Maratha Morcha : शाहू महाराजांनी आरक्षणाची बीजं कशी पेरली?; वाचा, सविस्तर

मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा मराठा समाजाचे आंदोलन सुरू झालं आहे. कोल्हापुरात छत्रपती शाहू महाराज (chhatrapati shahu maharaj) यांच्या समाधीस्थळाचं दर्शन घेऊन या आंदोलनाला सुरुवात झाली आहे.

Maratha Morcha : शाहू महाराजांनी आरक्षणाची बीजं कशी पेरली?; वाचा, सविस्तर
chhatrapati shahu maharaj
Follow us
| Updated on: Jun 16, 2021 | 11:04 AM

मुंबई: मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा मराठा समाजाचे आंदोलन सुरू झालं आहे. कोल्हापुरात छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळाचं दर्शन घेऊन या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. शाहू महाराज हे आरक्षणाचे जनक आहेत. त्यांनी भारतात आरक्षणाची बीजं पेरली आहेत. शाहू महाराजांनी ही आरक्षणाची बीजं कशी पेरली त्याचा घेतलेला हा आढावा. (know about how chhatrapati shahu maharaj started The First Reservations In India?)

महात्मा फुलेंनी केली आरक्षणाची पहिली मागणी

शाहू महाराज यांनी आरक्षणाची बीजं कशी रोवली, यावर प्रसिद्ध विचारवंत प्रा. हरी नरके यांनी प्रकाश टाकला आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांनी 1869 साली म्हणजे शाहू महाराजांच्या जन्माच्या पाच वर्ष आधी पहिल्यांदा आरक्षणाची मागणी केली होती. सामाजिक न्याय प्रस्थापित करायचा असेल तर जे मागासवर्गीय आहेत. त्यांना प्रतिनिधीत्व द्यावं लागेल, अशी मागणी महात्मा फुलेंनी केली होती, असं प्रसिद्ध विचारवंत प्रा. हरी नरके यांनी सांगितलं. शाहू महाराज गादीवर आले आणि त्यांनी आरक्षण दिलं. शाहू महाराजांचे वडील कोल्हापूरचे दिवाण होते. त्यांचं आणि महात्मा फुलेंचं चांगले संबंध होते. शाहू महाराजांवर लहानपणापासूनच सत्यशोधक समाजाचे संस्कार होते. सत्यशोधक चळवळीचे मोठे लोक… केशवराव विचारे आणि भास्करराव जाधव हे दोघेही शाहू महाराजांचे डावे उजवे हात होते. दोघेही कट्टर सत्यशोधक होते, अशी माहिती त्यांनी दिली.

वेदोक्त प्रकरण आणि शाहू महाराज

महाराजांना वेदोक्त प्रकरणात तुम्ही क्षत्रिय नाही, असं भटजीने म्हटलं होतं. त्यानंतर केस झाली आणि शाहू महाराजांनी जिंकली. पाच वर्ष हा सामाजिक संघर्ष झाला. त्या सामाजिक संघर्षातून आरक्षण निर्माण झालं. मागासलेला समाज आहे, त्यांच्यासाठी काही तरी व्यवस्था करावी लागेल, असं शाहू महाराजांचं म्हणणं पडलं. त्यातून 26 जुलै 1902 रोजी त्यांनी हा निर्णय घेतला, असं नरके म्हणाले.

आरक्षणाची सुरुवात कधी झाली

राजर्षी शाहू महाराजांनी 26 जुलै 1902 रोजी आरक्षणाचा आदेश काढला. त्यानंतर आरक्षणाला सुरुवात झाली. शाहू महाराजांची आठरापगड जातींना आरक्षण देऊन मुख्यप्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या आरक्षणाला घटनात्मक संरक्षण दिलं.

काय होता हुकूम?

‘…महाराज सरकार असा हुकूम करतात की, हा हुकूम पोहोचलेल्या तारखेपासून रिक्त झालेल्या जागांपैकी शेकडा 50 जागा मागासलेल्या लोकांस भराव्या. ज्या ऑफिसमध्ये मागासलेल्या वर्गाच्या अंमलदाराचे प्रमाण सध्या शेकडा 50 पेक्षा कमी असेल तर पुढची नेमणूक या वर्णातील व्यक्तीची करावी. या हुकमाच्या प्रसिद्धीनंतर केलेल्या सर्व नेमणुकांचे तिमाही पत्रक प्रत्येक खात्याच्या मुख्याने सरकारकडे पाठवावे. मागासलेल्या वर्णाचा अर्थ ब्राह्मण, प्रभू, शेणवी, पार्शी व दुसरे पुढे असलेले वर्ण खेरीज करून सर्व वर्ण असा समजावा.’ (know about how chhatrapati shahu maharaj started The First Reservations In India?)

संबंधित बातम्या:

Maratha Morcha Kolhapur Live : मराठा मोर्चाला सुरुवात, संभाजीराजे, प्रकाश आंबेडकर आंदोलनस्थळी दाखल

Maratha Morcha : मराठा आंदोलनात प्रकाश आंबेडकर, चंद्रकांतदादांची एन्ट्री, काळे कपडे घालून मराठा आंदोलकांचा मूकमोर्चा सुरू

Maharashtra News LIVE Update | महाराष्ट्रातील टॉपच्या घडामोडी

(know about how chhatrapati shahu maharaj started The First Reservations In India?)

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.