केतकी चितळेच्या वादग्रस्त पोस्टमुळे पाथरवट कविता चर्चेत! शरद पवारांनी पाथरवटचा काय दाखला दिला? जाणून घ्या

Ketaki Chitale : पाथरवट या कवितेवर शरद पवारांनी असं नेमकं काय म्हटलं? की ज्यामुळे केतकी चितळे हीनं फेसबुकवर पोस्ट केली, याची चर्चा आता रंगली आहे.

केतकी चितळेच्या वादग्रस्त पोस्टमुळे पाथरवट कविता चर्चेत! शरद पवारांनी पाथरवटचा काय दाखला दिला? जाणून घ्या
नेमकं पवार काय म्हणााले होते?
Follow us
| Updated on: May 14, 2022 | 9:28 AM

मुंबई : अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) वादग्रस्त पोस्टमुळे पुन्हा चर्चेत आली आहे. आता तर तिनं थेट शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर रचलेली एक कविता फेसबुकवरुन शेअर केली. या कवितेमुळे तिची सोशल मीडियावर अनेकांनी खिल्ली उडवली. शरद पवारांचा अपमान करणारी ही कविता असल्याचं म्हणत पवार समर्थकांनी तिच्यावर टीकाही केली. वेगवेगळ्या वादग्रस्त पोस्टमुळे केतकी चितळे (Ketali Chitale Facebook post) नेहमीच चर्चेत असते. मात्र आता ज्या कारणामुळे तिनं पवारांना उद्देशून कविता शेअर केली आहे, त्याचा संदर्भ हा आणखी एका कवितेशी आहे. कवी जवाहर राठोड यांच्या कवितेचा दाखला देत शरद पवारांनी साताऱ्यात एक महत्त्वाचं वक्तव्य केलं होतं. पाथरवट या कवितेवर शरद पवारांनी असं नेमकं काय म्हटलं? की ज्यामुळे केतकी चितळे हीनं फेसबुकवर पोस्ट केली, याची चर्चा आता रंगली आहे. म्हणूनच शरद पवारांनी साताऱ्यात केलेलं वक्तव्य जाणून घेणं गरजेचं आहे. हिंदू देव-देवतांबाबत पवार यांनी पाथरवट कवितेचा संदर्भ देत महत्त्वाचं विधान केलं होतं.

काय आहे ती कविता?

पाहा व्हिडीओ : शरद पवार नेमकं काय म्हणाले होते?

9 मे रोजी शरद पवार यांनी साताऱ्यातील भाषणातील शब्दान शब्द काय होता तेही जाणून घेऊयात. शरद पवार यांनी म्हटलं होतं की,…

मी बघतो हल्ली, समाजातील लहान घटकातील, ज्यांना सहन करावं लागलं, ज्यांच्यावर अत्याचार झाले, अन्याय झाले, असे अनेक लोक आज आपल्या कार्याने पुढे येतात. मला आठवतंय मी नेहमी औरंगाबदला जायचो, तिथं मिलिंद कॉलेज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी काढलेलं आहे.

तिथं महाराष्ट्रातल्या उपेक्षित समाजातली मुलं मुली शिकायची आणि त्याठिकाणी ती अतिशय ज्यांना शैक्षण पार्श्वभूमी नाही, अशा कुटुंबातील मुलं उत्तम लिखाण करायची.

मला आठवतंय जवाहर राठोड नावाचा एक कवी होता, तो हयात नाही आज..

त्याचं नाव जवाहर राठोड, हा वसंतराव नाईक कॉलेजमध्ये शिकायचा..त्याची एक किवात होती, त्या कवितेचं नाव पाथरवट.. अशी ती कविता होती.

यामध्ये कवी म्हणते की आम्ही पाथरवट.. तुमचा दगड धोंडा आम्ही आमच्या छन्नी आणि हातोड्यानं फोडतो. त्यातून तुमच्या घरात अन्न तयार करायला, पीठ तयार करायला जे जातं लागतं, ते आम्ही घडवतो.

त्या जात्यातून पीठ निघतं त्यानं तुमचं पोट भरतं. कवी म्हणतो, आज आम्ही गोष्टी घडवल्या. आमच्या छन्नीने, हातोड्याने आणि घामाने. एक दिवशी तुम्ही ज्यांची पूजा करता त्या ब्रम्हा, विष्णू महेश यांच्या मूर्ती आम्ही घडवल्या.

आम्ही मूर्ती घडवल्या आणि तुम्ही त्या मंदिरात ठेवल्या आणि साल्यांनो आम्हाला मंदिरात येऊ देत नाही.

मला तुम्हाला प्रश्न विचारायाय की, ब्रम्हा विष्णू आणि महेश हा आम्ही आम्चाय छन्नीने घडवसी. हा तुमचा देव, तुमच्या देवाचे बा आम्ही आहोत. त्यामुळे आमच्यावरील अन्याय सहन करणार नाही. अशा प्रकारचे ते काव्य मला आठतंय. जवाहरने लिहून ठेवलंय.

केतकीनं पवारांवर केलेली फेसबुक पोस्ट काय होती?

अभिनेत्री केतकी चितळे हीनं केलेल्या फेसकूस पोस्टमध्ये लिहिलंय की..

तुका म्हणे पवारा | नको उडवू तोंडाचा फवारा || ऐंशी झाले आता उरक | वाट पहातो नरक सगळे पडले उरले सुळे | सतरा वेळा लाळ गळे || समर्थांचे काढतो माप | ते तर तुझ्या बापाचेही बाप || ब्राह्मणांचा तुला मत्सर | कोणरे तू ? तू तर मच्छर || भरला तुझा पापघडा | गप! नाही तर होईल राडा || खाऊन फुकटचं घबाड | वाकडं झालं तुझं थोबाड || याला ओरबाड त्याला ओरबाड | तू तर लबाडांचा लबाड || -Advocate Nitin Bhave

केतकीवर गुन्हा..

दरम्यान, अभिनेत्री केतकी चितळे हीनं फेसबुकवर पोस्ट केलेल्या कवितेनंतर तिच्यावर कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे एकूणच हा वाद आता आणखी ताणला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. फेसबुकवर केतकीनं केलेल्या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या असून तिच्या पोस्टवरील कमेंटमध्ये नवा वाद सुरु झालाय.

याआधीही केतकी चितळे हीनं छत्रपती शिवरायांवरही केलेली पोस्ट चर्चेत आली होती. त्यानंतर पुन्हा एका बऱ्याच दिवसानंतर केतकी चितळेच्या फेसबुक पोस्टनं वाद उफाळून आलाय.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.