किरीट सोमय्यांचा राज्य सरकारवर हल्लाबोल सुरुच; पवार, ठाकरे, देशमुख, राऊतांवर निशाणा

सोमय्या यांनी आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार संजय राऊत, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. सर्व माफिया एकत्र येऊन महाराष्ट्र लुटत आहेत, असा घणाघात सोमय्या यांनी केलाय.

किरीट सोमय्यांचा राज्य सरकारवर हल्लाबोल सुरुच; पवार, ठाकरे, देशमुख, राऊतांवर निशाणा
किरीट सोमय्या, भाजप नेते
Follow us
| Updated on: Nov 02, 2021 | 12:28 PM

मुंबई : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांचा महाविकास आघाडी सरकारमधील नेते आणि मंत्र्यांवरील हल्लाबोल सुरुच आहे. सोमय्या यांनी आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार संजय राऊत, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. सर्व माफिया एकत्र येऊन महाराष्ट्र लुटत आहेत, असा घणाघात सोमय्या यांनी केलाय. (Kirit Somaiya criticizes CM Uddhav Thackeray, Ajit Pawar, Anil Deshmukh and Sanjay Raut)

उपमुख्यमंत्री अजित पवारांवर 19 दिवस धाड सुरु होती. जरंडेश्वर कारखाना, दिल्लीची संपत्ती, गोव्यातील रिसॉर्ट, पुणे, बारामती आणि त्यासोबत नरिमन पॉईंटमधील निर्मल टॉवरमध्ये पार्थ पवार यांचे कार्यालय आयकर विभागाने जप्त केलंय. अजित पवार यांनी पत्नी सुनेत्रा पवार, त्यांच्या दोन्ही बहिणी, जावई, मुलगा पार्थ आणि आशाताई पवार यांचीही नावं बेनामी मालमत्तेत टाकल्याचा आरोप सोमय्यांनी केलाय. अनिल देशमुख आणि अजित पवार भष्ट्राचार करत आहेत, वाईट वाटते. दोन माफिया एकत्र येऊन महाराष्ट्रात लूट करत आहेत. घोटाळ्याचा पैसा हा नातेवाईकांच्या नावे करण्याचं काम ठाकरे आणि पवार सरकारच करु शकतं, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावलाय.

‘अनिल देशमुखांना तोंड उघडावे लागेल’

अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक करण्यात आलीय. त्या पार्श्वभूमीवर बोलताना अनिल देशमुख यांना तोंड उघडावे लागेल. त्यांचे पीएनं उघडलं आहे. पवार आणि ठाकरे सरकारकडे कोण, कसे पैसे पोहोचवत आहे हे सर्व समोर येईल. ही क्रांती आहे. निश्चितपणे अजून नावं समोर येतील आणि कारवाई होईल. दिवाळीनंतर अजून काही मंत्र्यांचे घोटाळे समोर येणार आहेत, असा इशाराही सोमय्या यांनी यावेळी दिलाय.

सरकार आहे की नोटा छापण्याचा कारखाना?- राम कदम

भाजप आमदार राम कदम यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केलीय. “पूर्व गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अटकेनंतर आता दर महिन्याला 100 कोटी रुपये वसुलीमध्ये त्यांचे प्रमुख बॉस कोण आहेत? वसुलीचे हिस्सेदार, वाटेकरी, कोण कोण नेते आणि पक्ष आहेत, हे समोर येईल. अन अर्थातच त्या बड्या नेत्यांनाही जेलमध्ये जावे लागेलच. ही लढाई कोणा एका व्यक्ति विशेषच्या विरोधातील नसून भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे. कल्पना करा. महिन्याला एका खात्यात फक्त मुंबईतून 100 कोटी तर संपूर्ण महाराष्ट्रात किती? अन सर्व खाती मोजली तर किती कोटी? हे सरकार आहे की नोटा छापण्याचा कारखाना?” अशा शब्दात राम कदम यांनी टीकेची झोड उठवली आहे.

इतर बातम्या :

ठाकरे सरकारच्या मदतीनं परमबीर सिंग गायब, आशिष शेलारांचा खळबळजनक आरोप

भाजपवाले जंगलात राहतात का? हे तर राक्षस गणातील लोक; संजय राऊतांची तोफ धडाडली

Kirit Somaiya criticizes CM Uddhav Thackeray, Ajit Pawar, Anil Deshmukh and Sanjay Raut

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.