Kolhapur North By Election : कोल्हापुरात एका पाटलांची सरशी तर दुसऱ्या पाटलांची पिछेहाट! 2019 पासूनचं गणित काय सांगतं?

काँग्रेसचे नेते आणि पालकमंत्री सतेज पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र, 2019 प्रमाणे सतेज पाटील यांनी किमया करत चंद्रकांत पाटलांना जोरदार हादरा दिलाय. त्यामुळे कोल्हापुरात एका पाटलांची सरशी तर दुसऱ्या पाटलांची पिछेहाट झाल्याचं पुन्हा एकदा पाहायला मिळालं.

Kolhapur North By Election : कोल्हापुरात एका पाटलांची सरशी तर दुसऱ्या पाटलांची पिछेहाट! 2019 पासूनचं गणित काय सांगतं?
चंद्रकांत पाटील, सतेज पाटीलImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 16, 2022 | 5:40 PM

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत (Kolhapur North By Election) काँग्रेस पर्यायानं महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव विजयी झाल्या आहेत. जाधव यांनी भाजप उमेदवार सत्यजीत कदम यांचा 18 हजारापेक्षा जास्त मतांनी पराभव केलाय. ही निवडणूक जयश्री जाधव विरुद्ध सत्यजीत कदम अशी झाली असली तरी खरा सामना हा कोल्हापूरच्या दोन पाटलांमध्ये होता. काँग्रेसचे नेते आणि पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र, 2019 प्रमाणे सतेज पाटील यांनी किमया करत चंद्रकांत पाटलांना जोरदार हादरा दिलाय. त्यामुळे कोल्हापुरात एका पाटलांची सरशी तर दुसऱ्या पाटलांची पिछेहाट झाल्याचं पुन्हा एकदा पाहायला मिळालं.

सतेज पाटील विरुद्ध चंद्रकांत पाटील

काँग्रेसचे सतेज पाटील विरुद्ध भाजपचे चंद्रकांत पाटील हा सामना 2019 च्या विधानसभा निवडणुकीपासून पाहायला मिळत आहे. 2019 पासून चंद्रकांत पाटील यांच्याकडे भाजपचं प्रदेशाध्यक्षपद आहे. असं असलं तरी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला कोल्हापुरात भोपळाही फोडता आला नव्हता. कोल्हापूर जिल्ह्यात विधानसभेच्या एकूण 10 जागा आहेत. त्यापैकी काँग्रेसच्या सतेज पाटलांनी 4 जागा निवडून आणल्या. मात्र, चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात भाजपला कोल्हापुरातील एकही जागा जिंकता आली नाही.

सतेज पाटील यांच्या नेतृत्वात कोल्हापुरात काँग्रेस विविध निवडणुका जिंकताना दिसतेय. कोल्हापूर महापालिका, विधानसभा निवडणुकीत सतेज पाटलांचं नेतृत्व पुन्हा एकदा सिद्ध झालं. 2020 मध्ये विधान परिषद निवडणुकीत त्यांनी जयंत आसगावकरांना विजयी केलं. ते स्वत: विधान परिषदेवर बिनविरोध निवडून गेले. कोल्हापुरातील राजकारणाचं केंद्र मानलं जाणाऱ्या गोकुळ दूध संस्थेवरही सतेज पाटलांच्या पॅनलनं बाजी मारली. त्यानंतर आता चंद्रकांत जाधव यांच्या निधनातर झालेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत सतेज पाटलांनी जयश्री जाधवांना विजयी करुन दाखवलं. त्यामुळे कोल्हापुरात एका पाटलांना सातत्यानं विजयी गुलाल लागतोय. तर दुसऱ्या पाटलांना पराभव चाखावा लागत असल्याचं पाहायला मिळत आहे.

चंद्रकांतदादा पुण्यातून आमदार

चंद्रकांत पाटील हे मूळचे कोल्हापूरचे आहेत. मात्र, त्यांना भाजपनं पुण्यातील कोथरुडमधून उमेदवारी देत निवडून आणलं. त्यावरुनही विरोधक चंद्रकांत पाटील यांच्यावर सातत्याने टीका करतात. अशावेळी पाटील यांनी कोल्हापुरातून हरलो तर हिमालयात जाईल अशी घोषणाच केली होती. मात्र, आता भाजप उमेदवाराला पराभव पत्करावा लागल्यानंतर विरोधकांकडून चंद्रकांतदादांची खिल्ली उडवली जातेय. मात्र, चंद्रकांतदादा यांनी मी निवडणुकीत उभा राहिलो आणि हरलो तर हिमालयात जाईन असं वक्तव्य केल्याचं म्हटलंय.

इतर बातम्या :

Kolhapur By Election Result 2022 : चंद्रकांत पाटील यांच्यासारख्या दिसणाऱ्या तरुणाची मिरवणूक, हिमालयात चालल्याचे पोस्टर दाखवत तरूणांचा जल्लोष

Kolhapur North By Election 2022 : चंद्रकांतदादांनी खरोखरच हिमालयात जावं, मीही सोबत येईल; जयंत पाटलांनी उडवली खिल्ली

Hanuman Chalisa Politics : तर ‘मातोश्री’ रावणाची लंका होईल, राणा दाम्पत्याचा उद्धव ठाकरेंवर निशाणा; हनुमान चालीसा पठणाचाही निर्धार

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.