Kolhapur By Election Result 2022 : करुणा शर्मा यांची महाविकास आघाडीवर जोरदार टीका, जाणून घ्या शर्मा यांना किती मते मिळाली

कोल्हापूरच्या (Kolhapur) निव़डणुकीकडे अवघ्या महाराष्ट्राचं (Maharashtra) लक्ष लागलं होतं. कारण आत्तापर्यंत निवडणुका जाहीर झाल्यानंतर प्रचारासाठी मोठ्या नेत्यांनी कंबर कसली होती. त्यामुळे तिथली निवडणुक चुरशीची होईल अशी शक्यता अनेकांनी व्यक्त केली होती.

Kolhapur By Election Result 2022 : करुणा शर्मा यांची महाविकास आघाडीवर जोरदार टीका, जाणून घ्या शर्मा यांना किती मते मिळाली
करुणा शर्माची महाविकास आघाडीवर जोरदार टीकाImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 16, 2022 | 7:09 PM

कोल्हापूर – कोल्हापूरच्या (Kolhapur) निव़डणुकीकडे अवघ्या महाराष्ट्राचं (Maharashtra) लक्ष लागलं होतं. कारण आत्तापर्यंत निवडणुका जाहीर झाल्यानंतर प्रचारासाठी मोठ्या नेत्यांनी कंबर कसली होती. त्यामुळे तिथली निवडणुक चुरशीची होईल अशी शक्यता अनेकांनी व्यक्त केली होती. प्रचाराच्या दरम्यान आरोप-प्रत्यारोपाच्या अनेक फैरी पाहायला मिळाल्या. आज निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. त्यामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव (Jayashree Sharma) यांनी भाजपच्या उमेदवारांचा मोठ्या फरकाने पराजय केला. कोल्हापूरात आज महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून जल्लोष केला जात आहे. अपक्ष उमेदवार करूणा शर्मा यांना फक्त 134 मतं मिळाली आहेत. शर्मा यांनी ज्यावेळी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला होता. त्यावेळी त्यांची कोल्हापूरात अधिक चर्चा झाली होती. एकूण पंधरा उमेदवारांनी झालेल्या निवडणुकीत नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये करूणा शर्मा या 12 क्रमांकावरती आहेत.

कमी कालावधीत शंभरपेक्षा अधिक मतं मिळाल्याने आनंद

मला शंभरच्यावरती मते मिळाली त्यातचं माझा विजय झाला आहे. माझ्या गाडीवर हल्ला करण्यात आला. मला प्रचारापासून रोखण्यात आले. या कारणामुळे मला १०० मते मिळाली. तसेच पुढे त्या हारकर जितने वाले को बाजीगर कहते है. झाशीची राणी यांना सुध्दा पराभवाला सामोरे जावे लागले होते असं म्हणाल्या. पण मी यापुढे अशीचं लढत राहिनं असं करूणा शर्मा यांनी स्पष्ट केलं आहे. कोल्हापूरमध्ये मी फक्त तीनवेळा आले आहे. त्यावेळी मला ६ तास प्रचार करण्याची संधी मिळाली. कमी कालावधीत मला १०० मतं मिळाल्याने मला आनंद झाला आहे.

करूणा शर्माचा महाविकास आघाडीला टोला

महाविकास आघाडी सरकारला जनतेचा कौल मिळालेला नाही. हे कोल्हापूरच्या निवडणूकीतून स्पष्ट झाले आहे. तिन्ही पक्षांना मिळून 94 हजारांवर मते मिळाली आहेत. तर एकट्या भाजपला 75 हजारांवर मते मिळाली आहेत. यातून सगळं चित्र स्पष्ट होत आहे. महाविकास आघाडी एकत्र लढल्याने त्यांना यश मिळाले आहे असा टोला सुध्दा करूणा शर्मा यांनी लगावला आहे.

Aditya Thackeray : अयोध्येला जाणार, आदित्य ठाकरेंची घोषणा; तर नवनीत राणा आणि रवी राणांबाबत काय म्हणाले ठाकरे?

Kolhapur North By Election : कोल्हापुरात एका पाटलांची सरशी तर दुसऱ्या पाटलांची पिछेहाट! 2019 पासूनचं गणित काय सांगतं?

Kolhapur By Election Result 2022: जयश्री जाधवही आमच्याच, पराभवानंतरही चंद्रकांत पाटील म्हणतात, भाजपच्या आमदार महिला गटाचा त्यांना फायदा होईल

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.