सुनिल थिगळे| पुणे : खेड पंचायत समितीमध्ये (Khed Panchayat Samiti) राष्ट्रवादीला (NCP) मोठा दणका बसला आहे. खेड पंचायत समितीचे सभापती अरुण चौधरी (Arun Chaudhary Resigne) यांनी अवघ्या सहा महिन्यातच सभापतीपदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का मानण्यात येत आहे. अरुण चौधरी यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला आहे. खेड पंचायत समिती सभापती पदावरून स्थानिक पातळीवर शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात सहा महिन्यांपूर्वी राजकीय नाट्य रंगल्याचे पहायला मिळाले होते. त्यामुळे ही निवडणूक चांगलीच प्रतिष्ठेची झाली होती. सभापती कोण होणार याकडे सर्व तालुक्याचे लक्ष लागले होते. अखेर राष्ट्रवादीचे अरुण चौधरी यांच्या गाळ्यात सभापतीपदाची माळ पडली. त्यांची पंचायत समितीच्या सभापतीपदी बिनविरोध निवड झाली होती. मात्र त्यांनी अवघ्या सहा महिन्यातच सभापतीपदाचा राजीनामा दिल्याने आता नवा सभापती कोण असणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
खेड पंचायत समितीचा सभापती कोण होणार यावरून सहा महिन्यांपूर्वी स्थानिक पातळीवर शिवसेना आणि राष्ट्रवादी आमने-सामने आल्याचे पहायला मिळाले होते. त्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. वरिष्ठ पातळीवरील नेत्यांच्या मध्यस्थिने हा वाद मिटल्यानंतर राष्ट्रवादीचे अरुण चौधरी यांची खेड पंचायत समितीच्या सभापतीपदी बिनविरोध निवड झाली होती. राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संजय राऊत अशा महाविकास आघाडीमधील वरिष्ठ नेत्यांनी या निवडणुकीवर आपले लक्ष केंद्रीत केले होते. त्यानंतर अरुण चौधरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
दरम्यान अवघ्या सहा महिन्यातच अरुण चौधरी यांनी राजीनामा दिल्याने खेड तालुक्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. हा राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का मानण्यात येत आहे. अरुण चौधरी यांच्या राजीनाम्यानंतर आता पुढील सभापती कोण असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अरुण चौधरी यांनी अचानक राजीनामा का दिला याबाबतची महिती मात्र अद्याप समोर येऊ शकलेली नाहीये.
गाडी फुल व्हायच्या आधी या, नंतर लटकत यावे लागेल, पक्षप्रवेशावरुन प्रवीण दरेकरांची मिश्किल टिपणी
गुलाबराव तुमच्या नावाचं पहिलं अक्षरच खराब, बाळ, वारसं दुसऱ्याचं आणि डफडं तुमचं-खडसे