Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘तो’ रस्ता 106 वर्षांपूर्वीचा, तरीदेखील खासगी कंपनीला 74 कोटींची भरपाई देण्याचा घाट, किरीट सोमय्यांचे गंभीर आरोप

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर आणखी एका भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे (Kirit Somaiya allegation on Thackeray Government).

'तो' रस्ता 106 वर्षांपूर्वीचा, तरीदेखील खासगी कंपनीला 74 कोटींची भरपाई देण्याचा घाट, किरीट सोमय्यांचे गंभीर आरोप
Follow us
| Updated on: Dec 11, 2020 | 6:32 PM

मुंबई : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर आणखी एका भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. “अंधेरीत महाकाली लेणीजवळ 106 वर्षांपूर्वी रस्ता बनवण्यात आला आहे. मात्र, तरीदेखील या रस्त्याच्या बदल्यात उद्योगपती विनोद गोयंका, शाहिद बलवा आणि अविनाश भोसले यांच्या कंपनीला 74 कोटी रुपयांची भरपाई देण्याचा घाट घातला जात आहे. हा एक मोठा घोटाळा आहे”, असा दावा त्यांनी केला (Kirit Somaiya allegation on Thackeray Government).

किरीट सोमय्या यांनी आज (11 डिसेंबर) पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी बिल्डर आणि मुंबई महापालिकेच्या संगमताने भ्रष्टाचार होत असल्याचा दावा केला. “अंधेरीत महाकाली लेणी आहे. हा भाग पुरातत्व विभागाशी संबधित असल्याने हा भाग केंद्र सरकारच्या मालकीचा आहे. मुख्य म्हणजे लेणी आधी पासून आहे. यामुळे 1914 सालात याठिकाणी रस्ता बनवण्यात आला. त्यावेळी ही जागा मुंबई महानगर पालिकेच्या अखत्यारीतही नव्हती”, असं किरीट सोमय्या म्हणाले (Kirit Somaiya allegation on Thackeray Government).

“या परिसरात कमाल अमरोही स्टुडिओ होता. हा स्टुडिओ 2014 सालात महाल फीचर्स प्रायव्हेट लिमिटेड या बांधकाम कंपनीने विकत घेतला. या कंपनीत विनोद गोयंका, शाहिद बलवा आणि अविनाश भोसले भागीदार आहेत. या कंपनीने रस्त्याच्या बदल्यात टीडीआर मागितला होता. त्याला महानगरपालिकेने नकार दिला होता. आता सत्तांतर झाल्यावर पुन्हा त्या कंपनीने टीडीआर ऐवजी त्याचे 74 कोटी रुपये देण्यात यावेत, अशी मागणी केली. जो रस्ता 100 वर्षांपासून आहे, ज्याची मालकी केंद्र सरकारची आहे त्याचे पैसे या महाल फीचर्स कंपनीला देण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही. हा भ्रष्टाचार आहे”, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला.

किरीट सोमय्या यांनी याआधीदेखील ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी ठाकरे कुटुंबावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. अर्णव गोस्वामी अटक प्रकरणात किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला होता. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि वास्तू सजावटकार अन्वय नाईक यांच्यात आर्थिक व्यवहार झाले आहेत. रायगड जिल्ह्यातील रेवदंडा नजिकच्या किल्ला कोर्लई इथे रश्मी ठाकरे आणि मनिषा वायकर यांनी नाईक कुटुंबाकडून जमीन घेतली, असा दावा किरिट सोमय्या यांनी केला होता. उद्धव ठाकरे यांनी हा व्यवहार का लपवला? मुख्यमंत्र्यांनी रेवदंडाजवळ जमीन का घेतली? असे अजून किती व्यवहार झाले आहेत? असा सवाल किरिट सोमय्या यांनी केला होता. त्याचबरोबर ठाकरे आणि नाईक कुटुंबात झालेल्या व्यवहाराची चौकशी व्हायला हवी, अशी मागणीही सोमय्या यांनी केली होती.

हेही वाचा : रश्मी ठाकरे आणि अन्वय नाईक यांच्यात आर्थिक व्यवहार!, किरिट सोमय्या यांचा दावा, अर्णव गोस्वामी प्रकरणात मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप

आमची बदनामी थांबवा; खोक्याच्या बायकोच जिल्हाधिकारी कार्यालयात उपोषण
आमची बदनामी थांबवा; खोक्याच्या बायकोच जिल्हाधिकारी कार्यालयात उपोषण.
फहीम खानने पोलीसांशी घातली हुज्जत, व्हिडिओ व्हायरल
फहीम खानने पोलीसांशी घातली हुज्जत, व्हिडिओ व्हायरल.
कारागृह पोलीस भरतीसाठी 3 हजार मुलींची गर्दी; गोंधळ उडल्याने दुखापत
कारागृह पोलीस भरतीसाठी 3 हजार मुलींची गर्दी; गोंधळ उडल्याने दुखापत.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला बीड न्यायालयात चालणार
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला बीड न्यायालयात चालणार.
औरंगजेबाचा मुद्दा सध्या संयुक्तिक नाही; RSS ने स्पष्ट केली भूमिका
औरंगजेबाचा मुद्दा सध्या संयुक्तिक नाही; RSS ने स्पष्ट केली भूमिका.
गुन्हेगारीमध्ये महाराष्ट्र कितवा; फडणवीसांनी विधानसभेत थेट मांडले आकडे
गुन्हेगारीमध्ये महाराष्ट्र कितवा; फडणवीसांनी विधानसभेत थेट मांडले आकडे.
नागपूर पोलिसांनी हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं
नागपूर पोलिसांनी हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.
'औरंगजेब तुमचा बाप की तुम्ही त्याच्या खानदानातले',आव्हाड कोणावर भडकले?
'औरंगजेब तुमचा बाप की तुम्ही त्याच्या खानदानातले',आव्हाड कोणावर भडकले?.
'अध्यक्ष महोदय, मी चॉकलेट नाही, कॅडबरी दिली', फडणवीसांचा मिश्किल विनोद
'अध्यक्ष महोदय, मी चॉकलेट नाही, कॅडबरी दिली', फडणवीसांचा मिश्किल विनोद.
लालपरीनं प्रवास करताय? प्रवास करताना एसटी बिघडली तरी नो टेन्शन कारण...
लालपरीनं प्रवास करताय? प्रवास करताना एसटी बिघडली तरी नो टेन्शन कारण....