बाळासाहेब थोरात: शांत, संयमी, मनमिळावू, समन्वयी… पण राजकारणावर मांड असलेला नेता!

राज्याचे महसूल मंत्री, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात हे राज्यातील सुसंस्कृत राजकारण्यांपैकी एक आहेत. अत्यंत मितभाषी आणि मनमिळावू स्वभावाचे नेते म्हणून ते सर्वपरिचित आहेत. (Know About Congress man Balasaheb Thorat)

बाळासाहेब थोरात: शांत, संयमी, मनमिळावू, समन्वयी... पण राजकारणावर मांड असलेला नेता!
Balasaheb Thorat
Follow us
| Updated on: Aug 11, 2021 | 8:40 AM

मुंबई: राज्याचे महसूल मंत्री, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात हे राज्यातील सुसंस्कृत राजकारण्यांपैकी एक आहेत. अत्यंत मितभाषी आणि मनमिळावू स्वभावाचे नेते म्हणून ते सर्वपरिचित आहेत. विकासकामे करणारा द्रष्टा नेता म्हणून त्यांची ओळख आहे. ते प्रतिनिधीत्व करत असलेल्या संगमनेरला ‘शैक्षणिक नगरी’ म्हणून ओळखलं जातं. यावरून त्यांच्या विकासकामांची गरुड भरारी किती मोठी आहे हे दिसून येतं. बाळासाहेब थोरात यांच्या राजकीय कारकिर्दीवर टाकलेला हा प्रकाश. (Know About Congress man Balasaheb Thorat)

घरातच समाजकारण, राजकारणाचे संस्कार

बाळासाहेब थोरात यांचं संपूर्ण नाव बाळासाहेब ऊर्फ विजय भाऊसाहेब थोरात असं आहे. थोरात 68 वर्षाचे आहेत. त्यांनी कायद्याची पदवी घेतलेली आहे. बाळासाहेब थोरात यांचे वडील सहकारमहर्षी भाऊसाहेब विद्यार्थी दशेत राष्ट्र सेवा दलाच्या शाखेत जात असत. देशभक्तीच्या वातावरणात भारावून जाऊन त्यांनी स्वातंत्र चळवळीत उडी घेतली. स्वातंत्र आंदोलनातले त्यांचे काही सहकारी कम्युनिस्ट विचारांचे होते. त्यामुळे समाजवादी, कम्युनिस्ट विचारांचा संस्कार त्यांच्यावर होणं स्वाभाविक होत. काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर 1978मध्ये भाऊसाहेब थोरात आमदार झाले होते. गांधीजी म्हणत तसे शेवटच्या माणसाच्या विकासासाठी काम करत राहणं ही विचारांची शिदोरी वडिलांकडून बाळासाहेब थोरात यांनी पुढे चालवली, वाढवली. शेवटच्या माणसांना केंद्रस्थानी ठेवून, त्याला बरोबर घेऊन राजकारण करण्याच्या शैलीमुळे त्यांचं राजकारण, सत्ताकारण लोककेंद्री राहिलं. संगमनेर तालुक्यातील बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखालील संस्थांच्या प्रगतीचा आलेख बघितला तर आपल्या हे सहज लक्षात येत.

समन्वयी आणि संयमी नेता

बाळासाहेब थोरात यांच्या राजकारणाची शैली संयमी आणि समन्वयाची आहे. गटबाजीपासून ते नेहमीच लांब राहतात. त्यांचा स्वभाव मवाळ आहे. त्यामुळेच राजकारणात त्यांचा कोणी शत्रू नाही. शिवाय ते विरोधकांच्या रडारवरही कधीच नसतात. संगमनेरात गमतीने असं म्हणतात की थोरातांच्या राजकारणाचा कुणी विरोधकच नाही. संगमनेरात विरोधी पक्षच नाही. एकच पक्ष आहे तो म्हणजे थोरातांचा. थोरात यांनी संगमनेर तालुक्यात सर्व जाती गटांना सत्तेत वाटा मिळवून दिलाय. संगमनेर तालुक्यात धनगर, वंजारी, माळी, मुस्लिम या समूह गटांना त्यांनी साखर कारखाना, दूध संघ, शेतकी संघ अशा संस्थांमध्ये सत्तेत वाटा दिला. पंचायत समिती, जिल्हा परिषद, संगमनेर नगरपरिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बाळासाहेब थोरात यांनी विविध जाती गटांना प्रतिनिधित्व दिलेलं दिसतं.

40 वर्षे राजकारणात, 8 वेळा आमदार

गेली 40 वर्षे बाळासाहेब थोरात संसदीय राजकारणात आहे. 1985 ते 2019 पर्यंत ते संगमनेरचं नेतृत्व करत आहेत. 1985मध्ये ते अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढले होते. या निवडणुकीत विजय मिळविल्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. एकाही निवडणुकीत त्यांचा कधी पराभव झालेला नाही. ते आठव्यांदा संगमनेरचे आमदार झाले. एका मतदारसंघाचं इतक्या प्रदीर्घ काळ प्रतिनिधित्व करण्याचं रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहे. बाळासाहेब थोरात अत्यंत कमी वयात आमदार झाले. पंधरा वर्षं मंत्री पद, विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, अशोकराव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आणि आत्ता उद्धव ठाकरे अशा पाच मुख्यमंत्र्यांसोबत त्यांनी काम केलंय. महाराष्ट्र विधानसभेत शेतकरी कामगार पक्षाचे गणपतराव देशमुख प्रदीर्घ काळ (50वर्ष) आमदार होते, पण त्यांना दोनदा पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. मात्र, हा अपवाद वगळता यश नेहमी त्यांच्या वाट्याला आलं आहे. त्यांनी आतापर्यंत विविध मंत्रीपदे भूषविली आहेत. कृषीमंत्री, पशुसंवर्धनमंत्री, महसूलमंत्री अशी अनेक खाती त्यांनी प्रभावीपणे सांभाळली आहेत.

राहुल गांधींचे विश्वासू

बाळासाहेब थोरत हे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे विश्वासू म्हणूनही ओळखले जातात. त्यामुळे त्यांच्यावर राहुल गांधींनी अनेक जबाबदाऱ्या टाकल्या. थोरात यांच्याकडे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारीही देण्यात आली होती. तसेच गुजरात विधानसभा निवडणुकीत त्यांनी पक्षाचे प्रभारी म्हणूनही काम पाहिलं. मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये ते छाननी समितीत होते. या शिवाय त्यांना काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत कायम निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आलेलं आहे.

बाळासाहेब थोरात यांची कारकिर्द

>> 1985 संगमनेर विधानसभा मतदारसंघातून उमेदवार म्हणून बहुमतांनी विजयी. >> 1988 संगमनेर येथे 1 लाख लीटर क्षमतेच्या शासकिय दुग्ध शाळेची स्थापना, संगमनेर तालुका सहकारी दुध उत्पादक व प्रक्रिया संघावर चेअरमन म्हणून बिनविरोध निवड, जुलै 1993 पर्यंत सलग चेअरमनपदी यशस्वीरित्या धुरा सांभाळली >> 1989 भंडारदरा धरणाच्या पाण्याच्या फेरवाटपसंबंधी सन 1984 पासून सुरु केलेल्या चळवळीस यश मिळाले. >> 1990 संगमनेर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस आय पक्षाचे उमेदवार म्हणून प्रचंड बहुमताने विजय >> 1991 रेशीम उद्योगास सुरुवात, तालुक्यातील तुतीची लागवड करण्यास प्रारंभ >> 1992 शेती, दुग्ध व्यवसाय, पाणी, पशुसंवर्धन इत्यादी विषयानुषंगाने स्वत्झलँड, डेन्मार्क या देशाच अभ्यास दौरा >> 1993 संगमनेर भाग सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी बिनविरोध निवड, संगमनेर तालुका सहकारी पतसंस्थांच्या फेडरेशनच्या चेअरमनपदावर बिनविरोध निवड >> 1994 संगमनेर भाग सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदी फेरनिवड, तसेच चेअरमनपदी बिनविरोध निवड, नॅशनल हेवी इंजिनिअरिंग को ऑप लि नवी दिल्ली या संस्थेच्या संचालकपदी बिनविरोध निवड >> 1995 संगमनेर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस आय पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून बहुमताने विजयी, द ऑल इंडिया डिस्टीलरी असोसिएशन, नवी दिल्ली या संस्थेच्या संचालकपदी निवड >> 1997 नॅशनल हेवी इंजिनिअरिंग को ऑप नवी दिल्ली या संस्थेच्या संचालकपदी निवड >> 1999 संगमनेर भाग सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदी मताधिक्याने निवड, सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी निवड, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस आय कमिटीच्या सरचिटणीसपदी निवड, संगमेनर विधानसभा मतदारसंघातून चौथ्यांदा निवड, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात पाटबंधारे व लाभक्षेत्रात विकास राज्यमंत्री म्हणून समावेश >> 2000 उस्मानाबाद जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून नियुक्ती, नॅशनल हेवी इंजिनिअरिंग को ऑ लि नवी दिल्ली या संस्थेच्या संचालकपदी निवड, >> 2003 महाराष्ट्र राज्याच्या मंत्रीमंडळात पाटबंधारे व लाभक्षेत्र विकास राज्यमंत्री फेरनिवड >> 2004 संगमनेर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार आणि मताधिक्याने पुन्हा विजय, 9-11-2004 कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ >> 2005 4-02-2005 संगमनेर कारखान्याच्या संचालकपदी बिनविरोध निवड >> 2006 उस्मानाबाद व लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून निवज तसेच अहमदनगर जिल्ह्याच्या संपर्कमंत्रीपदी नियुक्ती, महाराष्टर राज्याचे मतदारसंघ पुनर्गठण समितीच्या सदस्यापदी निवड, महाराष्ट्र राज्य जलसंधारण सल्लागार परिषदेच्या कार्याध्यक्षपदी निवड >> 2008 देशभक्त किसनवीर यांच्या जयंतीनिमित्त दिला जाणारा कृतज्ञा पुरस्कार 21-08-2008 रोजी करंजखोप, जिल्हा सातारा येथे समारंभपूर्वक प्रदान, मा ना अशोकराव चव्हाण यांच्या मंत्रीमंडळात कृषी, जलसंधारण व राजशिष्टाचार खात्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून 8-12->> 2008 रोजी शपथ व समावेश >> 2009 संगमनेर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस आय पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून बहुमताने विजयी >> 2010 मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रीमंडळात महसूल व खार जमीन खात्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून निवड >> 2019 काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड, 24-10-2019 रोजी आठव्यांदा विधानसभेत विक्रमी मताधिक्याने निवड, काँग्रेसच्या गटनेतेपदी निवड >> 2010 मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रीमंडळात महसूल व खार जमीन खात्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून निवड >> 2019 काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड, 24-10-2019 रोजी आठव्यांदा विधानसभेत विक्रमी मताधिक्याने निवड, काँग्रेसच्या गटनेतेपदी निवड (Know About Congress man Balasaheb Thorat)

संबंधित बातम्या:

उपमहापौर ते थेट मंत्री; ‘जायटं किलर’ विद्या ठाकूर यांचा पॉलिटिकल ग्राफ वाचा!

‘पॉवरफुल्ल’ महिला राजकारणी, तीनवेळा आमदार, पण मंत्रीपद नाही; जाणून घ्या प्रणिती शिंदेंची राजकीय कारकिर्द

राजकारणात प्रवेश कसा झाला?, आदिती तटकरेंनी सांगितलं गुपित; वाचा राजकीय प्रवासाची चित्तरकथा!

(Know About Congress man Balasaheb Thorat)

'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.