Breaking : लखीमपूर हिंचारासाविरोधात महाविकास आघाडी आक्रमक, 11 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंद
लखीमपूर हिंसाचार प्रकरणावरुन महाविकास आघाडी सरकारनं आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळतंय. या हिंसाचाराच्या निषेधात 11 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिलीय. हा बंद महाविकास आघाडी सरकारकडून म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेनं पुकारण्यात आल्याचं जयंत पाटील म्हणाले.
मुंबई : लखीमपूर हिंसाचार प्रकरणावरुन महाविकास आघाडी सरकारनं आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळतंय. या हिंसाचाराच्या निषेधात 11 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिलीय. हा बंद महाविकास आघाडी सरकारकडून म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेनं पुकारण्यात आल्याचं जयंत पाटील म्हणाले. तसंच अन्य मित्र पक्षांशीही बोलणं सुरु असल्याचं पाटील म्हणाले. (Mahavikas Aghadi calls for Maharashtra Bandh over Lakhimpur violence case)
उत्तर प्रदेशात लखीमपूरला जी घटना घडली शेतकऱ्यांना चिरडून मारण्याची. त्याचा निषेध 11 तारखेला केला जाणार आहे. आज मंत्रिमंडळातही याबाबत सर्वांनी खेद व्यक्त केलाय. तसंच मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. भारतीय जनता पक्ष देशातील शेतकऱ्यांविरोधात ज्या क्रुरतेनं वागत आहे, देशात जागोजागी सुरु असलेली शेतकऱ्यांची आंदोलनं चिरडण्याचं काम भारतीय जनता पक्ष करत आहे. त्याचा निषेध अत्यंत आवश्यक आहे. लखीमपूर हिंसाचारातील आरोपींना अद्याप अटक करण्यात आली नाही, अशी आमची माहिती आहे. त्यामुळे ज्या बेमुवर्तखोरपणे उत्तर प्रदेश सरकार आरोपींवर कारवाई करत नाही, त्याचाही निषेध झाला पाहिजे, असं जयंत पाटील म्हणाले.
लोकशाहीविरोधात आवाज उठवणाऱ्यांची नाकेबंदी सुरु- संजय राऊत
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. संजय राऊत यांनी यावेळी लखीमपूर येथील घटनेवर भाष्य केलं. उत्तर प्रदेशात घडलेल्या घटनेची तुलना राष्ट्रवादी काँग्रसेचे अध्यक्ष शरद पवार यांनी जालियनवाला बाग घटनेशी केली होती, ती तुलना योग्यच असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. जनतेच्या संतापाला वाट मोकळी करुन देणं हे विरोधकांचं काम असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी लखीमपूरला जाणार आहेत, त्यांनाही अडवलं जाईल, असं संजय राऊत म्हणाले. राहुल गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी नोटिस बजाविल्याची माझी माहिती आहे, असं राऊत यांनी स्पष्ट केलं. लोकशाहीसंदर्भात आवाज जो उठवतो, त्याची नाकेबंदी केली जाते, देशद्रोही ठरविले जाते, अशा प्रकारचा अवलंब होत असेल तर देशामध्ये नव्या प्रकारली गुलामगिरी सुरु झाली, अशी टीका संजय राऊत यांनी भाजपवर केली आहे.
राहुल गांधी लखीमपूरला रवाना
राहुल गांधी आज लखीमपूरला रवाना झाले आहेत. तत्पूर्वी राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. आपल्या देशात शेतकऱ्यांवर हल्ला होत आहे. त्यांनी जीपखाली चिरडले जात आहे. मंत्र्यांवर कारवाई केली जात नाही. यापूर्वी त्यांची शेती हिसकावून घेतली गेली. तीन कृषी कायदे बनविण्यात आले. त्यामुळेच शेतकरी आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांमध्ये प्रचंड आक्रोश आहे, असं राहुल गांधी म्हणाले.
इतर बातम्या :
Mahavikas Aghadi calls for Maharashtra Bandh over Lakhimpur violence case