मोदी लाटेतही निवडून आले, आता थेट मंत्री; वाचा, सुनील केदार यांचा राजकीय प्रवास

काही राजकारण्यांना घरातूनच राजकारणाचं बालकडू मिळालेलं असतं. (know about maharashtra minister Sunil Chhatrapal Kedar)

मोदी लाटेतही निवडून आले, आता थेट मंत्री; वाचा, सुनील केदार यांचा राजकीय प्रवास
Sunil Chhatrapal Kedar
Follow us
| Updated on: Apr 23, 2021 | 6:57 PM

मुंबई: काही राजकारण्यांना घरातूनच राजकारणाचं बालकडू मिळालेलं असतं. त्यामुळे त्यांना राजकारणात फार संघर्ष करावा लागत नाही. पहिली निवडणूक तरी ते राजकीय वारसा असल्याने जिंकतात. नंतर मात्र, त्यांना राजकारणात टिकून राहण्यासाठी स्वत:ला सिद्ध करावं लागतं. राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनीही स्वत:ला सिद्ध करून दाखवलं आहे. इतकंच नव्हे तर राजकीय वारसाही जपून ठेवला आहे. सुनील केदार यांच्या राजकीय कारकिर्दीचा घेतलेला हा आढावा. (know about maharashtra minister Sunil Chhatrapal Kedar)

कौटुंबिक पार्श्वभूमी

सुनील छत्रपाल केदार यांचा जन्म 7 एप्रिल 1961मध्ये नागपूरला झाला. बीएससी (कृषी), एमबीएपर्यंत त्यांनी शिक्षण घेतलं आहे. पत्नी, दोन मुली असा त्यांचा परिवार आहे. शेती आणि लघू उद्योग हा त्यांचा प्रमुख व्यवसाय आहे. सुनील केदार हे काँग्रेसचे दिग्गज नेते आहेत. माजी मंत्री छत्रपाल केदार यांचे ते सुपुत्र. सुनील केदार नागपुरातील सावनेर मतदारसंघातून आमदार आहेत. त्यांच्याकडे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रालयाच्या कॅबिनेट मंत्रिपदाची धुरा आहे. सुनील केदार यांच्याकडे वर्ध्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी आहे.

जिल्हा परिषदेपासून राजकारणास सुरुवात

सुनील केदार यांनी काँग्रेसमधूनच त्यांच्या राजकीय कारकिर्दीस सुरुवात केली. 1992मध्ये ते जिल्हा परिषदेचे सदस्य झाले होते. त्यांनी त्याच वर्षी गणेश प्रासादिक शिक्षण संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी 4 माध्यमिक शाळा आणि महाविद्यालय सुरू केले. त्यांनी राजकारणाबरोबरच समाजकारणावरही अधिक फोकस केला. दुष्काळ पीडित शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी शेतकरी परिषदांचे आयोजन केले. दुर्गम भागात वीज पुरवठा सुरू व्हावा, शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव मिळावा आदी प्रश्नांवर त्यांनी लढेही उभारले.

राज्यमंत्री ते कॅबिनेट मंत्री

1995 ते 2014 या काळात 1999चा अपवाद वगळता सुनील केदार हे सावनेर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. 1999 मध्ये भाजपचे आमदार देवराव आसोले यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यानंतर भाजपने कधीच या मतदारसंघात विजय मिळवला नाही. 2014 मध्ये संपूर्ण देशात पंतप्रधा नरेंद मोदींची लाट होती. त्या लाटेत अनेक दिग्गजांना घरी बसावं लागलं. मात्र, केदार यांनी या लाटेतही निसटता का होईना विजय मिळवून सीट राखली होती. 1995 -99, 2004-2009, 2009-2014, 2014-2019 पर्यंत त्यांनी विधानसभेचे सदस्य म्हणून काम पाहिलं. मार्च 1995 ते जून 1995 ते ऊर्जा आणि परिवहन राज्यमंत्री होते. जून1995 ते 1996 पर्यंत ऊर्जा, बंदर आणि परिवहन राज्यमंत्री होते.

केदार यांचे वडील गडकरींचे गुरू

त्यांचे वडील छत्रपाल ऊर्फ बाबासाहेब केदार हे विदर्भातील सहकार महर्षी होते. त्यांनी विदर्भात सहकाराची चळवळ वाढवली. भाजपचे नेते आणि केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी हे छत्रपाल केदार यांना गुरु मानायचे. गडकरी आणि सुनिल केदार यांचे सलोख्याचे संबंध आहेत. त्यामुळे केदार हे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा अधूनमधून होत असतात.

मध्य प्रदेशची जबाबदारी

मध्य प्रदेशातील विधानसभा पोटनिवडणुकीत समन्वयाची जबाबदारी काही दिवसांपूर्वीच सुनील केदार यांच्याकडे सोपवण्यात आली होती. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी सुनील केदार यांची नियुक्ती केली होती. मुरैना आणि ग्वाल्हेर या दोन्ही जिल्ह्यांचे निवडणूक समन्वयक म्हणून सुनील केदार काम पाहत होते. म्हणजेच नुकतेच भाजपवासी झालेले राज्यसभा खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांना सुनील केदार यांचे थेट आव्हान होते. मुरैना जिल्ह्यातील जौरा, सुमावली, मुरैना, दिमनी आणि अंबाह, तर ग्वाल्हेर जिल्ह्यातील ग्वाल्हेर, ग्वाल्हेर पूर्व आणि डबरा या विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली. यापूर्वीही सुनील केदार यांनी बिहार निवडणुकीत काँग्रेसचे समन्वयक म्हणून काम केले आहे. त्यामुळे केदार यांच्याकडे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा जाणार असल्याची चर्चाही होती. (know about maharashtra minister Sunil Chhatrapal Kedar)

संबंधित बातम्या:

पवार घराण्यातील चौथी पिढी, पहिल्याच निवडणुकीत भाजपच्या गडाला सुरुंग; जाणून घ्या रोहित पवारांबद्दल

रिक्षाचालक ते नगरविकास मंत्री; वाचा, ‘ठाणे’दार एकनाथ शिंदेंचा प्रवास

पहाटेच्या शपथविधीतून थेट पवारांना भेटले, पाचवेळा आमदार, चौथ्यांदा मंत्री; वाचा, कोण आहेत राजेंद्र शिंगणे

(know about maharashtra minister Sunil Chhatrapal Kedar)

अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.