Rajya Sabha Election 2022: कोण कुणाकडे?, अपक्षांची नावे वाचा एका क्लिकवर: एमआयएमच्या मतांसाठी नवा फॉर्म्युला काय?

Rajya Sabha Election 2022: एमआयएमकडे दोन आमदार आहेत. फारुक शाह आणि मोहम्मद इस्माईल हे दोन एमआयएमचे आमदार आहेत. एमआयएम सध्या राष्ट्रवादीशी संलग्न आहेत. शिवसेना आणि एमआयएमची विचारधारा एक नसल्याने एमआयएमची मते घेणं शिवसेनेसाठी डोकेदुखी झाली आहे.

Rajya Sabha Election 2022: कोण कुणाकडे?, अपक्षांची नावे वाचा एका क्लिकवर: एमआयएमच्या मतांसाठी नवा फॉर्म्युला काय?
अपक्षांची नावे वाचा एका क्लिकवर Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 09, 2022 | 7:57 PM

मुंबई: राज्यसभेच्या निवडणुकीसाठी (Rajya Sabha Election) अवघे काही तास उरले आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार सेटिंग सुरू केली आहे. अपक्ष आणि छोट्या पक्षाचे आमदार आपल्या हातातून निसटू नयेत म्हणून त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या जात आहेत. त्यांना आश्वासने दिली जात आहेत. काही नेत्यांनी तर थेट आमदार राहत असलेल्या हॉटेलातच आजची रात्र मुक्काम करण्याचा निर्णय घेतला आहे. तर ज्या ट्रायडंट हॉटेलात शिवसेना (shivsena) आमदार आणि अपक्ष आमदारांना ठेवण्यात आले, त्याच हॉटेलात भाजपचे (bjp) उमेदवार धनंजय महाडिक उतरल्याने शिवसेनेसाठी दिवसच नाही तर रात्रंही वैऱ्याची झाली आहे. तब्बल 23 वर्षानंतर राज्यसभेची निवडणूक होत आहे. मतदानाची प्रक्रिया अत्यंत तांत्रिक असल्याने या आमदारांना मतदानाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच आपल्यासोबत किती अपक्ष आहेत आणि छोट्या पक्षांचे किती आमदार आहेत याची गोळाबेरीजही केली जात आहे.

कोण कुणाच्या बाजूने?

महाविकास आघाडीच्या बाजूने

हे सुद्धा वाचा

अबू आजमी (सपा) रईस शेख (सपा) गीता जैन (अपक्ष) देवेंद्र भुयार (स्वाभिमानी) मंजुळा गावित (अपक्ष) आशिष जयस्वाल (अपक्ष) किशोर जोरगेवार (अपक्ष) नरेंद्र भोंडकर (अपक्ष) श्यामसुंदर शिंदे (अपक्ष) संजय मामा शिंदे (अपक्ष) चंद्रकांत पाटील (जळगाव) विनोद निकोले (माकप) विनोद अग्रवाल (अपक्ष) राजकुमार पटेल (अपक्ष)

भाजपच्या बाजूने

रवी राणा (अपक्ष) रत्नाकर गुट्टे (रासप) महेश बालदी (अपक्ष) प्रकाश आवाडे (अपक्ष) विनय कोरे (जनसुराज्य पार्टी) प्रमोद पाटील (मनसे) राजेंद्र राऊत (अपक्ष)

कोण तळ्यातमळ्यात?

हितेंद्र ठाकूर (बविआ) क्षितीज ठाकूर (बविआ) राजेश पाटील (बविआ) बच्चू कडू (प्रहार)

एमआयएमसाठी नवा फॉर्म्युला

एमआयएमकडे दोन आमदार आहेत. फारुक शाह आणि मोहम्मद इस्माईल हे दोन एमआयएमचे आमदार आहेत. एमआयएम सध्या राष्ट्रवादीशी संलग्न आहेत. शिवसेना आणि एमआयएमची विचारधारा एक नसल्याने एमआयएमची मते घेणं शिवसेनेसाठी डोकेदुखी झाली आहे. त्यामुळे नवा फॉर्म्युला आता समोर येताना दिसत आहे. एमआयएमने राष्ट्रवादीच्या प्रफुल्ल पटेलांना मतदान करावं. त्याबदल्यात राष्ट्रवादीच्या दोन आमदारांनी शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान करावं, असा फॉर्म्युला आता समोर येत असून त्यावर एमआयएम आणि राष्ट्रवादीच्या नेत्यात चर्चा होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. हा फॉर्म्युला मान्य झाल्यास एमआयएमची मते ऐनकेनप्रकारे आघाडीलाच मिळणार आहेत.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.