Deepali Sayyad : मेलेल्या आईचं दूध पिऊन सत्तेत गेलात का? दीपाली सय्यद यांनी बंडखोर आमदारांना डिवचलं!

शिवसेनेतील जेष्ठ नेत्यांनी व पक्षा बाहेरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यस्थी करावी, पंतप्रधान मोदींचा शब्द उद्धव साहेब व शिंदे साहेब टाळणार नाहीत हिच एक आशा असल्याचेही त्या म्हणाल्या आहेत. त्यामुळे एकीकडे बंडखोरांना त्यांनी सुनावले असली तरी शिवसेनेचे आणि नाराजांचे सूत जुळेल असा आशावाद व्यक्त केला आहे.

Deepali Sayyad : मेलेल्या आईचं दूध पिऊन सत्तेत गेलात का? दीपाली सय्यद यांनी बंडखोर आमदारांना डिवचलं!
दिपाली सय्यद, नेत्या, शिवसेनाImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Jul 08, 2022 | 11:54 AM

मुंबई : (Shivsena) शिवसेना आणि एकनाथ शिंदे गट यामुळे आता कोणता झेंडा हाती घेऊ म्हणणाऱ्या (Deepali Sayyad) दीपाली सय्यद यांनी (Rebel MLA) बंडखोर आमदारांवर चांगलाच निशाना साधला आहे. उद्धव ठाकरे हे आमच्या कुटुंबासारखे आहेत. त्यामुळे चिन्हाबाबत जे व्हायचे ते होऊ द्या पण पक्ष प्रमुखांचे आदेश महत्वाचे असल्याचे सांगत त्यांनी किरीट सोमय्या यांच्या वक्तव्यावरुन बंडखोर आमदारांना डिवचले आहे. किरीट सोमय्या हे उद्धव ठाकरे यांच्याबद्दल काहीही बोलणार आणि ते तुम्ही ऐकूण घेणार. हीच शिवसेना तुमच्या रक्तात भिनली आहे का म्हणत मेलेल्या आईचं दूध पिऊन सत्तेत गेलात का? असेही खडे बोल दीपाली सय्यद यांनी बंडखोरांना सुनावले आहेत. तर दुसरीकडे शिवसेना तोडुन लढण्यापेक्षा जोडुन लढली तर शिवसैनिकाला आनंद असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

शिंदे गट अन् शिवसेना एकीबाबत आशादायी

आता नव्याने शिंदे गट हा अस्तित्वात आला असला तरी तो एक शिवसेनेचाच भाग आहे. शिवाय उद्धव ठाकरे हे एक कुटुंब प्रमुखांसारखे आहेत. त्यामुळे प्रत्येक शिवसैनिकाच्या चेहऱ्यावर पुन्हा हस्य उमटावे हीच आपली इच्छा असल्याचे दीपाली सय्यद म्हणाल्या आहेत. शिवाय शिवसेनेतील जेष्ठ नेत्यांनी व पक्षा बाहेरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यस्थी करावी, पंतप्रधान मोदींचा शब्द उद्धव साहेब व शिंदे साहेब टाळणार नाहीत हिच एक आशा असल्याचेही त्या म्हणाल्या आहेत. त्यामुळे एकीकडे बंडखोरांना त्यांनी सुनावले असली तरी शिवसेनेचे आणि नाराजांचे सूत जुळेल असा आशावाद व्यक्त केला आहे.

किरीट सोमय्यांच्या त्या वक्तव्यांवरुन नाराजी

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल किरीट सोमय्यां याची विधाने सातत्याने चर्चेत असतात. यावेळी त्यांनी चक्क माफिया म्हणून त्यांचा उल्लेख केला होता. त्यामुळे शिवसैनिकांनी त्याबद्दल नाराजी तर व्यक्त केली आहे. पण शिंदे गटानेही याबाबत उपमुख्यंमत्री यांना पत्रद्वारे नाराजी व्यक्त केली आहे. एकीकडे एकत्र या म्हणायचे आणि दुसरेकडे खालच्या पातळीवरील वक्तव्य कसी सहन करता असा सवाल दीपाली सय्यद यांनी उपस्थित केला आहे.

हे सुद्धा वाचा

किरीट सोमय्या यांना हाकला अन् शिवसैनिक म्हणून घ्या

किरीट सोमय्या यांनी कायम पक्षावर आणि पक्ष नेतृत्वावर खालच्या पातळीवर टीका केली आहे. एकीकडे शिंदे गट असतानाही त्यांनी माफिया असा उल्लेख उद्धव ठाकरे यांच्या बद्दल केला आहे. त्यामुळे पहिले चिरीटला तुमच्या पंक्तीतुन बाहेर काढा नंतर शिवसैनिक नाव लावा असे मत दीपाली सय्यद यांनी व्यक्त केले आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.