AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘आमचा घात करायचा आहे का?’ निल सोमय्यांचा संतप्त सवाल, किरीट सोमय्यांचा तासाभरापासून ठिय्या सुरुच

सोमय्या यांचे पुत्र निल सोमय्या यांनी दापोली पोलीस आणि ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केलाय. यांना आमचा, आमच्या कार्यकर्त्यांचा घात करायचा आहे का? असा सवाल निल सोमय्या यांनी केलाय.

'आमचा घात करायचा आहे का?' निल सोमय्यांचा संतप्त सवाल, किरीट सोमय्यांचा तासाभरापासून ठिय्या सुरुच
निल सोमय्या यांचा दापोली पोलिसांवर गंभीर आरोपImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 26, 2022 | 7:58 PM

दापोली : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यासह माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane), निल सोमय्या (Nil Somaiya) आणि भाजप पदाधिकाऱ्यांचं दापोलीस पोलिस ठाण्यासमोरील ठिय्या आंदोलन तासाभरापासून सुरु आहे. शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या कथित रिसॉर्टविरोधात FIR दाखल करण्यासाठी किरीट सोमय्या आज दापोलीत दाखल झाले. मोठं शक्तिप्रदर्शन केल्यानं ते दापोली पोलीस ठाण्यात गेले. त्यावेळी सोमय्या आणि राणे यांना पोलिस ठाण्यात तासभर बसवून ठेवण्यात आलं. हे दोघे पोलीस ठाण्यातून बाहेर पडल्यानंतर त्यांच्या गाड्या आणि कार्यकर्ते दीड किमी अंतरावर नेण्यात आल्याचं समजलं. त्यानंतर सोमय्या तासाभरापासून दापोली पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडून आहेत. अशावेळी सोमय्या यांचे पुत्र निल सोमय्या यांनी दापोली पोलीस आणि ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केलाय. यांना आमचा, आमच्या कार्यकर्त्यांचा घात करायचा आहे का? असा सवाल निल सोमय्या यांनी केलाय.

‘आमचा, कार्यकर्त्यांचा घात करायचा आहे का?’

दापोली पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलनाला बसल्यानंतर निल सोमय्या यांनी टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला. ‘दापोली पोलीस ठाण्यात एसपी कुठलंही सहकार्य करत नाहीत. निलेश राणेंनाही गोलगोल फिरवलं. आमच्या दोनशे गाड्या पोलीस ठाण्यापासून दीन किमी लांब ठेवल्या आहेत. यांना आमच्या कार्यकर्त्यांसोबत घात करायचा आहे का? इथून 10 मिनिटांवर तर गुंड उभे आहेत. इथे दोन माजी खासदार आलेले आहेत आणि तरीही एसही बाहेर येऊन बोलायला तयार नाहीत. आमच्या कार्यकर्त्यांना सुखरुपपणे आमच्यापर्यंत पोहोचवावं. आमच्याकडे येऊन एसपींनी बोलायला हवं. दापोली पोलीस आम्हाला सुरक्षीतपणे रिसॉर्टवर घेऊन जात नाहीत, तोवर आम्ही इथून उठणार नाहीत, असा इशारा निल सोमय्या यांनी दिलाय.

‘रिसॉर्टबाबत एफआयआर का होत नाही?’

दोन रिसॉर्ट यांनी अनधिकृतपणे किंबहुना भ्रष्टाचाराऱ्या पैशातून उभे केले आहेत. एका रिसॉर्टवर एफआयआर होतो, मग दुसऱ्या रिसॉर्टबाबत एफआयआर का होत नाही? असा सवाल नील सोमय्या यांनी केलाय. तसंच इथल्या पोलीस अधीक्षकांचं वर्तन आपण यापूर्वीही पाहिलं आहे. ते कुणाच्या तरी आदेशावर, फोनवर काम करतात हे महाराष्ट्रानेही पाहिलं आहे, अशी टीकाही त्यांनी केलीय.

‘एसपी माफियासेनेचा शाखाप्रमुख बनलाय’

किरीट सोमय्याची हत्या करण्याचं कटकारस्थान दापोली पोलीस, एसपी आणि शिवसेनेचं झाल्याचं दिसत आहे. सुमारे 200 वाहनं कार्यकर्ते आले, येऊ दिलं. आम्हाला फक्त चौघांनाच पोलीस ठाण्यात प्रवेश दिला. त्यानंतर अर्धा तासात आमच्या कार्यकर्त्यांना मागे नेण्यात आलं. आता ते कुठे आहेत आम्हाला माहिती नाही. दापोलीच्या गल्ल्या छोट्या आहेत. आता आम्हाला सांगतात तुम्हाला चौघांना कुठे जायचं तिथे जा. इथला एसपी हा माफिया सेनेचा एक शाखाप्रमुख झालाय, असा हल्लाबोल किरिट सोमय्या यांनी यावेळी केलाय.

इतर बातम्या : 

Kirit Somaiya : पोलिसांकडून FIR नाही! किरीट सोमय्यांचा ठिय्या, घातपाताचा कट आखल्याचा गंभीर आरोप

Breaking : किरीट सोमय्यांना दापोली पोलिस ताब्यात घेणार, नोटीसही बजावली; आता पुढे काय?

जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव.
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती.