ईडी चौकशीने एकनाथ खडसेंच्या अडचणीत वाढ, राजकीय पुनर्वसनातही अडथळा येणार? वाचा जाणकार काय म्हणतात…

एकनाथ खडसे यांच्या आता पुन्हा नव्याने होत असलेल्या चौकशीमुळे खडसेंच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यांच्या राजकीय पुनर्वसनात अडथळा येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ईडी चौकशीने एकनाथ खडसेंच्या अडचणीत वाढ, राजकीय पुनर्वसनातही अडथळा येणार? वाचा जाणकार काय म्हणतात...
एकनाथ खडसे
Follow us
| Updated on: Jul 09, 2021 | 5:47 AM

जळगाव : जळगाव जिल्ह्यात राजकारणात गेली 40 वर्षे असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजीमंत्री एकनाथ खडसे यांची पुण्यातील भोसरी एमआयडीसीच्या भूखंड खरेदीच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडून चौकशी सुरू आहे. त्यामुळे खान्देशासह राज्याचे राजकारण सध्या ढवळून निघाले आहे. खडसेंची यापूर्वीदेखील याच प्रकरणात चौकशी झाली आहे. आता पुन्हा नव्याने होत असलेल्या चौकशीमुळे खडसेंच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यांच्या राजकीय पुनर्वसनात अडथळा येण्याची शक्यता वर्तवली जात आहे (Know why Eknath Khadse become alone in Maharashtra politics according analyst).

भाजपात असताना खडसे एकेकाळी राज्याचे नेतृत्व करत होते. त्यानंतर पक्षांतर्गत कुरघोडीच्या राजकारणाचा त्यांना फटका बसला. अशा वेळी संकटात सापडल्यावरही बहुजन समाजाचा नेता अशी स्वतःची नवी ओळख खडसेंनी निर्माण केली. पण असे असले तरी त्यांनी बहुजनच नाही तर त्यांच्या समाजातही कुटुंबीयांव्यतिरिक्त नवे पक्ष नेतृत्व तयार होऊ दिले नाही, असा आरोप खडसेंवर केला जातो. खडसेंच्या राजकीय महत्वाकांक्षांना पक्षानेही वेसण न घातल्याने खडसेंचे आपोआपच शत्रू वाढत गेले. पर्यायाने आज पडत्या काळातही खडसेंची साथ कुणी द्यायला तयार नाही, असं मत राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.

खानदेशात एकनाथ खडसेंनी घरातच पदं वाटल्याचा आरोप

राजकीय विश्लेषक विकास भदाणे म्हणाले, “जिल्ह्यातील सुडाच्या राजकारणाचा प्रवास खडसेंनी पुढे सुरुच ठेवल्याचा आरोप केला जातो. खानदेशात भाजप वाढवत असताना घरातच त्यांनी पदे वाटली. त्यातून सहकारी संस्थांमधून गेल्या अनेक वर्षांपासूनचे मराठा समाजाचे प्राबल्य ते हळूहळू कमी करत गेले. उदाहरण द्यायचेच झाले तर त्यांनी सून रक्षा खडसे यांना लोकसभेवर निवडून आणले, त्याचवेळी भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ जावळे यांचे तिकीट कापले. पत्नी मंदाकिनी खडसे यांना जिल्हा दूध संघावर निवडून चेअरमन केले.”

“… म्हणून खडसेंच्या पाठीशी आता कुणीही ठामपणे उभे नाही”

एवढ्यावरच न थांबता महानंदचे अध्यक्षही केले. मुलगी रोहिणी खडसे यांना जिल्हा बँकेचे अध्यक्ष केले. मराठा समाजाच्या नेत्यांना दूर सारत लेवा पाटीदार समाजाच्या महिलांना मानाची पदे पदरात पाडून घेतली. यामुळे खडसेंविषयी नाराजी पसरली. हेच कदाचित आज खडसे अडचणीत असतानाही त्यांच्या पाठीशी कुणीही ठामपणे उभे न राहण्याचे कारण असावे, असंही राजकीय विश्लेषक निरिक्षण नोंदवत आहेत.

हेही वाचा :

Eknath Khadse ED inquiry : “ईडी बोलावेल तेवढ्या वेळा हजर राहू”, अटक टाळण्यासाठी एकनाथ खडसे यांचं आश्वासन?

Eknath Khadse ED Inquiry : एकनाथ खडसेंची ईडीकडून तब्बल 9 तास चौकशी, सहकार्य करण्याचं खडसेंचं आश्वासन

ईडीच्या चौकशीचा राजकारणाशी संबंध लावणे चुकीचे, खसडेंनी चौकशीला सामोरे जावे: प्रवीण दरेकर

व्हिडीओ पाहा :

Know why Eknath Khadse become alone in Maharashtra politics according analyst

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.