Kishori Pednekar : तेजस ठाकरे महापालिका निवडणुकी पूर्वीच राजकारणात येणार?; किशोरी पेडणेकर नेमकं काय म्हणाल्या?

Kishori Pednekar : 236 जागांना मान्यता देणारं सर्वोच्च न्यायालय आहे. त्यापेक्षा वरचं कोर्ट मला माहीत नाही. सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला. स्वत:चा निर्णय कोर्ट कसा बदलेल? याकडे सर्वांचं लक्ष लागलं. आमचा नारा आहे, 150.

Kishori Pednekar : तेजस ठाकरे महापालिका निवडणुकी पूर्वीच राजकारणात येणार?; किशोरी पेडणेकर नेमकं काय म्हणाल्या?
तेजस ठाकरे महापालिका निवडणुकी पूर्वीच राजकारणात येणार?Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 04, 2022 | 10:44 AM

मुंबई: पक्षात फूट पडल्यानंतर शिवसेनेने (shivsena) गावागावात मोर्चेबांधणी करत पुन्हा एकदा पक्ष मजबूत करण्याचं काम सुरू केलं आहे. महापालिका निवडणुकीत कमीत कमी नुकसान होईल यावर शिवसेनेने भर दिला आहे. स्वत: आदित्य ठाकरे हे गावागावात जाऊन शिवसेनेची बाजू मांडून पक्ष मजबूत करताना दिसत आहेत. तर दसरा मेळाव्यापासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) हे राज्यभर प्रचार दौरे करणार आहेत. शिवसेनेच्या इतर नेत्यांकडेही जबाबदारी सोपवली जाणार आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव तेजस ठाकरेही राजकारणात सक्रिय होण्याची चर्चा आहे. शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनीही तेजस ठाकरे (tejas thackeray) राजकारणात येणार नसल्याची शक्यता फेटाळली नाही. तेजस ठाकरेंना राजकारणात कधी लॉन्चिंग करायचं हे उद्धव ठाकरेच ठरवतील असं सांगून पेडणेकर यांनी तेजस यांच्या राजकीय प्रवेशाचं गूढ वाढवलं आहे.

शिवसेना नेत्या, माजी महापौर किशोरी पेडणेकर या टीव्ही9 मराठीच्या कार्यालयात आल्या होत्या. त्यांनी टीव्ही9च्या बाप्पाची आरती केली. त्यानंतर गप्पा मारताना हे विधान केलं. तेजसची ओळख वेगळी आहे. तेजसने खेकड्यांचा शोध लावलाय. खेकड्यांना कसं वठणीवर आणायचं हे तेजसने बघितलंय. त्यांनी या खेकड्यांना वेगवेगळी नावंही दिली आहेत. ते राजकारणात एन्ट्री करतील की नाही हे त्यांचे वडील म्हणजे उद्धव ठाकरेच सांगू शकतील. पण तेजस ओजस्वी आहे, तेजस्वी आहे. त्यामुळे तेजस हे नाव राजकारणात कधी आलेच तर ते ओजस्वी रितीने काम करतीलच, असं किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं. तेजस यांची राजकारणातील एन्ट्री ग्रँड असेल असं सूचक विधानही त्यांनी केलं.

आमचा नारा 150

शिवसेनेने महापालिका निवडणुकीची जय्यत तयारी सुरू केल्याचंही त्यांनी सांगितलं. मुंबईत शिवसेना दमदारपणे उतरणार असल्याचंही त्या म्हणाल्या. 227 जागा लढवण्याबाबत हे आता म्हणतात. 236 जागांना मान्यता देणारं सर्वोच्च न्यायालय आहे. त्यापेक्षा वरचं कोर्ट मला माहीत नाही. सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला. स्वत:चा निर्णय कोर्ट कसा बदलेल? याकडे सर्वांचं लक्ष लागलं. आमचा नारा आहे, 150, असंही त्या म्हणाल्या.

हे सुद्धा वाचा

आम्ही सामाजिक फायदा अधिक बघतो

संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेच्या युतीवरही त्यांनी भाष्य केलं. आम्ही राजकीय फायद्यापेक्षा सामाजिक ऐक्य आणि सामाजिक फायदा बघत आलो आहोत. अनेक लोक आम्हाला ज्वॉईन झाले आहेत. हिंदुत्वासाठी लढणारे उद्धव ठाकरे हे एकमेव आहेत. काही लोक हिंदुत्वाची व्याख्या कशीही करतात. हिंदुत्व हा केवळ शब्द नाही. हिंदुत्व जगण्यासाठी आहे. हिंदुत्व मानसिक तयारीने केलेला धर्माचा संदेश आहे. धर्म रस्त्यावर येत नाही. धर्म प्रत्येकाच्या घराघरात आहे. हिंदुत्व मनामनात आहे. हृदयात राम आणि हाताला काम हा आमचा नारा आहे, असं त्या म्हणाल्या.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.