Ashish Shelar: गिरणगावातील चाळीतून थेट दुसऱ्यांदा भाजपच्या मुंबई अध्यक्षपदी; आशिष शेलारांबाबतच्या ‘या’ गोष्टी माहीत आहे काय?

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्यानंतर साहित्य, कला, क्रीडा आदी क्षेत्रात वावर असलेले आशिष शेलार हे महाराष्ट्रातील सर्वात तरुण नेते आहेत.

Ashish Shelar: गिरणगावातील चाळीतून थेट दुसऱ्यांदा भाजपच्या मुंबई अध्यक्षपदी; आशिष शेलारांबाबतच्या 'या' गोष्टी माहीत आहे काय?
ashish shelar
Follow us
| Updated on: Aug 12, 2022 | 3:38 PM

मुंबई: मुंबईची गल्लो न् गल्ली फिरलेले… मुंबईची (mumbai) खडा न् खडा माहिती असलेले अस्सल मुंबईकर… मध्यमवर्गीय कुटुंबातील असूनही सेलिब्रिटी राहत असलेल्या पालीहिलचं नेतृत्व करणारे आमदार… भाजपमध्ये (bjp) असूनही सर्व पक्षीय नेत्यांशी जिव्हाळ्याचे संबंध असलेले नेते, अभ्यासू आणि व्यासंगी व्यक्तिमत्त्व म्हणून माजी मंत्री, भाजप आमदार आशिष शेलार (ashish shelar) यांची ओळख आहे. गिरणगावातील चाळीतून थेट कॅबिनेट मंत्रिपद ते दुसऱ्यांदा भाजपच्या मुंबई अध्यक्षपदी निवड प्रवास तसा सोपा नव्हता. पण अथक संघर्ष करत आशिष शेलार यांनी ही किमया साधली आहे. शेलार हे अजातशत्रू आहेत. त्यामुळेच राजकारण, साहित्य, कला आणि सांस्कृतिक क्षेत्रात त्यांचा मुक्त वावर असतो. साहित्याची त्यांना विशेष गोडी आहे. त्यामुळे अनेक साहित्यिक, कविंशी त्यांची खास मैत्री आहे. राजकारणापलिकडे जाऊनही आपण समाजाचं काही देणं लागतो, याची जाणीव असलेला हा तरुण नेता आहे. शेलार यांच्या या राजकीय कारकिर्दीवर टाकलेला प्रकाश…

गिरणगावात बालपण

आशिष शेलार यांचा जन्म भायखळा येथील सात रस्ता येथील कुंभार चाळीत झाला. सेंट्रल जेलसमोरच चर्चच्या बाजूला ही चाळ होती. ही चाळ पुनर्विकासात गेल्याने ते वांद्रे येथे राहिला आले आणि तिथेच स्थायिक झाले. वांद्रे येथे म्हाडाच्या ट्रान्झिस्ट कँम्पमधील दहा बाय दहाच्या खोलीत ते लहानाचे मोठे झाले. अगदी नगरसेवक होईपर्यंत ते याच खोलीत राहत होते. शेलार हे एलएलबी झालेले आहेत. त्यांनी सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिसही केली आहे. त्यांची पत्नी सुद्धा वकील आहेत. तर मोठा भाऊ विनोद शेलार हे माजी नगरसेवक आहेत.

हे सुद्धा वाचा

कोळीवाडा, गावठाण

आशिष शेलार यांचं बालपण मुंबईतच गेलं. विशेष म्हणजे दहा बाय दहाच्या खोलीत ते राहिले. त्यामुळे मध्यमवर्गीय जीवन त्यांनी जवळून पाहिलं आहे. मध्यमवर्गीय आणि कष्टकऱ्यांचे प्रश्न ते जाणून आहेत. त्यांच्या समस्या त्यांना माहीत आहे. त्यामुळेच त्यांच्या भाषणात नेहमीच कोळीवाडे आणि गावठाणांच्या प्रश्नांवर नेहमी भाष्य असतं. विधासनभेतही ते या प्रश्नावर आवाज उठवत असतात आणि सरकारला निर्णय घ्यायला भाग पाडत असतात.

दोनदा नगरसेवक, दोन वेळा आमदार

आशिष शेलार हे पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. ते मुंबई पालिकेत भाजपचे गट नेते होते. तसेच ते दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. या शिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळालं होतं. विशेष म्हणजे सेलिब्रिटींच्या पालीहिल मतदारसंघाचं ते नेतृत्व करतात. मुस्लिम आणि ख्रिश्चन मतदारांचे भरघोस मतदान मिळणारे ते कदाचित एकमेव आमदारही आहेत.

तरीही जबाबदाऱ्या मोठ्या

आशिष शेलार यांच्याकडे सध्या कोणतंही पद नाही. ते शेवटच्या सहा महिन्यात मंत्री झाले. तरीही पक्षातील त्यांचं वजन मोठं आहे. कोणतंही पद नसलं तरी त्यांच्यावर पक्षाने मोठ्या जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत. गुजरातमधील सुरत निवडणूक, कर्नाटक निवडणुकीची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती. आताच ते पश्चिम बंगाललाही जाऊन आले. केवळ साधे आमदार असूनही त्यांच्यावर मोठ्या जबाबदाऱ्या सोपवून पक्षाने एकापरीने त्यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तबच केलं आहे.

संघातून सुरुवात

शेलार यांच्या राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते संघात प्रथम, द्वितीय शाखेपर्यंत होते. मात्र, खऱ्या अर्थाने ते अॅक्टिव्ह झाले विद्यार्थी परिषदेत. विद्यार्थी परिषदेत असताना त्यांनी विद्यापीठावर एक लाख विद्यार्थ्यांचा मोर्चा काढला होता. तेव्हापासून ते प्रकाश झोतात आले. मधल्या काळात ते मुंबई भाजपचे अध्यक्षही होते. मुंबईचे अध्यक्ष असताना त्यांनी मुंबईत भाजपची पाळंमुळं रोवतानाच पालिकेत पक्षाला मोठं यशही मिळवून दिलं आहे.

सर्व पक्षीय सलोखा

शेलार यांनी सर्व पक्षीय नेत्यांशी मित्रत्वाचे संबंध ठेवून महाराष्ट्राची राजकीय संस्कृती जपली आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना नेते संजय राऊत, काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्याशी त्यांचे अत्यंत घनिष्ट संबंध आहेत. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांशीही त्यांचे जवळचे संबंध होते. विशेष बाब म्हणजे त्यांचे सासरे सिताराम दळवी हे शिवसेनेचे माजी आमदार आहेत. तर मेव्हणा संदीप दळवी हे मनसेत कार्यरत आहेत.

साहित्य, कला, क्रीडा क्षेत्रात वावर

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्यानंतर साहित्य, कला, क्रीडा आदी क्षेत्रात वावर असलेले आशिष शेलार हे महाराष्ट्रातील सर्वात तरुण नेते आहेत. मोहम्मद रफी पुरस्काराचं ते दरवर्षी वितरण करतात. रफींच्या नावाने मैफलीचं आयोजन करतात. त्यानिमित्ताने त्यांचा सिने जगतात वावर आहे. ते साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्षही राहिले आहेत. शिवाय त्यांनी डॉक्युमेंट्रीही तयार केली आहे. वांद्रे येथे त्यांनी ग्रंथालयही सुरू केलं आहे. तसेच मुंबई क्रिकेट असोसिएशने माजी अध्यक्ष आहेत.

शेलारांचं क्रीडायण

गेली दहा वर्षे मुंबई क्रिकेटअसोसिएशनमध्‍ये सक्रिय असून विविध समित्‍यांवर काम तर सुरूवातीला उपाध्यक्ष म्हणून विजयी तर सध्‍या अध्‍यक्ष म्‍हणून कार्यरत होते. वर्ल्डकप 2011 च्या अंतिम सामन्यापूर्वी वानखेडे स्टेडीयमच्या पुनर्बांधणीच्या कामात महत्वाची जबाबदारी पार पाडली. तसेच 2016 च्या टी-20 वर्ल्डकप मॅनेजिंग कमिटीचे सदस्य म्हणून काम पाहिले. बीसीसीआच्‍या मार्केटींग कमिटीचे अध्‍यक्ष म्‍हणून त्यांची निवड झाली होती. मुंबई जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले असून त्याद्वारे मुंबईतील 350 फुटबॉल क्लबचे प्रतिनिधीत्व केले होते. राजस्‍थान स्‍पोर्टस क्‍लबचे उपाध्‍यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिलं आहे. दोरी उड्या (Rope Skipping) असोशिएशनचे ते महाराष्ट्र अध्यक्ष आहेत. (know unknown facts of bjp leader ashish shelar)

थोडक्यात आढावा

>> 2014 च्या विधानसभा निवडणुकीत वांद्रे पश्चिम विधानसभा मतदार संघातून 26 हजार 911 मताधिक्‍याने विजयी

>> महाराष्ट्र विधानपरिषदेवर जुलै 2012 रोजी आमदार म्हणून बिनविरोध निवडून आले.

>> अभाविप, मुंबई सचिव.

>> भाजपा, युवा मोर्चा, मुंबई अध्यक्ष.

>> 1995मध्ये भाजपा महअधिवेशन कायर्कारिणी सदस्य (कोअर टीम)

>> मुंबई महानगरपालिकेत दोन वेळा नगरसेवक, खार पश्चिम

>> भाजपा उत्तर पश्चिम जिल्हा अध्यक्ष

>> मुंबई महानगरपालिकेत भाजपा नगरसेवकांचे गटनेते, सुधार समितीचे अध्‍यक्षपद भूषविले

>> सदस्य एमएमआरडीए

>> मुंबई मेट्रो हेरीटेज सोसायटीचे गव्हर्नर

>> वांद्रे सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष.

>> क्षत्रिय गडकरी मराठा महासंघाचे महाराष्ट्र समाज संस्थेचे अध्यक्ष (know unknown facts of bjp leader ashish shelar)

संबंधित बातम्या:

Airtel 5G Network: ‘एअरटेल’ भारतीय ग्राहकांसाठी 5G क्रांती आणण्यासाठी सज्ज!

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.