अजित पवार यांची नोटबंदीवर तीन ओळींची प्रतिक्रिया; म्हणाले, अरे काय चाललंय काय?

Ajit Pawar on Notbandi : दोन हजाराच्या नोटेवर बंदी विरोधीपक्षनेते अजित पवार यांची तीन ओळींची प्रतिक्रिया; महिलांनाही सल्ला, म्हणाले...

अजित पवार यांची नोटबंदीवर तीन ओळींची प्रतिक्रिया; म्हणाले, अरे काय चाललंय काय?
Follow us
| Updated on: May 20, 2023 | 12:17 PM

कोल्हापूर : काल दोन हजारच्या नोटांसंदर्भात रिजर्व्ह बँकेने मोठा निर्णय घेतला. 30 सप्टेंबपर्यंत दोन हजाराच्या नोटा बँकेत जमा करण्याचे आदेश देण्यात रिझर्व्ह बँकेने दिले आहेत. रिझर्व्ह बँकेने दोन हजारांच्या नोटा जमा करण्यासाठी 23 मे ते 30 सप्टेंबर अशी मुदत दिली आहे. यावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ठकाल फतवा काढला 2 हजार ची नोट बंद केली. अरे काय चाललंय काय? महिलांनी जपून ठेवलेल्या नोटा आता बँकेत द्या आणि बदलून घ्या”, असं अजित पवार म्हणालेत.

अजित दादा पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. गोकुळचे ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे यांच्या चिरंजीवी हॉटेलचा उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते झालं. इथं बोलताना अजित पवार यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.

या कार्यक्रमात अजित पवार यांनी आपल्या शैलीत भाषाणाला सुरवात केली आहे. अजित पवार बोलायला उभे राहताच निवेदक 1980 ची आठवण सांगत होते. अजित दादांनी त्याला थांबवून ज्यांनी आठवण काढायची ते काढत नाहीत. तू काढून काय उपयोग असं म्हणतं भाषणाला सुरवात केली. यावेळी अजिदादांच्या वक्तव्याने एकच हशा पिकला.

दुपारी दोन वाजता अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजितदादा कार्यकर्त्यांना करणार मार्गदर्शन आहेत.

राज्यात कशी भाषा वापरली जात आहे. जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करायचा प्रयत्न होतोय. का जातीय दंगली वाढत आहेत?काही राज्यकर्ते जाणवपूर्वक करण्याच्या करता बेरोजगारी महागाई वरचे विचलीत करण्याचा प्रयत्न करत आहेत.काही देवस्थानांनी कमी कपडे घालून मंदिरात यायचं नाही असं सांगितलं. अनेक ठिकाणी पोशाखच तसा आहे, त्याला काय करणार. कुणी गोमूत्र शिपडतंय कोणी काय करताय. कोणत्या मार्गाने तुम्ही महाराष्ट्राला घेऊन जाताय?, असा सवाल अजित पवार यांनी विचारला आहे.

मंदिराप्रमाणे दर्गात ही आपण जातो. व्यवसाय चालण्यासाठी कायदा सुव्यवस्था तर चांगला असला पाहिजे.आताच्या राज्यकर्त्यांकडे तसं काही दिसत नाही. भ्रष्टाचार वाढला आहे, असं म्हणत अजित पवार यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केलंय.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.