‘दुसऱ्याचा चेहरा इतका काळा करायचा की शेजारचा गोरा वाटला पाहिजे’, धनंजय महाडिक नेमकं काय म्हणाले?

भाजप खासदार धनंजय महाडिक यांनी आज काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्यावर सडकून टीका केली. "सतेज पाटील यांनी संजय मंडलिक यांच्यावर टीका करण्याऐवजी त्यांचा अपप्रचार सुरू केलेला आहे", असा आरोप धनंजय महाडिक यांनी केला.

'दुसऱ्याचा चेहरा इतका काळा करायचा की शेजारचा गोरा वाटला पाहिजे', धनंजय महाडिक नेमकं काय म्हणाले?
धनंजय महाडिक आणि सतेज पाटील
Follow us
| Updated on: Apr 30, 2024 | 10:13 PM

कोल्हापुरात भाजप खासदार धनंजय महाडिक यांनी काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली आहे. कोल्हापूर लोकसभेचे शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांच्यावर सतेज पाटील यांनी टीका केली होती. संजय मंडलिक हे महायुतीचे उमेदवार आहेत. त्यामुळे धनंजय महाडिक यांनी संजय मंडलिक यांच्यावरील टीकेला सतेज पाटलांना प्रत्युत्तर दिलं आहे. “सतेज पाटील यांनी संजय मंडलिक यांच्यावर टीका करण्याऐवजी त्यांचा अपप्रचार सुरू केलेला आहे. सतेज पाटील हे संजय मंडलिक यांना कृतघ्न म्हणत आहेत. उमेदवारी जाहीर होण्याअगोदर संजय मंडलिक यांच्यासोबत त्यांचे अनेक जाहीर कार्यक्रम सुरू होते. 32 कोटी रुपयांच्या निधींचं उद्घाटनही त्यांनी मंडलिकांसोबत केले. त्यावेळी संजय मंडलिक हे कार्यक्षम होते आणि आता हे महायुतीचे उमेदवार म्हणून निवड झाल्यानंतर ते कृतघ्न कसे झाले आहेत?”, असा सवाल धनंजय महाडिक यांनी केला.

“ही सतेज पाटील यांची स्टाईल आहे, जोपर्यंत आपल्यासोबत आहे तोपर्यंत चांगला. दुसरीकडे गेलं तर त्याचं चारित्र्य हनन करायचं ही त्यांची पद्धत आहे. दुसऱ्याचा चेहरा इतका काळा करायचा की शेजारचा गोरा वाटला पाहिजे. महादेवराव महाडिक यांचा मानसपुत्र म्हणून त्यांनी राजकारणात सुरुवात केली. कारण त्यांना दिग्विजय खानविलकर यांचा पराभव करायचा होता. त्यानंतर ते महाडकांविरोधातच उभे राहिले. जिल्ह्यातल्या सत्ता त्यांना हातात घ्यायच्या होत्या आणि विरोधात कोणी गेलं तर त्यांच्या विरोधात राहायचं ही त्यांची पद्धत आहे”, अशी टीका धनंजय महाडिक यांनी केली.

‘युज अँड थ्रो, त्यांची पॉलिसी’

“जोपर्यंत आपला स्वार्थ आहे तोपर्यंत त्या व्यक्तीला वापरून घ्यायचं, युज अँड थ्रो, त्यांची पॉलिसी आहे. या निवडणुकीतही त्यांचा स्वार्थ पाहायला मिळतोय. विधान परिषदेच्या वेळी देखील निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी विनय कोरे यांना मध्यस्थी करून त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शब्द दिला की, राजाराम कारखान्याची निवडणूक लढवणार नाही आणि निवडून आल्यानंतर त्यांनी राजाराम कारखान्यात पॅनल उभं केलं. वाईट गोष्टी बोलायच्या, चरित्र हनन करायचं, निंदा नालस्ती करायची हा त्यांच्या स्वभावाचा गुण आहे”, असा घणाघात धनंजय महाडिकांनी केला.

‘सतेज पाटील लबाड’

“राजाराम कारखान्यांच्या निवडणुकीतच जिल्ह्यातल्या लोकांना लक्षात आलं की सतेज पाटील लबाड आहे म्हणून सभासदांनी त्यांना दणका दिला. 2019 साली महायुतीला कौल दिला. शिवसेना-भाजपचं सरकार येणार अशी परिस्थिती होती. मात्र उद्धव ठाकरेंनी वेगळा निर्णय घेतला. महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर पालकमंत्री पदाची निवड प्रक्रिया सुरू झाली. त्यावेळी हसन मुश्रीफ यांचा क्लेम कोल्हापूरवर होता. कारण ते 5 वेळा आमदार झालेले आहेत. मात्र मुश्रीफांना वेगळ्या जिल्ह्यात पाठवलं आणि सतेज पाटील यांनी दिल्लीपर्यंत जाऊन मुश्रीफांचा इथला क्लेम हाणून पाडला आणि स्वतः इथलं पालकमंत्री पद घेतलं”, असा दावा महाडिकांनी केला.

‘मुश्रीफांचा बदला आपण घेतला पाहिजे’

“मुश्रीफांना नगरच्या पालकमंत्री पद घ्यावं लागलं. हसन मुश्रीफांचा राजकीय प्रवास मोठा असताना देखील त्यांची इच्छा असताना देखील त्यांना तो क्लेम, हक्क हिसकावून घेण्याचे काम सतेज पाटील यांनी केलं आहे. आता त्यांचा बदला आपण घेतला पाहिजे. याचा हिसका त्यांना दाखवला पाहिजे. असं मी कागलकरांना आवाहन केलेलं आहे. कागलची जनता मुश्रीफांच्या अपमानाचा बदला घेईल”, असं धनंजय महाडिक म्हणाले.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.