लाल दिव्याची गाडी, पण हक्काचं घर नाही; बच्चू कडूंचं खरं नाव माहीत आहे का?

गोरगरिबांच्या मदतीसाठी धावून जाणारा, रात्रीअपरात्री कधीही हाक मारा सेवेसाठी हजर असणारा... अंध-अपंगांचा आधारवड असणारा नेता अशी ओळख असलेले महाराष्ट्रातील एकमेव नेते म्हणजे बच्चू कडू होय. (know who is Maharashtra minister Bacchu Kadu?)

लाल दिव्याची गाडी, पण हक्काचं घर नाही; बच्चू कडूंचं खरं नाव माहीत आहे का?
Bacchu Kadu
Follow us
| Updated on: Mar 20, 2021 | 5:31 PM

मुंबई: गोरगरिबांच्या मदतीसाठी धावून जाणारा, रात्रीअपरात्री कधीही हाक मारा सेवेसाठी हजर असणारा… अंध-अपंगांचा आधारवड असणारा नेता अशी ओळख असलेले महाराष्ट्रातील एकमेव नेते म्हणजे बच्चू कडू होय. त्यामुळेच ‘अपना भिडू, बच्चू कडू’, गरिबांचे ‘रॉबिनहूड’ अशी त्यांची ओळख निर्माण झाली आहे. तीनवेळा आमदार झाले. मंत्री आहेत. पण त्यांचं हक्काचं घर नाही. आजही ते भाड्याच्या घरात राहतात. काय आहे बच्चू कडूंचा संघर्ष, जाणून घेऊया… (know who is Maharashtra minister Bacchu Kadu?)

खरं नाव काय?

बच्चू कडू म्हणून सर्वपरिचित असलेल्या बच्चू कडू यांचं खरं नाव ओमप्रकाश बाबूराव कडू असं आहे. 51 वर्षीय बच्चू कडू यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्यातील बेलोरा येथे झाला. त्यांचं शिक्षण बीकॉमपर्यंत झालं आहे. त्यांची पत्नी शिक्षिका आहे. त्यांना एक मुलगा असून शेती हाच त्यांचा मुख्य व्यवसाय आहे.

आठवीत असताना तमाशा बंदीसाठी आंदोलन

बच्चू कडू हे लहानपणापासूनच समाजकार्यात सक्रिय होते. इयत्ता आठवीत शिकत असताना त्यांनी तमाशा बंदीसाठी आंदोलन केलं होतं. तरुणांना बरबाद होण्यापासून वाचवण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला होता.

बाळासाहेबांचा प्रभाव

बच्चू कडूंवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणाचा प्रचंड प्रभाव होता. त्यामुळेच त्यांनी शिवसेनेतही प्रवेश केला होता. त्यानंतर ते शिवसेनेचे चांदूरबाजार समितीचे सभापतीही झाले. सभापती असताना त्यांनी शौचालय घोटाळा उघड केला होता. हा घोटाळा त्याकाळी खूप गाजला होता. अपंगांना सायकल वाटप करण्यासाठी निधी न दिल्यामुळे शिवसेना नेत्यांशी वाद झाल्याने त्यांनी शिवसेना सोडली.

पहिली निवडणूक, पण यश नाही

बच्चू कडू यांनी 1999 साली विधानसभेची पहिली निवडणूक अपक्ष म्हणून लढवली. त्यात त्यांचा अवघ्या 1300 मतांनी पराभव झाला. त्यांच्या पहिल्या निवडणुकीत प्रचारा करिता पैसा नसल्याने त्यांच्या अनेक मित्रांनी घरातील दागिने मोडले. पत्नीचे मंगळसूत्र सुध्दा गहाण ठेवले आणि निधी उभा केला. बच्चू कडू आजही या मित्रांचा अभिमानाने उल्लेख करतात.

घर नाही, आमदारांच्या पगारवाढीला विरोध

2004 साली त्यांनी परत अपक्ष म्हणून आमदारकी लढवली आणि ते निवडून आले. त्यानंतर सलग तीन वेळा ते अपक्ष आमदार म्हणून निवडून आले आहेत. तीन वेळा आमदार असणाऱ्या बच्चू कडूंकडे आजही स्वःताचे घर नाही. ते आजही भाड्याच्या घरात ते राहतात. त्यांची पत्नी शिक्षिका आहे. आमदारांच्या पगारवाढीला विरोध करणारे ते राज्यातील एकमेव आमदार आहेत.

प्रहार संघटनेची स्थापना

आमदार झाल्यानंतर बच्चू कडू यांनी ‘प्रहार जनशक्ती पक्षा’ या संघटनेची स्थापना केली. अपंग, शेतकरी आणि गरिबांच्या न्याय हक्कासाठी झगडणे हे या संघटनेचे मुख्य उद्दिष्ट्ये आहे. अपंगांच्या प्रत्येक प्रश्नावर ते अधिक आक्रमक होतात. अगदी अधिकाऱ्यांना मारहाण करण्यापर्यंत ते आक्रमक होऊन जातात.

शेतकऱ्यांसाठी रॅली

बच्चू कडू यांनी 2017मध्ये शेतकऱ्यांसाठी मोटारसायकल रॅली काढली होती. महाराष्ट्र ते गुजरात अशी ही रॅली होती. या रॅलीला त्यांनी सीएम टू पीएम असं नाव दिलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गावापर्यंत ही रॅली काढण्यात आली होती. नंतर ही रॅली अडवण्यात आली होती.

100 वेळा रक्तदान

बच्चू कडू यांनी स्वत: एकट्याने शंभर वेळा रक्तदान केलं आहे. शंभरवेळा रक्तदान करणारे ते एकमेव आमदार आहेत. मित्राला रक्तदान करताना वजन कमी पडत असल्यामुळे खिशात दगड ठेऊन त्यांनी रक्तदान करून मित्राचा जीव वाचवला होता. 1000 रक्तदान शिबीरांचे आयोजन करून 15000 बाटल्या रक्त के. ई. एम. रुग्णालय, मुंबई, जनरल हॉस्पिटल, अमरावती व मेडिकल कॉलेज, नागपूर येथील रक्तपेढ्यांना पुरवठा त्यांनी केला. त्याशिवाय 1500 हृदय रुग्णांना दत्तक घेऊन त्यांच्यावर उपचार व शस्त्रक्रिया केली. 200 ब्रेन ट्युमरच्या रुग्णांवर मुंबई येथे सर्वतोपरी उपचार दिले. तसेच 100 कर्करोग रुग्णांना वैद्यकीय सहाय्य व सर्वतोपरी मदत देतानाच 2000 रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रियाही त्यांनी घडवून आणली आहे. त्यांनी आतापर्यंत 18 लाख रूग्णांना मोफत रूग्णसेवा दिली आहे.

लग्नाच्या खर्चातून सायकल वाटप

बच्चू कडू यांनी महत्मा गांधी जयंतीला राष्ट्रगीताच्या चालीवर लग्न केले. स्वतःच्या लग्नाच्या खर्चातून बचत करून 250 अपंगांना लग्न समारंभात 3 चाकी सायकली व कृत्रिम अवयवांचे वाटपही त्यांनी केलं होतं.

सुतळी बॉम्ब फोड, साप सोड, हटके आंदोलने

बच्चू कडूचे आंदोलन विशेष असतात व निर्णय लागेपर्यंत ते आंदोलन सुरु ठेवतात. शासकीय अधिकारी काम करत नसल्याचे पाहून त्यांनी या अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये साप सोडणे, कार्यालयात सुतळी बॉम्ब फोडणे, अशी आंदोलने केली. त्यांचे विरूगिरी हे आंदोलन खूप गाजले. होते. अपंगांकरिता 25,000 लोकांचा दिल्ली येथे मोर्चा नेणारे बच्चू कडू पहिले अपक्ष आमदार आहेत. त्याची फलश्रुती म्हणजे एका दिवसात 11 शासन निर्णय केंद्राने पारित केले. त्यांचे उपोषण 21 दिवसापर्यत चालले होते. (know who is Maharashtra minister Bacchu Kadu?)

सर्पमित्रही

सामाजिक-राजकीय आंदोलनात व्यस्त असतानाही बच्चू कडू यांनी त्यांच्या आवडी आणि छंद जोपासले आहेत. बच्चू कडू हे सर्पमित्र आहेत. त्यांना खेळाची आवड आहे. घोडेस्वारी त्यांना विशेष आवडते. (know who is Maharashtra minister Bacchu Kadu?)

रक्तदान करुन पदभार स्वीकारला

ठाकरे सरकारमध्ये जलसंपदा आणि लाभक्षेत्र विकास विभागाचे राज्यमंत्री म्हणून वर्णी लागल्यानंतर बच्चू कडू यांनी रक्तदान करूनच मंत्रालयात पदभार स्वीकारला होता. बच्चू कडू यांच्याकडे जलसंपदा आणि लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला आणि बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार या विभागांचं राज्यमंत्रिपद सोपवण्यात आलं आहे. (know who is Maharashtra minister Bacchu Kadu?)

संबंधित बातम्या:

संघ प्रचारक, कार्यालय प्रमुख ते आमदार; अतुल भातखळकरांची उंच भरारी!

आधी काँग्रेस, नंतर मोदी विरोधात बंड; अशी आहे नाना पटोलेंची राजकीय कारकिर्द!

सहकार ते राजकारण; जाणून घ्या कोण आहेत राधाकृष्ण विखे पाटील?

(know who is Maharashtra minister Bacchu Kadu?)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.