kirit somaiya | ‘धारावीची लोकसंख्या 2.5 लाख, मग 4 लाख लोक अपात्र कसे काय?’ किरीट सोमय्यांचा सवाल
kirit somaiya | "रवींद्र वायकर प्रकरणात हिशोब द्यावा लागेल. महापालिकेने परवानगी दिली. इकबाल चहल यांनी परवानगी दिली त्याबाबत ed ने विचारले पाहिजे परवानगी कशी दिली? खेळाचे मैदान आहे कशी परवानगी दिली?"
मुंबई : “कोविड खिचडी घोटाळ्यात आदित्य ठाकरे यांचा फ्रंटमॅन सूरज चव्हाण यांना अटक झालीय. त्याचं मी स्वागत करतो” असं भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे. “132 कोटी रुपयाच्या खिचडी घोटाळ्यात उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या पार्टीच्या अनेक नेत्यांच्या बेनामी कंपन्यात पैसा गेला” अस किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे. “खिचडी घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांची कन्या विधिता राऊत, भाऊ संदीप राऊत आणि सुजित पाटकर यांच्या खात्यात लाखो करोडो रुपय गेले” असा आरोप सोमय्या यांनी केला.
“रवींद्र वायकर प्रकरणात हिशोब द्यावा लागेल. महापालिकेने परवानगी दिली. इकबाल चहल यांनी परवानगी दिली त्याबाबत ed ने विचारले पाहिजे परवानगी कशी दिली? खेळाचे मैदान आहे कशी परवानगी दिली?” असा सवाल किरीट सोमय्या यांनी केला. “संजय राऊत म्हणजे चोर कोतवालाला बोलत आहे. तुमच्याकडे जे पैसे आलेत त्याचा हिशोब द्या, पत्रावाला चाळ तुमच्या बायकोच्या खात्यात पैसे आले होते. त्याचा हिशोब द्या, जेलमध्ये जावे लागले. घोटाळा केला असेल तर तुम्ही तक्रार करा. तुम्ही पाप केले त्याचा हिशोब तर द्यावा लागेल” असं किरीट सोमय्या म्हणाले.
‘4 लाख लोकांचे पुनर्वसन हे अशक्य’
धारावी येथील अपात्र झोपडपट्टी धारकांचे पुनर्वसन मुलुंड (पूर्व) येथील जकात नाका व डम्पिंग ग्राउंड जवळच्या जमिनीवर करावे व त्यासाठी ही जमीन मुंबई महापालिकेने धारावी पुनर्विकास प्राधिकरणाला द्यावी असे 10 जानेवारी, 2024 रोजी महाराष्ट्र सरकारच्या गृहनिर्माण मंत्रालयाने एक पत्र मुंबई महापालिकेला दिले आहे. या पत्रासंबंधात भाजप नेते किरीट सोमैया यांनी राज्य सरकार व झोपडपट्टी धारावी पुनर्विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली, पत्र लिहिले व एका ठिकाणी अशा 4 लाख लोकांचे पुनर्वसन हे अशक्य आहे, असे आपले मत व्यक्त केले.
133 कोटी रुपयांच्या कोविड लॉकडाऊन खिचडी घोटाळ्यात ED ने आदित्य ठाकरे यांचे सहकारी सूरज चव्हाण याच्या अटकेचे, मी स्वागत करतो. pic.twitter.com/XAS2aNeWad
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) January 17, 2024
‘मग हा मुलुंड पूर्वच्या नागरिकांवर अन्याय’
“मुलुंड (पूर्व) येथील इन्फ्रास्ट्रक्चरवर आधीच ठाकरे सरकारने PAP प्रकल्पाद्वारा 50,000 लोकांचे पुनर्वसन करण्याचा घोटाळा केला आहे. त्यात अधिक 4 लाख किंवा हजारो लोकांचे मुलुंड (पूर्व) येथे पुनर्वसन करणे, हे मुलुंड पूर्वच्या नागरिकांवर अन्याय, अत्याचार होणार” असेही किरीट सोमैया यांनी म्हटले आहे. “धारावीची एकंदर लोकसंख्याच 2.5 लाखांपर्यंत आहे. त्यात 4 लाख अपात्र लोकं कसे काय?” असा प्रश्न ही किरीट सोमैया यांनी या अधिकाऱ्यांना विचारला.