‘अजित पवार बनवाबनवी आणि फसवाफसवी थांबवा’, किरीट सोमय्यांकडून हल्लाबोल सुरुच
मय्या यांनी ट्विटरच्या माध्यमातून अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केलीय. अजित पवार आणि त्यांच्या नातेवाईकांच्या नावे हजारो कोटीहून अधिकची संपत्ती आहे. 8 पेक्षा अधिक शहरात त्यांचं बेनामी साम्राज्य पसरलं असल्याचा आरोप सोमय्या यांनी केलाय.
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित 1 हजार कोटीच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्याचा दावा केल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज पुन्हा एकदा अजितदादांवर निशाणा साधलाय. सोमय्या यांनी ट्विटरच्या माध्यमातून अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केलीय. अजित पवार आणि त्यांच्या नातेवाईकांच्या नावे हजारो कोटीहून अधिकची संपत्ती आहे. 8 पेक्षा अधिक शहरात त्यांचं बेनामी साम्राज्य पसरलं असल्याचा आरोप सोमय्या यांनी केलाय. (Kirit Somaiya’s serious allegation that Ajit Pawar is cheating the people)
अजित पवार लोकांना मूर्ख बनवणे थांबवा. तुमच्या कौटुंबिक मित्र कंपन्यांचे हजारो कोटीहून अधिक बेनामी आणि नामी साम्राज्या 8 पेक्षा अधिक शहरांमध्ये पसरलं आहे. स्पार्कलिंग सॉईल प्रायव्हेट लिमिटेड या होल्डिंग/मेन कंपनी पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासोबत स्थापन केली होती. त्यासाठी 13 वर्षांपूर्वी 100 कोटी रुपये मिळाले होते, ते परत आले की नाही? बनवा बनवी आणि फसवा फसवी थांबवा, असं ट्वीट सोमय्या यांनी केलंय.
Dear Mr Ajit Pawar “Stop Fooling the People”
Your Family Friends Companies More than Thousand Crores Benami & Nami Empire Spread in more than 8 Cities
Sparkling Soil Pvt Ltd the Holding/Main Company founded by You
Hundred Crores received 13 years back. Whether Returned!!?? pic.twitter.com/fKXzzNmQjh
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) November 3, 2021
अजित पवारांची संपत्ती जप्त केल्याचा दावा
तत्पूर्वी, सोमय्या यांनी आयकर विभागाने अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांचे नरिमन पॉईंट निर्मल बिल्डिंग कार्यालय आणि अजित पवार यांच्या आई, पत्नी, बहिणी, जावई… यांच्या मालमत्ता जप्त केल्या आहेत असे समजते, असं ट्वीट करुन, त्यात जरंडेश्वर साखर कारखाना – 600 कोटी, साऊथ दिल्लीतील फ्लॅट – 20 कोटी, पार्थ पवार यांचे कार्यालय – 25 कोटी, तर गोव्यातील निलया रिसॉर्ट – 250 कोटी रुपये या संपत्तीचा समावेश असल्याचं म्हटलं होतं.
प्राप्तिकर विभागाने (Income Tax Dept) अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांचे नरिमन पॉइंट निर्मल बिल्डिंग कार्यालय आणि अजित पवार यांच्या आई, पत्नी, बहिणी, जावई… यांच्या मालमत्ता जप्त केल्या आहेत असे समजते @BJP4Maharashtra
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) November 2, 2021
Income Tax attached Properties of Ajit Pawar
1. Jarandeshwar sugar factory ₹600 crore
2. South Delhi flat ₹20 crores
3. Nirmal office of Parth pawar ₹25 crores
4. Goa Resort “Nilaya” of ₹250 crores @BJP4India pic.twitter.com/jObd05BNde
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) November 2, 2021
अजितदादांना गोवण्याचं कारस्थान, नवाब मलिकांचा आरोप
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबधित मालमत्ता आयकर विभागाकडून जप्त करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र यात कोणतेही तथ्य नसल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले. कोणतीही संपत्ती ही बेनामी नसते. त्याचा कुणीतरी मालक असतोच. त्यामुळे दुसऱ्या कुणाचीतरी संपत्तीवर टाच आणून त्याला अजितदादांचे नाव देणे योग्य नसल्याचे नवाब मलिक म्हणाले. भाजपच्या नेत्यांची त्यांच्या नोकरांच्या, केंद्रीय मंत्र्यांच्या किचन कूकच्या नावे संपत्ती असल्याचेही समोर येऊ शकते. पण अशा प्रकरणातून केवळ बदनामी केली जाते. भुजबळ यांच्याबाबतीतही असेच झाले होते. महाराष्ट्र सदनात घोटाळा झाल्याचा आरोप होत असताना कोर्टाने त्यावर सुनावणी केली आहे. त्यात भुजबळांना निर्दोषत्व बहाल करण्यात आहे. केवळ घाबरवण्याचे आणि धमकावण्याचा खेळ सुरु आहे, यातून आम्ही घाबरुन जाणार नाही, असं नवाब मलिक म्हणाले.
इतर बातम्या :
Kirit Somaiya’s serious allegation that Ajit Pawar is cheating the people