विद्यार्थीदशेत ब्रिटनच्या कार्डिफ विद्यापीठात विजयी, चारवेळा आमदार; वाचा, कोण आहेत जयकुमार रावल?

राज्याचे माजी पर्यटन मंत्री जयकुमार रावल हे तब्बल चार वेळा निवडून आलेले आहेत. (know about jaykumar rawal, who became royal family)

विद्यार्थीदशेत ब्रिटनच्या कार्डिफ विद्यापीठात विजयी, चारवेळा आमदार; वाचा, कोण आहेत जयकुमार रावल?
jaykumar rawal
Follow us
| Updated on: Apr 26, 2021 | 4:01 PM

मुंबई: राज्याचे माजी पर्यटन मंत्री जयकुमार रावल हे तब्बल चार वेळा निवडून आलेले आहेत. नगरसेवक ते कॅबिनेट मंत्रीपदापर्यंत त्यांनी मजल मारली आहे. धुळे जिल्ह्यातील बडं प्रस्थ म्हणून ते प्रसिद्ध आहेत. वादांमुळे नेहमी प्रसिद्धीच्या झोतात राहिलेल्या जयकुमार रावल यांच्या कारकिर्दीचा घेतलेला हा आढावा. (know about jaykumar rawal, who became royal family)

मुंबई, पुणे, ब्रिटनमध्ये शिक्षण

जयकुमार रावल यांचा जन्म 16 जानेवारी 1975 रोजी दोंडाईचा, (तालुका-शिंदखेडा, जिल्हा-धुळे) येथे झाला. बी.कॉम., एम्.बी.ए.(यु.के.). पर्यंत त्यांचे शिक्षण झाले आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी व अहिराणी या भाषा त्यांना अवगत आहेत. रावल हे विवाहित असून त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. शेती व उद्योग हे त्यांचे व्यवसाय आहेत. रावल हे 8-शिंदखेडा, जिल्हा-धुळे या मतदार संघातून चारवेळा विधानसभेवर निवडून आले आहेत. त्यांचे शिक्षण पंचगणी, मुंबई, पुणे आणि यु.के.मधील कार्डीफ युनिर्व्हसिटीमध्ये झालेले आहे. ते यु.के. मधील कार्डीफ विद्यापीठातून विजयी होणारे ब्रिटीशोत्तर पहिले विद्यार्थी आहेत.

ऐतिहासिक वारसा

रावल यांचे आजोबा सहकारमहर्षी दादासाहेब रावल व काका वृक्षमित्र बापूसाहेब रावल हे देखील आमदार होते. याशिवाय त्यांना ऐतिहासिक वारसा देखील लाभला असून ते खान्देशातील राऊळ या संस्थानिक कुटुंबातून येतात.

संस्था आणि पदे

स्वोद्धारक विद्यार्थी संस्थेचे सचिव, राणीमाँसाहेब मनुबादेवी रावल सह. पतसंस्था लि. दोंडाईचाचे संस्थापक, चेअरमन, कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक, धुळे जिल्हा सहकारी बँक लिमिटेडचे संचालक आदी पदांवर ते कार्यरत आहेत.

वयाच्या 25 व्या वर्षी नगरसेवक

रावल यांच्या राजकारणाची सुरुवात नगरसेवकपदापासून झाली आहे. वयाच्या 25 व्या वर्षी ते दोंडाईचा नगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले होते. ते 2004 पासून ते आतापर्यंत विधानसभेचे सदस्य आहेत. 2004 मध्ये विधिमंडळ सदस्यांची युथ फोरम नावाने संघटना स्थापन केली. या फोरममध्ये माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री पंकजा मुंडे, राम शिंदे, प्रणिती शिंदे, पंकज भुजबळ आदी सर्व पक्षीय आमदार होते. ते पंचायत राज समिती, अंदाज समिती, सार्वजनिक उपक्रम समिती व क्रीडा धोरण समितीचे सदस्य होते. ऑक्टोबर 2014 मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर त्यांची फेरनिवड झाली. जून 2015 पासून ते रोजगार हमी योजना समितीचे समिती प्रमुख आहेत. देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये त्यांच्याकडे अन्न व औषध प्रशासन, पर्यटन, राजशिष्टाचार व रोजगार हमी योजना अशी महत्त्वपूर्ण खात्यांचे कॅबिनेट मंत्रीपद होते.

रावल आणि वाद

रावल हे विविध गुन्ह्यांमुळेही नेहमी वादात राहिले आहेत. त्यांच्यावर वकिलावर प्राणघातक हल्ला, जमाव जमवून दंगल घडविण्याचा प्रयत्न, खुनाचा प्रयत्न, नगरसेविकेचे अपहरण, बँकेच्या कर्जवाटपात अफरातफर, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आठ ते दहा गुन्हे होते. दोंडाईचा पोलीस ठाण्यात त्यांच्यावर काही गुन्हे दाखल आहेत. 2013मध्ये विधिमंडळात पोलीस अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकणी त्यांना निलंबित करण्यात आलं होतं.

पक्षातील पदे

त्यांनी भाजयुमोचे राष्ट्रीय महामंत्री म्हणून काम पाहिलं आहे. धुळे जिल्हा भाजपाचे जिल्हाध्यक्ष पद देखील त्यांनी यापूर्वी भूषविले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष असताना त्यांच्या कार्यकारिणीतही आमदार रावल महामंत्री होते. त्यांच्याकडे कर्नाटक आणि राजस्थान या दोन राज्यांची जबाबदारी होती. गेल्यावर्षीच त्यांची भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. (know about jaykumar rawal, who became royal family)

संबंधित बातम्या:

युवा नेता ते राज्यमंत्री… वाचा, डॉ. विश्वजीत कदम यांचा राजकीय प्रवास

आठवेळा आमदार, तरीही साधी राहणीमान; जाणून घ्या कोण आहेत के. सी. पाडवी?

मोदी लाटेतही निवडून आले, आता थेट मंत्री; वाचा, सुनील केदार यांचा राजकीय प्रवास

(know about jaykumar rawal, who became royal family)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.