Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अरे देवा! आता हेच बघायचं राहिलेलं, भाजप नेत्याने महात्मा फुले यांच्याऐवजी निळू फुले यांनाच केला मानाचा मुजरा

कोल्हापूरच्या एका भाजप नेत्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओत हा नेता भाषणात महात्मा फुले यांचं नाव घ्यायला जातो पण थेट निळू फुले यांचं नाव घेऊन टाकतो.

अरे देवा! आता हेच बघायचं राहिलेलं, भाजप नेत्याने महात्मा फुले यांच्याऐवजी निळू फुले यांनाच केला मानाचा मुजरा
Follow us
| Updated on: Apr 05, 2023 | 9:31 PM

कोल्हापूर : महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) जनतेला आगामी काळात काय-काय पाहावं लागेल हे येणाऱ्या दिवसांमध्ये निश्चितच दृष्टीक्षेपात येईल. पण सध्याच्या काळात महाराष्ट्र जे पाहतोय ते देखील भयानक आहे. महाराष्ट्रातील राजकारण गेल्या काही दिवसांपासून आक्रमक झाल्याची चर्चा आहे. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती नष्ट होत चालली असल्याची भावना सर्वसामान्यांमध्ये आहे. कारण महाराष्ट्राने एकेकाळी दिग्गज नेते पाहिली, त्यांच्याकडून पक्षभेद बाजूला सारुन राजकारणा पलीकडची मैत्री जपताना पाहिली गेली. पण आता राजकीय प्रतिस्पर्धी हा शत्रूच आहे की काय? असा विचार करुन राजकारणाला वेगळं वळण दिलं जातंय. त्यातून टोकाची टीका आणि राजकीय राडा उदयास येत असताना दिसत आहे. विशेष म्हणजे हेही असे की थोडे आता एका भाजप नेत्याचा वेगळाच व्हिडीओ समोर आला आहे.

कोल्हापूरच्या एका भाजप नेत्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओत हा नेता भाषणात महात्मा फुले यांचं नाव घ्यायला जातो पण थेट निळू फुले यांचं नाव घेऊन टाकतो. खरंतर महाराष्ट्र हा शाहू-फुले-आंबेडकर यांचा सर्वसमावेशक आणि पुरोगामी महाराष्ट्र आहे, असं आपण आदराने म्हणतो. पण याच महाराष्ट्रात भाजप सारख्या पक्षाच्या एका नेत्याला महात्मा फुले यांचं नाव लक्षात राहत नाही. हा नेता महात्मा फुले यांच्याऐवजी थेट निळू फुले यांचं नाव घेतो. ‘शाहू, निळू फुले, आंबेडकर यांना मानाचा मुजरा’ असं धक्कादायक वक्तव्य भाषणात करतो. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

संबंधित व्हिडीओतला नेता नेमका कोण?

संबंधित व्हायरल होणारा व्हिडीओ हा कोल्हापुरातला आहे. कोल्हापूरच्या चंदगड तालुक्यातील वाळकुडी-केरवडे येथे जलजीवन योजनेचा आणि रस्त्याच्या उद्घाटनाचा कार्यक्रम थाटामाटात पार पडला. या कार्यक्रमात संबंधित नेता बोलत होता. हा नेता भाजप पक्षाचा आहे. विशेष म्हणजे संबंधित नेता हा भाजपचा आगामी विधानसभेचा संभाव्य उमेदवार असल्याची माहिती आहे. या नेत्याचं नाव शिवाजीराव पाटील असं आहे.

हे सुद्धा वाचा

शिवाजीराव पाटील हे छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानाचा मुजरा असं वक्तव्य करत असताना थेट निळू फुले यांना मानाचा मुजरा करतात. निळू फुले हे खरंच दिग्गज अभिनेते होते. त्यांच्या सारखा दिग्गज कलाकार या महाराष्ट्रात कधीच जन्माला येणार नाही. त्यांचं नाव मनोरंजन क्षेत्रात नेहमीच चिरतरुण राहील. पण त्यांचा उल्लेख ज्या पद्धतीने चुकून एका संभाव्य आमदाराने आपल्या भाषणात केलाय त्यावरुन संबंधित नेत्यावर टीका होतेय.

“महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करुन…तसेच शाहू, निळू फुले, आंबेडकर यांना मानाचा मुजरा करुन..”, असं म्हणत शिवाजीराव पाटील आपल्या भाषणाची सुरुवात करतात. पण त्यांच्या भाषणातील हा अवघ्या काही सेकंदाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. त्यांच्यावर सडकून टीका केली जातेय. ते आमदारकीची निवडणूक लढवतात आणि त्यांना महात्मा फुले कसे माहीत असू शकत नाही? असा प्रश्न सोशल मीडियावर विचारला जातोय.

जेव्हा इम्तियाज जलील अंबादास दानवेंना मिठी मारतात..
जेव्हा इम्तियाज जलील अंबादास दानवेंना मिठी मारतात...
सदावर्तेंवर बोलतना मनसे नेत्याची जीभ घसरली, 'पाळलेला कुत्रे....'
सदावर्तेंवर बोलतना मनसे नेत्याची जीभ घसरली, 'पाळलेला कुत्रे....'.
कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल
कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल.
..अन् गर्भवतीचा मृत्यू, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी, घडलं काय?
..अन् गर्भवतीचा मृत्यू, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी, घडलं काय?.
मराठीत बोला, मनसेची थेट बँकांमध्येच धडक; 15 दिवसांचा अल्टिमेटम
मराठीत बोला, मनसेची थेट बँकांमध्येच धडक; 15 दिवसांचा अल्टिमेटम.
कुठं मेघगर्जना कुठं गारपीट, अवकाळीनं झोडपलं; कोणत्या जिल्ह्यात हैदोस?
कुठं मेघगर्जना कुठं गारपीट, अवकाळीनं झोडपलं; कोणत्या जिल्ह्यात हैदोस?.
दमानिया आणि देशमुखांनी अंतरावालीत जरांगेंची भेट घेतली, काय झाली चर्चा?
दमानिया आणि देशमुखांनी अंतरावालीत जरांगेंची भेट घेतली, काय झाली चर्चा?.
सोनं एकाच वर्षात साठीतून नव्वदीपर्यंत, लवकरच गाठणार....
सोनं एकाच वर्षात साठीतून नव्वदीपर्यंत, लवकरच गाठणार.....
अवकाळीचा तडाखा; पिकं मातीमोल, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा तडाखा; पिकं मातीमोल, शेतकरी हवालदिल.
शिंदेंच्या सभास्थळी टीव्ही 9च्या पत्रकाराला पोलिसांची धक्काबुक्की
शिंदेंच्या सभास्थळी टीव्ही 9च्या पत्रकाराला पोलिसांची धक्काबुक्की.