, वा रे ठाकरे सरकार असं केशव उपाध्ये म्हणाले.

एसटी कामगारांच्या प्रश्नी तुम्हाला पाझर फुटला नाही

एसटी कामगारांनी तडफडून आत्महत्या केल्या पण तुम्हाला पाझर फुटला नाही. पण स्वतःच्या आमदाराच्या गैरव्यवहारावर पांघरूण घालण्यासाठी थेट मंत्रिमंडळाचा निर्णय घेण्यात आला, वारे ठाकरे सरकार, असं केशव उपाध्ये म्हणाले.

इतर बातम्या:

MPSC : एमपीएसीची ऑनलाईन अर्जाची वेबसाईट डाऊन, विद्यार्थी हवालदिल, अखेर मुदतवाढ

SDCC Bank Election : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी मनीष दळवी, उपाध्यक्षपदी अतुल काळसेकर

Keshav Upadhye BJP Spoke person slam MVA Uddhav Thackeray Government

Non Stop LIVE Update
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.