एकावर महिलेला फसवल्याची तक्रार तर दुसऱ्या ईडीच्या फेऱ्यात, शिंदे गटाचे गटनेते, प्रतोदांची वाचा चर्चेतली ‘फाईल’

खासदार राहुल शेवाळे यांच्यावर एका महिलेने फसवणुकीचा आरोप केला होता. या महिलेने शेवाळेंवर बलात्काराचा आरोप केला होता. तसेच साकीनाका पोलिसात या महिलेने तक्रार दिली होती. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती.

एकावर महिलेला फसवल्याची तक्रार तर दुसऱ्या ईडीच्या फेऱ्यात, शिंदे गटाचे गटनेते, प्रतोदांची वाचा चर्चेतली 'फाईल'
एकावर महिलेला फसवल्याची तक्रार तर दुसऱ्या ईडीच्या फेऱ्यात, शिंदे गटाचे गटनेते, प्रतोदांची वाचा चर्चेतली 'फाईल'Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 19, 2022 | 7:28 PM

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी बंड केल्यानंतर शिवसेना पक्षही आपल्या ताब्यात कसा येईल याकडे लक्ष केंद्रीत केलं. आपला गट कायम राखण्यासाठी त्यांनी सर्वात आधी हालचाली केल्या. भरत गोगावले यांच्याकडे विधीमंडळाचं मुख्यप्रतोदपद दिलं. स्वत: गटनेते झाले. आता शिवसेनेच्या (shivsena) 12 खासदारांनी शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. या खासदारांनी शिंदे यांना पाठिंबा दिल्यानंतर लोकसभा अध्यक्षांची भेट घेतली. शिवसेनेच्या लोकसभेतील गटनेतेपदी राहुल शेवाळे (rahul shewale) यांची नियुक्ती केली. तसेच मुख्यप्रतोदपदी भावना गवळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, शिंदे यांच्या गटाचे प्रतोद आणि गटनेत्यामागे काही ना काही शुक्लकाष्ठ लागलेलं आहे. खासदार राहुल शेवाळे यांच्यावर एका महिलेला फसवल्याचा गुन्हा आहे. तर भावना गवळी यांच्या मागे ईडीचा ससेमिरा आहे.

महिलेची फसवणूक, काय आहे प्रकरण?

खासदार राहुल शेवाळे यांच्यावर एका महिलेने फसवणुकीचा आरोप केला होता. या महिलेने शेवाळेंवर बलात्काराचा आरोप केला होता. तसेच साकीनाका पोलिसात या महिलेने तक्रार दिली होती. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. मात्र, या प्रकरणातून शेवाळे यांना दिलासा मिळाला आहे. या महिलेविरोधातच साकीनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खंडणीवसूल करण्याच्या इराद्याने या महिलेने आरोप केल्याचा दावा शेवाळे यांनी केला आहे.

हे सुद्धा वाचा

अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर सदर महीलेविरोधात साकीनाका पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे. पुढील कारवाई सुरू आहे. पोलिसांनी या प्रकरणी दाखल केलेल्या एफआयआर बाबत समाधान व्यक्त करून हा सत्याचा विजय आहे, अशा शब्दांत खासदार शेवाळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली होती. खासदार शेवाळे यांनी 12 मे रोजी अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयात सदर महिलेविरोधात दाद मागितली होती. न्यायालयाच्या आदेशानंतर, आर्थिक फायद्यासाठी जाणीवपूर्वक प्रतिष्ठित व्यक्तीची प्रतिमा मलिन करणे, शेवाळे यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांना धमकी देणे आणि ब्लॅकमेल करणे या आरोपांखाली साकीनाका पोलीस ठाण्यात सदर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गवळींवर अनियमिततेचा आरोप

भावना गवळी यांच्या घरावरही ईडीने छापेमारी केली होती. गवळी यांच्या ट्रस्टमध्ये 17 कोटींच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडून तपास करण्यात येत आहे. सामाजिक कार्यकर्ते हरिष सारडा यांनी भावना गवळी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. नॅशनल को ऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कोऑपरेशन कडून बालाजी सहकारी पार्टिकल बोर्डनं 43.35 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. हरिष सारडा यांनी भावना गवळी यांनी एनसीडीसीकडून कर्ज घेतलं होतं मात्र, ती कंपनी कधीच सुरु केली नव्हती, असा दावा या तक्रारीत करण्यात आला होता.

भावना गवळींवर भावना अ‌ॅग्रो प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस कंपनीमध्ये अनियमितता केल्याचा देखील आरोप करण्यात आला होता. या कंपनीसाठी दोन वेगवेगळ्या बँकांकडून 7.5 कोटींचं कर्ज घेण्यात आलं होतं. नंतर ही कंपनी भावना गवळी यांच्या खासगी सचिवाला 7.9 कोटी रुपयांना विकल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी गवळी यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आलं होतं. मात्र, त्या ईडीसमोर हजर झाल्या नव्हत्या. याप्रकरणी गवळी यांच्या एका सहकाऱ्याला अटकही झाली होती.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.