राजकीय पार्श्वभूमी नसतानाही विधानसभेला विजयाची हॅट्रीक, प्रशांत बंब यांना हे कसं शक्य झालं?; वाचा सविस्तर

प्रशांत बंब हे भाजपचे औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर विधानसभा मतदारसंघातील आमदार आहेत. तरुण तडफदार, आक्रमक आणि अभ्यासू आमदार म्हणून त्यांची ख्याती आहे. (know how maharashtra bjp Mla Prashant Bamb success in politics?)

राजकीय पार्श्वभूमी नसतानाही विधानसभेला विजयाची हॅट्रीक, प्रशांत बंब यांना हे कसं शक्य झालं?; वाचा सविस्तर
Prashant Bamb
Follow us
| Updated on: Aug 12, 2021 | 8:52 AM

मुंबई: प्रशांत बंब हे भाजपचे औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर विधानसभा मतदारसंघातील आमदार आहेत. तरुण तडफदार, आक्रमक आणि अभ्यासू आमदार म्हणून त्यांची ख्याती आहे. घरात कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना राजकारणात येऊन सलग तिसऱ्यांदा विधानसभेची निवडणूक बंब यांनी जिंकली. तसेच राजकारणात स्वत:ला सिद्ध केलं. हे कसं घडलं? याचाच घेतलेला हा आढावा. (know how maharashtra bjp Mla Prashant Bamb success in politics?)

राजकीय पार्श्वभूमी नाही

प्रशांत बंब यांना कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही. एमबीए झाल्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला. विशेष म्हणजे राजकारणात आल्यावर त्यांना यश मिळत गेले आणि त्यांचं नेतृत्वही तयार झालं. 2002मध्ये लासूर स्टेशन ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच, सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, 2005मध्ये जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम समितीचे सभापतीपद आदी पदे त्यांनी भूषविली आहेत. स्थानिक प्रशासनाचा अनुभव असल्यानेच राज्य स्तरावर काम करताना त्याचा त्यांना फायदा होतो.

सलग तिसऱ्यांदा विजयी

2009, 2014 आणि 2019मध्ये ते सलग तीन वेळा विधानसभेवर निवडून आले आहेत. मतदारसंघातील नागरिकांशी सातत्याने असलेला संपर्क, कार्यकर्त्यांची मजबूत फळी उभारण्यात आलेलं यश, सर्वांच्या सुखादुखात धावून जाणे आणि मनमिळावूपणा यामुळे ते आपला मतदारसंघ राखू शकले आहेत. हेच त्यांच्या यशाचं गमक आहे. विशेष म्हणजे गंगापूर विधानसभा मतदारसंघात हॅट्रीक साधण्याचा विक्रमही त्यांनी केला आहे.

मंत्रिपदाची हुलकावणी

प्रशांत बंब सलग दुसऱ्यांदा निवडून आल्यानंतर 2014मध्ये राज्यातील फडणवीस सरकारमध्ये त्यांचा समावेश होईल असं वाटत होतं. मात्र, बराच कालावधीनंतर राज्यात भाजपची सत्ता आली होती. त्यामुळे मंत्रिमंडळात नव्या जुन्या नेत्यांची मोट बांधणं आवश्यक होतं. त्यातच शिवसेना मित्रपक्ष असल्याने सेनेकडे काही मंत्रिपदं गेली. त्यामुळे मंत्रिपदाच्या वाटपाची तारेवरची कसरत देवेंद्र फडणवीस यांना करावी लागली. त्यामुळे बंब यांना संधी मिळू शकली नाही. विशेष म्हणजे फडणवीसांची जवळीक असूनही त्यांना मंत्रिमंडळात संधी मिळू शकली नाही. मात्र, तिसऱ्यांदा निवडून आल्यानंतर बंब आता मंत्री होणारच असं वाटत होतं. परंतु, राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं. भाजपला विरोधात जाऊन बसावं लागल्याने यावेळीही बंब यांचं मंत्रिपदाचं स्वप्नं भंगलं.

काँटे की टक्कर आणि विजय

2019 मधील गंगापूर विधानसभा निवडणूक तशी बंब यांच्यासाठी सोपी नव्हती. कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांचं त्यांच्यासमोर आव्हान होतं. मात्र, त्यांनी या निवडणुकीत बाजी मारून गंगापूर आणि खुलताबाद तालुक्यात आपलेच वर्चस्व असल्याचं त्यांनी दाखवून दिलं आहे. मतांचं ध्रुवीकरण करून बंब यांना शह देण्याचा प्रयत्नही यावेळी झाला. पण बंब त्याला बधले नाही. त्यांनी विरोधकांचे सर्व प्रयत्न फोल ठरवले. शिवसेनेतून काँग्रेसमध्ये येऊन निवडणूक लढवणाऱ्या संतोष माने यांचा त्यांनी मोठा पराभव केला.

अभ्यासू आमदार

बंब हे आक्रमक तसेच अभ्यासू आमदारही आहेत. मराठवाड्याच्या हक्काच्या समन्यायी पाण्याचा प्रश्न, असो की मतदारसंघातील विकासाचा प्रश्न त्यांनी सातत्याने विधानसभा आणि विधानसभेबाहेर त्यावर आवाज उठवला आहे. जायकवाडीच्या पाण्यासाठी न्यायालयीन लढाई असो की गंगापूर साखर कारखाना खाजगी उद्योजकांच्या घशातून काढण्यासाठी केलेले प्रयत्न असो… या कामांमुळे ते नेहमीच चर्चेत राहिले आहेत. कोणत्याही विषयावर बोलण्यापूर्वी त्या विषयाची पुरेपूर तयारी करूनच ते विधानसभेत येतात. प्रत्येक मुद्दा पटवून देताना ते अनेकदा आक्रमक होतानाही दिसतात.

घोटाळ्याप्रकरणी अडचणीत

गंगापूर सहकारी साखर कारखान्यातील घोटाळ्याप्रकरणी प्रशांत बंब यांच्यासह संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे ते अडचणीत आले होते. गंगापूर साखर कारखान्याची विक्री होऊ नये यासाठी सभासदांनी काही पैसे जमा केले होते. ते पुन्हा कारखान्याच्या खात्यावर आले. तेव्हा ही रक्कम 15 कोटी 75 लाख होती. पण, खात्यावर आलेल्या या पैशांचा कारखान्याशी काहीही संबंध नाही असं कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत बंब आणि त्यांच्या काही संचालकांनी सांगितलं. यामुळे सभासदांनी एकत्र येत पैशांचा अपहार केल्याचा आरोप आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 2013 मध्ये कारखान्याची विक्री थांबवण्यासाठी सभासदांची डीआरटी कोर्टाकडे पैसे जमा केले होते. पण, त्यानंतर विक्रीचा व्यवहार रद्द झाला. म्हणून कोर्टाकडून पुन्हा कारखान्याच्या खात्यामध्ये पैसे आले. यावर प्रशांत बंब आणि त्यांच्यासह काही जणांनी यावर कारखान्याचे पैसे नसल्याचं म्हटलं. या प्रकरणात 14 सभासदांची फसवणूक झाल्याचाही आरोप आहे. (know how maharashtra bjp Mla Prashant Bamb success in politics?)

संबंधित बातम्या:

बाळासाहेब थोरात: शांत, संयमी, मनमिळावू, समन्वयी… पण राजकारणावर मांड असलेला नेता!

उपमहापौर ते थेट मंत्री; ‘जायटं किलर’ विद्या ठाकूर यांचा पॉलिटिकल ग्राफ वाचा!

‘पॉवरफुल्ल’ महिला राजकारणी, तीनवेळा आमदार, पण मंत्रीपद नाही; जाणून घ्या प्रणिती शिंदेंची राजकीय कारकिर्द

(know how maharashtra bjp Mla Prashant Bamb success in politics?)

भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....