‘महाराष्ट्रात लोकशाहीचा मुडदा पाडू नका’, किरीट सोमय्यांवरील हल्ल्यानंतर देवेंद्र फडणवीसांचा घणाघात

महापालिका परिसरात काही शिवसैनिकांनी सोमय्या यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसंच त्यांना रोखण्याचा, अंगावर धावून जाण्याचा प्रकरण करण्यात आला. या गंभीर प्रकाराचा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र शब्दात निषेध केलाय. त्याचबरोबर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना फोन करुन फडणवीसांनी घडलेल्या प्रकाराची आणि सोमय्या यांच्या प्रकृतीबाबत विचारपूसही केलीय.

'महाराष्ट्रात लोकशाहीचा मुडदा पाडू नका', किरीट सोमय्यांवरील हल्ल्यानंतर देवेंद्र फडणवीसांचा घणाघात
किरीट सोमय्या यांच्यावरील हल्ल्याचा देवेंद्र फडणवीसांकडून निषेध
Follow us
| Updated on: Feb 05, 2022 | 6:53 PM

मुंबई : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर शिवसैनिकांनी हल्ला केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आज पुणे दौऱ्यावर होते. पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात जाऊन ते राऊतांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार होते. तत्पूर्वी महापालिका परिसरात काही शिवसैनिकांनी सोमय्या यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसंच त्यांना रोखण्याचा, अंगावर धावून जाण्याचा प्रकरण करण्यात आला. या गंभीर प्रकाराचा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी तीव्र शब्दात निषेध केलाय. त्याचबरोबर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना फोन करुन फडणवीसांनी घडलेल्या प्रकाराची आणि सोमय्या यांच्या प्रकृतीबाबत विचारपूसही केलीय.

‘राज्यात कायदा-सुव्यवस्था आहे की नाही? आरोपांना उत्तर देऊ शकत नाही म्हणून थेट गुंडागर्दीवर उतरायचे? आम्ही कायदा पाळतो. पण याचा अर्थ गुंडागर्दी खपवून घेणार नाही! महाराष्ट्रात सातत्याने लोकशाहीचा मुडदा पाडू नका. किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध!’, असं ट्वीट करत देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकर आणि शिवसेनेवर जोरदार टीका केलीय.

पुणे महापालिका परिसरात नेमकं काय घडलं?

पुणे महापालिका परिसरात किरीट सोमय्या यांना रोखण्याचा प्रयत्न केल्यानंतर, त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरु झाल्यानंतर, महत्वाची बाब म्हणजे शिवसैनिकांनी अंगावर धावून येण्याचा प्रयत्न करताच सुरक्षा रक्षक सोमय्यांना तिथून घेऊन निघाले. त्या गोंधळात सोमय्या महापालिकेच्या पायऱ्यांवर कोसळ्याचं एका व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे सोमय्या यांना दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी संचेती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये काही शिवसैनिक सोमय्या यांच्या अंगावर धावून जाताना दिसून येत आहेत. काहीजण गाडीसमोर आडवे पडून सोमय्या यांची गाडी रोखण्याचा प्रयत्न करताना दिसून येतात. तर एक व्यक्ती सोमय्या यांच्या गाडीची काच फोडण्याचा प्रयत्न करत असताना दिसत आहे. महत्वाची बाब म्हणजे एक महिला सोमय्या यांच्या गाडीवर चप्पल फेकत असल्याचंही एका व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे सोमय्या यांच्यावरील हा हल्ला ठरवून केला गेला का? असा सवाल आता भाजपकडून करण्यात येत आहे.

सोमय्या यांचा शिवसैनिकांवर आरोप

दरम्यान, आपल्यावर शिवसेनेच्या गुंडांनी हल्ला केल्याचा आरोप सोमय्या यांनी ट्विटरद्वारे केला आहे. सोमय्या यांना सध्या संचेती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तिथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. घडलेल्या प्रकाराची माहिती मिळताच पुणे भाजप शहराध्यक्ष योगेश टिळेकर यांच्यासह शेकडो भाजप कार्यकर्ते रुग्णालयात दाखल झाले. त्यामुळे काही काळ रुग्णालयातही मोठा तणाव पाहायला मिळाला.

इतर बातम्या : 

Breaking : किरीट सोमय्या यांच्याविरोधात शिवसैनिकांची जोरदार घोषणाबाजी, सोमय्यांना धक्काबुक्कीचा प्रयत्न!

Hindustani bhau : रुको जरा सबर करो, हिंदुस्तानी भाऊला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.