Kopri Pachpakhadi Vidhan Sabha 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विजयाच्या मार्गात अडथळे काय? मतदारसंघात प्रश्न काय?

Kopri Pachpakhadi Vidhan Sabha 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्याच्या कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. या मतदारसंघाची रचना कशी आहे? मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात नागरिकांच्या समस्या काय आहेत? स्थानिक पातळीवर कुठून आव्हान मिळू शकतं? त्याचा घेतलेला आढावा.

Kopri Pachpakhadi Vidhan Sabha 2024 :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विजयाच्या मार्गात अडथळे काय? मतदारसंघात प्रश्न काय?
Eknath ShindeImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Oct 30, 2024 | 2:00 PM

यंदा ठाण्याचा कोपरी पाचपाखाडी मतदारसंघ चर्चेत आहे, याचं कारण आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. यापूर्वी या मतदारसंघाची कधी इतकी चर्चा झाली नव्हती. पण आता चर्चा होतेय, कारण स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या मतदारसंघातून उमेदवार आहेत. दोन दिवसांपूर्वी सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्याच्या कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून भव्य शक्ती प्रदर्शन करुन उमेदवारी अर्ज दाखल केला. ठाणे हा 90 च्या दशकापासून शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. सातत्याने इथून शिवसेनेचे आमदार, खासदार निवडून आले आहेत. दोन वर्षांपूर्वी शिवसेनेत उभी फूट पडली. दोन गट झाले. सध्या अधिकृत शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदेंकडे आहे. चार महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत ठाण्यात शिवसेना एकनाथ शिंदे गटाची ताकद दिसून आली. शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के हे 2 लाखापेक्षा जास्त मताधिक्क्याने निवडून आले.

ठाणेकरांनी आपण एकनाथ शिंदेंसोबत असल्याचा कौल दिला. त्यामुळे विधानसभा निवडणूक मुख्यमंत्र्यांसाठी तशी सोपी आहे. या मतदारसंघात त्यांच्यासमोर असं मोठ आव्हान नाहीय. उद्धव ठाकरे गटाने स्वर्गीय आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांना उमेदवारी दिलीय. उद्धव ठाकरे यांनी केदार दिघेंना उमेदवारी देऊन भावनिक कार्ड खेळलं आहे. आनंद दिघे हे ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेचे मोठे नेते होते. शिवसेना पक्ष घराघरात पोहोचवण्यात, मनामनात रुजवण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. एकनाथ शिंदे हे नेहमीच आनंद दिघे हे राजकीय गुरु, मार्गदर्शक असल्याच सांगत आले आहेत. केदार दिघे हे नात्याने आनंद दिघे यांचे भाचे आहेत. पण आनंद दिघेंचा राजकीय वारसदार, उत्तराधिकारी म्हणून एकनाथ शिंदेंकडे पाहिलं जातं.

कोपरी-पाचपाखाडीमधून एकनाथ शिंदे कितीवेळा आमदार?

कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांच्या विजयात अडचणी येण्याची शक्यता कमी आहे. स्थानिक पातळीवर एकनाथ शिंदे यांना आव्हान देऊ शकणारा एकही नेता काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाकडे नाहीय. एकनाथ शिंदे 2004 पासून 2019 पर्यंत सलग चार वेळा या मतदारसंघातून निवडणूक जिंकले आहेत. 2004 साली ठाणे शहर हा मतदारसंघ अतिशय मोठा होता. पण 2008 साली मतदारसंघ पूनर्रचनेनंतर ठाणे शहरातून कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघ वेगळा झाला. एकनाथ शिंदे यांनी नेहमीच या मतदारसंघातून जवळपास लाखाच्या मताधिक्क्याने विजय मिळवला आहे.

कसा आहे कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघ?

एकनाथ शिंदे यांच्या कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघात ठाणे स्टेशनच्या पूर्वेकडील भाग, कोपरी गाव, आनंद नगर हा भाग येतो. ठाणे स्टेशनच्या पश्चिमेकडील लुईस वाडी, हाजूरी, रामचंद्र नगर, राम नगर, ज्ञानेश्वर नगर, किसान नगर एक ते चार आणि वागळे इस्टेटचा भाग याच मतदार संघात येतो.

मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात समस्या काय?

एकनाथ शिंदे यांच्या या मतदारसंघात अनेक जुन्या, धोकादायक आणि अनधिकृत इमारती आहेत. क्लस्टर डेव्हलपमेंटच्या माध्यमातून इथे विकास घडवू. लोकांना रहायला चांगला फ्लॅट मिळेल असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उमेदवारी अर्ज भरताना दिलय.

कोपरी-पाचपाखडीमधील किती उमेदवारी अर्ज वैध ठरले?

कोपरी-पाचपाखडी मतदार संघातून 14 उमेदवारांचे 18 अर्ज दाखल करण्यात आले होते. आजच्या अर्ज छाननीच्या दिवशी दोन अर्ज अवैध ठरले, तर 12 उमेदवारांचे 16 अर्ज वैध ठरले आहेत. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अर्ज देखील वैध ठरला आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.