AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kolhapur By Election : कोल्हापूर उत्तरमधील मतदारांचा कौल कुणाला? उद्या निकाल, मतमोजणीची तयारी सुरु

मतमोजणी सुरु झाल्यानंतर चारच तासांत कोल्हापूरचं 'उत्तर' मिळण्याची शक्यता आहे. या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस पर्यायानं महाविकास आघाडी आणि भाजपनं चांगलाच जोर लावला होता. दोन्हीकडील मोठ्या नेत्यांनी मतदारसंघात तळ ठोकल्याचं पाहायला मिळालं होतं.

Kolhapur By Election : कोल्हापूर उत्तरमधील मतदारांचा कौल कुणाला? उद्या निकाल, मतमोजणीची तयारी सुरु
मतमोजणी फाईल फोटोImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 15, 2022 | 4:55 PM

कोल्हापूर : राज्यात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) विरुद्ध भाजप (BJP) असं जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. अशावेळी कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीचा (Kolhapur North Assembly By Election) निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. कोल्हापूर उत्तरचा निकाल शनिवारी दुपारपर्यंत स्पष्ट होईल. त्यासाठी मतमोजणीची जोरदार तयारी सध्या सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. राजाराम तलावाशेजारी जलसंपदा विभागाच्या गोदामात मतमोजणी होणार आहे. मतमोजणी सुरु झाल्यानंतर चारच तासांत कोल्हापूरचं ‘उत्तर’ मिळण्याची शक्यता आहे. या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस पर्यायानं महाविकास आघाडी आणि भाजपनं चांगलाच जोर लावला होता. दोन्हीकडील मोठ्या नेत्यांनी मतदारसंघात तळ ठोकल्याचं पाहायला मिळालं होतं.

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मंगळवार, 12 एप्रिल रोजी मतदान पार पडलं होतं. जवळपास 61.19 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव आणि भाजप उमेदवार सत्यजित कदम यांच्यासह 15 उमेदवार नशीब आजमावत आहेत. पालकमंत्री सतेज पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. त्यामुळे या पोटनिवडणुकीत चुरस निर्माण झाली होती.

मतमोजणीची तयारी, कडेकोट सुरक्षाव्यवस्था

शनिवारी सकाळी 8 वाजता मतमोजणीला प्रारंभ होईल. सुरुवातीला टपाली मतदान मोजले जाईल. त्यानंतर 14 टेबलांवर ईव्हीएमवरील मतांची मोजणी सुरू होईल. मतमोजणीच्या एकूण 26 फेऱ्या होतील. यानंतर उमेदवार अथवा त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत चिठ्ठ्या काढून पाच ईव्हीएम निवडले जातील आणि त्या मशिनच्या व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्या मोजल्या जाणार आहेत.

मतमोजणीसाठी टेबलवर 45 कर्मचाफऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासह राखीव आणि अन्य असे एकूण 125 कर्मचारी नियुक्त केले आहेत. या कर्मचार्यांना गुरुवारी प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी श्रावण क्षीरसागर, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी संतोष कणसे, रंजना बिचकर, अर्चना कापसे उपस्थित होते.

‘ईव्हीएम’ला तिहेरी सुरक्षा

मतदान झालेले ईव्हीएम बुधवारी पहाटे गोदामात ठेवण्यात आले. यानंतर गोदाम सील करण्यात आले असून त्याभोवती सध्या तिहेरी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. गोदामाभोवती केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे जवान, त्यानंतर राज्य राखीव पोलिस दलाचे जवान आणि त्यापुढे स्थानिक पोलिसांचे पथक खडा पहारा देत आहे. याखेरीज दर आठ तासांकरिता नायब तहसीलदारांच्याही नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. संपूर्ण परिसरात व्हॉईस रेकॉर्डिंग आणि द़ृश्य चित्रित करणारे सीसीटीव्ही कॅमेरेही बसविण्यात आले आहेत.

इतर बातम्या :

Sharad Pawar Live : त्यांच्याकडे बोलायला काही नाही, शरद पवारांनी पुन्हा राष्ट्रवादीतल्या ओबीसी, आदिवासी नेत्यांची यादी वाचली, फडणवीस बोलणार?

Pawar On James Laine Controversy : तेही गलिच्छ, शरद पवारांनी जळगावमध्ये बाबासाहेब पुरंदरेंचा शिवजयंतीवरचा माफीनामा वाचून दाखवला

पश्चिम रेल्वेने प्रवास करताय?आज 4 तास मेगाब्लॉक, कोणत्या वेळात असणार?
पश्चिम रेल्वेने प्रवास करताय?आज 4 तास मेगाब्लॉक, कोणत्या वेळात असणार?.
मुंबईकरांनो.... या रविवारी लोकलने बिनधास्त फिरा, कारण मध्य रेल्वेवर...
मुंबईकरांनो.... या रविवारी लोकलने बिनधास्त फिरा, कारण मध्य रेल्वेवर....
लाडक्या बहिणींनो... 2100 रूपये मिळणार पण...उदय सामंत बघा काय म्हणाले?
लाडक्या बहिणींनो... 2100 रूपये मिळणार पण...उदय सामंत बघा काय म्हणाले?.
गंगा एक्सप्रेसवेवर हवाई दलाच्या एअरशोमध्ये राफेल-जॅग्वारचा दिसला स्वॅग
गंगा एक्सप्रेसवेवर हवाई दलाच्या एअरशोमध्ये राफेल-जॅग्वारचा दिसला स्वॅग.
इमरान खान जेलमधून सुटणार? 34 लाख ट्विट्स अन् समर्थकांकडून एकच मागणी
इमरान खान जेलमधून सुटणार? 34 लाख ट्विट्स अन् समर्थकांकडून एकच मागणी.
पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर राजीनामा देणार? कोणाकडून होतेय मागणी?
पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर राजीनामा देणार? कोणाकडून होतेय मागणी?.
भारताचा डिजिटल स्ट्राईक; पाकला दाखवली जागा, भल्या-भल्यांना भारतात बॅन
भारताचा डिजिटल स्ट्राईक; पाकला दाखवली जागा, भल्या-भल्यांना भारतात बॅन.
भारताकडून डिजिटल स्ट्राईक; थेट पंतप्रधानांचं यूट्यूब चॅनेलच केलं बंद
भारताकडून डिजिटल स्ट्राईक; थेट पंतप्रधानांचं यूट्यूब चॅनेलच केलं बंद.
अटारी बॉर्डरवर तोबा गर्दी, स्वतःच्या नागरिकांसाठी पाकिस्तान गेट उघडेना
अटारी बॉर्डरवर तोबा गर्दी, स्वतःच्या नागरिकांसाठी पाकिस्तान गेट उघडेना.
बिलावल भुट्टोची मोठी कबुली, पाकिस्तानला एक भूतकाळ अन् त्याची किंमत...
बिलावल भुट्टोची मोठी कबुली, पाकिस्तानला एक भूतकाळ अन् त्याची किंमत....