पुन्हा रश्मी ठाकरेंच्या बंधूवरुन सोमय्यांनी मुख्यमंत्र्यांना घेरलं, कर्जतच्या मंदिराची जागा कशी नावावर झाली ते पुन्हा सांगितलं

किरीट सोमय्या यांनी आज पत्रकार परिषद घेत रश्मी ठाकरे यांच्या बंगल्यांच्या मुद्यावरुन आणि रश्मी ठाकरे यांचे बंधू पाटणकर यांनी कर्जतमध्ये घेतलेल्या जमिनीसंदर्भात उत्तर देत पुन्हा प्रश्नचिन्ह उभं केलं आहे.

पुन्हा रश्मी ठाकरेंच्या बंधूवरुन सोमय्यांनी मुख्यमंत्र्यांना घेरलं, कर्जतच्या मंदिराची जागा कशी नावावर झाली ते पुन्हा सांगितलं
किरीट सोमय्या
Follow us
| Updated on: Feb 16, 2022 | 10:16 AM

नवी दिल्ली: शिवेसना खासदार संजय राऊत यांनी काल पत्रकार परिषद घेत भाजपवर टीका केली होती. भाजप नेते देवेंद्र फडणवीस, माजी खासदार किरीट सोमय्या, निल सोमय्या, मोहित कंबोज यांच्यावर टीका केली होती. संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत पीएमसी बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी वाधवान याच्याशी निल सोमय्या याचा संबंध असल्याचा आरोप केला होता. संजय राऊत यांच्या स्फोटक पत्रकार परिषदेनंतर आज नवी दिल्लीत किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेतली. किरीट सोमय्या यांनी आज पत्रकार परिषद घेत रश्मी ठाकरे यांच्या बंगल्यांच्या मुद्यावरुन आणि रश्मी ठाकरे यांचे बंधू पाटणकर यांनी कर्जतमध्ये घेतलेल्या जमिनीसंदर्भात उत्तर देत पुन्हा प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. कर्जतच्या हिंदू देवस्थानाची जमीन मुस्लीम व्यक्तीकडून रश्मी ठाकरे यांचा भाऊ पाटणकर यांनी जमीन खरेदी केली, असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.

मी कर्जतला गेलो

संजय राऊत यांनी कर्जतच्या जमिनीच्यासंदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे.यासंदर्बात किरीट सोमय्या यांनी भाष्य केलं आहे. मी कर्जतला गेलो. तिथे चौकशी केली. श्रीधर पाटणकर हे उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे असून रश्मी यांचा भाऊ आहेत. ती जमीन आधी सलीमच्या नावे ट्रान्सफर झाली. हिंदू देवस्थानाची जमीन आणि मुस्लिमाच्या नावे, आणि मग पाटणकरांच्या नावावर झाली, असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.

श्रीधर पाटणकर हे का बोलत नाहीत. श्रीधर पाटणकर याच्या नावावर जमीन सलीम याच्या नावावरुन ट्रान्सफर झाली आहे. मी तक्रार दिलेली नाही. मी फक्त जिल्हाधिकारी यांच्याकडून माहिती घेतली, असं किरीट सोमय्या म्हणाले.

कोविड घोटाळ्यासंदर्भात संजय राऊत एका शब्दानं बोलत नाहीत. यासंदर्भातील कागदपत्र मुंबईत पत्रकार परिषद घेऊन बोलणार आहे. पुण्यात कंपनी ब्लॅकलिस्ट करुन त्यांना कंत्राट देणार नाही, असं सांगण्यात आलं होतं. मूळ मुद्दा कोविड घोटाळ्याला ठाकरे सरकार आणि संजय राऊत प्रचंड घाबरलेले आहेत, असं किरीट सोमय्या म्हणाले.

पाहा व्हिडीओ

इतर बातम्या:

Bappi Lahiri | बॉलिवूडचा ‘सोन्या’सारखा गळा हरपला, ज्येष्ठ गायक-संगीतकार बप्पी लाहिरी यांचे निधन

Chanakya Niti : व्यर्थ खर्च करताय ? वेळीच सावध व्हा, नाहीतर भविष्य अंधारात गेलेच म्हणून समजा

महाराष्ट्राचा CM कोण? 2-2-1 फॉर्म्युला ठरला? शिरसाट स्पष्ट म्हणाले...
महाराष्ट्राचा CM कोण? 2-2-1 फॉर्म्युला ठरला? शिरसाट स्पष्ट म्हणाले....
'30-40 कोटी खर्च, गुंडांचा वापर दडपशाही तरी पराभव अन् खापर दादांवर..'
'30-40 कोटी खर्च, गुंडांचा वापर दडपशाही तरी पराभव अन् खापर दादांवर..'.
पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा
पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा.
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी.
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका.
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल.
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी.
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब.
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?.
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती.