Fact Check : पंतप्रधान मोदींना हृदयनाथ मंगेशकरांबद्दल चुकीची माहिती? आकाशवाणीतून मंगेशकरांना खरंच काढून टाकलं होतं?

Hridaynath Mangeshkar : मोदींनी केलेला दावा, त्यानंतर राऊतांनी केलेलं वक्तव्य यामुळे पंडित हृदयनाथ मंगेशकरांच्या नोकरीबाबत संभ्रम निर्माण झालाय. म्हणून पंडीत हृदयनाथ मंगेशकर हे आकाशवाणीत नोकरीला होते की नव्हते? याची केलेली पडताळणी!

Fact Check : पंतप्रधान मोदींना हृदयनाथ मंगेशकरांबद्दल चुकीची माहिती? आकाशवाणीतून मंगेशकरांना खरंच काढून टाकलं होतं?
हृदयनाथ मंगेशकर आकाशवाणीत नोकरीला होते की नव्हते?
Follow us
| Updated on: Feb 10, 2022 | 5:48 PM

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित हृदयनाथ मंगेशकर (Pt Hridaynath Mangeshkar) यांच्यावर अन्याय झाल्याचा आरोप राज्यसभेत 8 फेब्रुवारी रोजी बोलताना केला. नरेंद्र मोदींनी केलेल्या दाव्यानुसार पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना नोकरीवरुन काढून टाकण्यात आलं. वीर सावकरांच्या (Veer Savarkar) कवितेला चाल लावली आणि ते गाणं सादर केल्यामुळे हृदयनाथ मंगेशकर यांना नोकरी गमावावी लागली, असा आरोप मोदींनी राज्यसभेत केला. पण खरंच पंडित हृदयनाथ मंगेशकर हे ऑल इंडिया रेडिओ म्हणजेच आकाशवाणीमध्ये कामाला होते का? त्यांनी तिथं नोकरी केली होती का? मोदींना (Prime Minsiter Narendra Modi) पंडीत हृदयनाथ मंगेशकर यांच्याबाबत असलेली माहिती बरोबर आहे की चुकीची आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. हा प्रश्न निर्माण होण्याचं कारण ठरलं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेला आणखी एक वक्तव्य! संजय राऊतांच्या दाव्यानुसार, पंडीत हृदयनाथ मंगेशकर यांनी कधी आकाशवाणीत नोकरीच केली नसल्याचं म्हटलंय. उलट अनेकदा सावकरांची कविता असलेलं आणि हृदयनाथ यांना चाल लावलेलं ‘ने मजसीने परत मातृभूमी’ला हे गाणं आकाशवाणीवरुन ऐकल्याचंही म्हटलंय.

मोदींनी केलेला दावा, त्यानंतर राऊतांनी केलेलं वक्तव्य यामुळे पंडित हृदयनाथ मंगेशकरांच्या नोकरीबाबत संभ्रम निर्माण झालाय. म्हणून पंडीत हृदयनाथ मंगेशकर हे आकाशवाणीत नोकरीला होते की नव्हते, याची टीव्ही 9 मराठीनं पडताळणी करण्याचा प्रयत्न केलाय.

पडताळणीची सुरुवात

संजय राऊत यांनी केलेल्या दाव्यात त्यांनी एक नाव घेतलं होतं. महेश केळुसकर या आकाशवाणीमध्ये काम केलेल्या व्यक्तीशी बोलून पंडित हृदयनाथ मंगेशकरांच्या नोकरीबाबत माहिती घेतल्याचं राऊतांनी नमूद केलं होतं. दरम्याम महेश केळुसकर यांच्याशी संवाद साधला असता त्यांनीही या गोष्टीला दुजोरा दिलाय. महेश केळुसकर यांनीही पंडीत हृदयनाथ मंगेशकर हे आकाशवाणीत नोकरीला असण्याची कोणतीही शक्यता नाही, असं म्हटलंय.

आकाशवाणीमध्ये जरी ते नोकरीला असते, तर तिथून असं कुणालाही तडकाफडकी नोकरीवरून काढून टाकता येत नाही. एखाद्याला काढून टाकण्याची प्रोसेस असते. त्या प्रोसेसमध्ये कागदोपत्री प्रक्रिया होते. तसं जर झालं असतं, तर त्याचा रेकॉर्ड आकाशवाणीकडे असता. पण तसा कोणताही रेकॉर्ड आकाशवाणीकडे नाही, असं केळुसकरांनी म्हटलंय.

हृदयनाथ मंगेशकर हे फक्त एका कॉन्ट्रॅक्ट पुरते आकाशवाणीशी जोडले गेले होते. तीन गाण्याचं ते एक कॉन्ट्रॅक्ट होतं. तीन गाणी झाल्यानंतर त्यांचं कॉन्ट्रॅक्ट रिन्यू करण्यात आलं नव्हतं. हा तो काळ आहे, तेव्हा पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या नावापुढे पंडित ही उपाधी लागलेली नव्हती. ते तेव्हा फक्त हृदयनाथ मंगेशकर, एक उमदा आणि चांगला तरुण संगीतकार म्हणून उदयाला येत होते.

महेश केळुसकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकार कुणाचंही असो प्रसारण मंत्रालयाला आपआपल्या पद्धतीनं काम करावं लागतं. वीर सावरकरांबाबत कोणत्याही सरकारनं वेगळी भूमिका घेतलेली नाही. मी स्वतः वीर सावरकरांच्या माझी जन्मठेप या पुस्तकाचा कार्यक्रम केला होता. तेव्हा माझ्या वरीष्ठांनी मला कधीही थांबवलं नाही. उलट मला चांगलाच प्रतिसाद मिळाला. तसंच ‘ने मजसीने’ हे गीत आकाशवाणीवर हजारो वेळा लागलं. आकाशवाणीमुळेच हे गाणं जास्त प्रसिद्ध झालं. पण हृदयनाथ मंगेशकरांना नोकरीवरुन काढलं की नाही, ते तिथं नोकरीवर खरंत होते की नाही? यावरुन जो संशय लोकांच्या मनात निर्माण झाला आहे, त्याबाबत खुद्द मंगेशकरांनीच योग्य ते कागदपत्र किंवा पुरावे देऊन संभ्रम दूर करावा, ही विनंती!, असंही केळुसकरांनी म्हटलंय.

पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी काय म्हटलंय?

दरम्यान, पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी नागपुरात 2014 साली एक विधान केलं होतं. या विधानात त्यांनी म्हटलं होतं की,

सावकरांच्या कवितांना चाली लावण्याचा मोह मला कधीच आवरता आला नाही. ही गाणी इतकी हिट झाली की तत्कालीन नभोवाणी मंत्रालयाला हे रुचले नाही. त्यामुळेच राजा बढे यांना मुंबई आकाशवाणीची नोकरी गमावावी लागली. त्यानंतर बढेंना आयुष्यात अनेक संकटांचा सामना करावा लागला. त्यामुळे माझ्याइतके बढेंचे नुकसान या जगात कुणी केलं नसेल.

26 जुले 2014 रोजी झालेल्या राजा बढे यांच्या जनशताब्दी समारोहाच्या कार्यक्रमप्रसंगी हृदयनाथ मंगेशकर यांनी ही आठवण सांगितली होती. याबाबतची बातमीदेखील 27 जुला 2014 रोजी वेगवेगळ्या माध्यमांमध्ये प्रसिद्धही झाली होती. या वक्तव्यातून हृदयनाथ मंगेशकर यांच्यामुळे राजा बढे यांना नोकरी सोडावी लागली असा अर्थ घेतला तर ते स्वतः काही आकाशवाणीत नोकरी करत नव्हते असाच थेट संदेश सगळ्यांना जातो. पण महेश केळुसकर यांनी दिलेल्या माहितीनुसार राजा बढे हे देखील आकाशवाणीसोबत कॉन्ट्रक्टवरच जोडले गेले होते. दुर्दैवानं राजा बढे यांचा याबाबतचं कोणतंही वक्तव्य उपलब्ध नाही.

गाडगीळही म्हणतात, नव्हतीच आकाशवाणीत नोकरी!

एडव्होकेट असीम सरोदे यांनीही याच मुद्द्याला धरुन एक प्रश्न उपस्थित केला. ज्येष्ठ पत्रकार आणि निवेदक सुधीर गाडगीळ यांनी एका वृत्तवाहिनीवर हृदयनाथ मंगेशकर आकाशवाणीत नोकरीला नव्हते, असा दावा केल्याचं सरोदे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय. जर ते नोकरीलाच नव्हते, तर त्यांना काढून टाकण्याचा प्रश्नच येत नाही, असंही त्यांनी म्हटलंय.

नोकरीवरुन काढण्याचं ‘थट्टा’स्पद विधान?

एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी 1955 साली आपण आकाशवाणीत नोकरीला होतो, असा दावा केला होता. या मुलाखतीच्या व्हिडीओमध्ये 53व्या मिनिटांपासून 56व्या मिनिटांपर्यंत हृदयनाथ मंगेशकरांनी म्हटलं होतं, की आपण आकाशवाणी काम करत होतो आणि सावरकरांच्या कवितेला चाल लावली म्हणून आपली नोकरी गेली.

2014 साली ही मुलाखत घेण्यात आली होती. दरम्यान, हृदयनाथ मंगेशकर यांनी केलेला हा दावा खोटा असल्याचं टीव्ही 9 मराठीच्या पडताळणीमध्ये समोर आलंय. तीन गाण्याचं एक कॉन्ट्रॅक्ट हृदयनाथ मंगेशकर यांना देण्यात आलं होतं. ही तीन गाणी झाल्यानंतर त्यांचं कॉन्ट्रॅक्ट रिन्यू करण्यात आलं होतं. या तीन गाण्याचा आणि ने मजसी ने या सावरकारांच्या कवितेचा एकमेकांशी दुरान्वये काहीही संबंध नाही, असंही समोर आलं आहे. वयाच्या 17 व्या वर्षी एक उमदा तरुण संगीतकार असल्यानं त्यांना संधी देण्यात आली असावी, असाही एक अंदाज बांधला जातो. पण ते नोकरीवर आकाशवाणीत कधीच नव्हते, हे मात्र खरंय, असंही महेश केळुसकर यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना स्पष्ट केलंय.

तारखांची क्रोनोलॉजी

लता मंगेशकर यांचं 6 फेब्रुवारी रोजी निधन झालं. त्यानंतर 8 फेब्रुवारीला राज्यसभेत बोलताना नरेंद्र मोदी यांनी हृदयनाथ मंगेशकर यांच्यासोबत अन्याय करण्यात आल्याचं दावा केला.  नरेंद्र मोदी यांनी हृदयनाथ मंगेशकर हे आकाशवाणीत नोकरीला होते, अशी खोटी माहिती राज्यसभेत दिली. आणि मूळचं गोव्यातीलच असलेल्या मंगेशकर कुटुंबीयाच्या गोवा विधानसभा निवडणुकांचा 14 फेब्रुवारी रोजी मतदान पार पडणार आहे.

मूळचे गोव्यातील असलेले मंगेशकर कुटुंबीय यांना सहानुभूती मिळावी म्हणून हे वक्तव्य जाणीवपूर्वक केलं गेलं का? गोव्याच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सनसनाटी वक्तव्य आणि आरोप करुन संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न झाला का? असे प्रश्न आता उपस्थित झालेत. देशाच्या अत्यंत महत्त्वाच्या पदावर असणाऱ्या व्यक्तीनं सर्वसामान्यांचे अतिशय महत्त्वाचे प्रश्न देशात ज्वलंत असताना, त्यावर लक्ष केंद्रीत करण्याऐवजी संसदेत मंगेशकरांवर केलेलं वक्तव्य करताना सत्य तपासून का पाहिलं नाही, असाही सवाल विचारला जाणं स्वाभाविक आहे.

संबंधित बातम्या :

Fact Check : लतादीदींनी आंबेडकरी गाणी गायली नाहीत की त्यांच्याकडे कुणी गाणं घेऊन गेलं नाही? काय वास्तव?

केंद्राने कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता रोखला? सोशल मीडियावर पत्र व्हायरल, जाणून घ्या नेमकं काय आहे प्रकरण?

तुम्हाला 25 लाखांची लॉटरी जिंकण्याचा मेसेज आलाय का? सावध व्हा, सत्य जाणून घ्या

Fact Check : पेट्रोल पंपावर मोबाईलवर बोलल्यास आगीचा भडका उडतो?, जाणून घ्या व्हायरल व्हिडीओंमागील सत्य!

कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....