मुंबई: राज्य सरकारने एमएमआरडीएचे टॉप सिक्युरिटीमधील 100 कोटी रुपये ढापले असून त्या पैशातून विदेशात मालमत्ता खरेदी केल्याचा गंभीर आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. सोमय्या यांच्या या आरोपामुळे एकच खळबळ उडाली आहे. (kirit somaiya slams maharashtra government over ED enquiry)
किरीट सोमय्या यांनी ट्विट करून हा गंभीर आरोप केला आहे. महाराष्ट्र सरकारने एमएमआरडीएचे टॉप सिक्युरिटीमधील 100 कोटी रुपये ढापले आहेत. त्या पैशातून लंडन आणि विदेशात मालमत्ता खरेदी केल्या आहेत. तसेच इतर कंपन्यांमध्येही हा पैसा डायव्हर्ट करण्यात आला आहे. त्याचा तपास ईडी करत आहे. या पैशाचे लाभार्थी कोण? याचा शोध ईडी घेत आहे. त्या संदर्भातच ईडीकडून शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांना प्रश्न विचारले जात आहेत. त्यावर ठाकरे सरकार एवढी अढीबाजी का करत आहे?, असा सवाल सोमय्या यांनी विचारला आहे.
दरम्यान, प्रताप सरनाईक यांनाही ईडीकडून समन्स बजावण्यात आलं आहे. क्वारंटाईन कालावधी संपल्यानंतर ईडीसमोर हजर राहा, असा आदेश प्रताप सरनाईक यांना देण्यात आला आहे. मुंबईबाहेरुन आल्यामुळे सरनाईकांनी विलगीकरणात असल्याचं कारण सांगत ईडीला पुढच्या आठवड्यात चौकशी करण्याची विनंती केली होती. कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात सरनाईक कुटुंब ईडीच्या रडारवर आहे.
ईडीने मंगळवारी प्रताप सरनाईक आणि त्यांचे सुपुत्र विहंग आणि पूर्वेश सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर छापे मारले होते. त्यानंतर विहंग यांची ईडीने पाच तास चौकशी केली. काल (बुधवारी) प्रताप सरनाईक यांनाही नोटीस बजावून ईडीने चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, आपण परदेशातून आल्याने आठ दिवस आपल्याला सक्तीने क्वारंटाईन राहावं लागत आहे. शिवाय विहंगची पत्नीही आजारी आहे. त्यामुळे मला चौकशीला उपस्थित राहता येणार नाही, असं सरनाईक यांनी ईडीला कळवलं असल्याचं सूत्रांनी सांगितलं होतं. (kirit somaiya slams maharashtra government over ED enquiry)
Maharashtra Government MMRDA’s Hundred Crores Ruees Siphoned of by TOP Securities. Properties purchased in Foreign Countries LONDON… ED investigating where Money diverted. “Leaders of Thackeray Sarkar” want to STOP the Investigation? To protect BENEFICIARIES? #PratapSarnaik ?
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) November 26, 2020
ईडीने मंगळवारी सरनाईक यांच्या घर, कार्यालय आणि हॉटेलसह 10 ठिकाणांवर छापे मारले होते. त्यावेळी प्रताप सरनाईक भारताबाहेर होते. मात्र, ईडीचे छापे पडल्याचं कळताच ते मुंबईत परतले आणि त्यांनी तडक प्रभादेवीतील ‘सामना’ कार्यालयात जाऊन शिवसेना नेते संजय राऊत यांची भेट घेतली. तब्बल दीड तास या दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली होती. त्यानंतर बोलताना ईडीने कारवाई का केली? कशासाठी केली? याची काहीच कल्पना नसल्याचं सरनाईक यांनी सांगितलं होतं. (kirit somaiya slams maharashtra government over ED enquiry)
क्वारंटाईन कालावधी संपल्यानंतर हजर राहा, प्रताप सरनाईकांना ईडीचे समन्स https://t.co/IAZ5JwE2pp @PratapSarnaik #PratapSarnaik #ED @SudhakarK_007 #Quarantine
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 26, 2020
संबंधित बातम्या:
प्रताप सरनाईकांचे व्यावसायिक भागीदार अमित चांदोळेंना अटक, ईडीकडून सलग 12 तास चौकशी
क्वॉरंटाईन आहे, पुढच्या आठवड्यात चौकशी करा; प्रताप सरनाईक यांची ईडीला विनंती
क्वारंटाईन कालावधी संपल्यानंतर हजर राहा, प्रताप सरनाईकांना ईडीचे समन्स
(kirit somaiya slams maharashtra government over ED enquiry)