Lal Mahal Controversy : लाल महालात लावणीचे सूर! संभाजी ब्रिगेडसह अनेक संघटना आक्रमक, गुन्हाही दाखल; संपूर्ण वाद वाचा एका क्लिकवर

वैष्णवीने 'चंद्रमुखी' सिनेमातील 'चंद्रा' गाण्यावर लावणीचा व्हिडीओ लाल महालात शूट केला. हा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर टाकल्यानंतर त्यावर विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटू लागल्या. संभाजी ब्रिगेडसह अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी लाल महालातील लावणीच्या शुटिंगला जोरदार विरोध केला आहे.

Lal Mahal Controversy : लाल महालात लावणीचे सूर! संभाजी ब्रिगेडसह अनेक संघटना आक्रमक, गुन्हाही दाखल; संपूर्ण वाद वाचा एका क्लिकवर
लाल महाल, पुणेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 21, 2022 | 5:16 PM

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज (Chatrapati Shivaji Maharaj) यांनी ज्या लाल महालाच्या वास्तूमध्ये शाहिस्तेखानाची बोटं छाटली, त्यात वास्तूमध्ये लावणीचे सूर घुमले! त्यावरुन आता मोठा वाद सुरु झाला आहे. लाल महालात (Lal Mahal) लावणी नृत्याचा व्हिडीओ शूट केल्या प्रकरणी राज्यभरातून निषेध व्यक्त केला जातोय. या प्रकरणी आता डान्सर वैष्णवी पाटीलसह (Vaishnavi Patil) चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैष्णवीने ‘चंद्रमुखी’ सिनेमातील ‘चंद्रा’ गाण्यावर लावणीचा व्हिडीओ लाल महालात शूट केला. हा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर टाकल्यानंतर त्यावर विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटू लागल्या. संभाजी ब्रिगेडसह अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी लाल महालातील लावणीच्या शुटिंगला जोरदार विरोध केला आहे.

संभाजी ब्रिगेडचा तीव्र विरोध

मानसी पाटील, कुलदीप बापट आणि केदार अवसरे यांनी एक गाणे त्या ठिकाणी लाल महालात शूट केले आहे. त्यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली. जिजाऊ-शिवरायांची अस्मिता म्हणजे तो लाल महाल आहे. हजारो शिवप्रेमी लाल महालात जाऊन नतमस्तक होत असतात. त्याच ठिकाणी लाल महाल बंद असताना चित्रपटाची घाणेरडी गाणी चित्रीत करून लाल महाल बदनाम केला जात आहे, असा आरोप संभाजी ब्रिगेड्या संतोष शिंदे यांनी केला आहे.

हे सुद्धा वाचा

वैष्णवी पाटीलकडून जाहीर माफी

“काही दिवसांपूर्वी मी पुण्यातील लाल महालात चंद्रा लावणी या डान्सचा व्हिडीओ केला होता. तो व्हिडीओ करत असताना माझ्या ध्यानीमनीसुद्धा आलं नव्हतं की असं काही होईल. मी एक डान्सर म्हणून तो व्हिडीओ केला. शिवप्रेमींचं आणि तुम्हा सर्वांचं मन दुखावण्याचा माझा अजिबात हेतू नव्हता. मी स्वत: शिवप्रेमी आहे. माझ्याकडून चूक झाली हे मला कळलं आणि ज्याक्षणी मला ते कळलं त्याक्षणी मी तो व्हिडीओ डिलिट केला होता. परंतु तो डिलिट करण्याआधीच तो व्हिडीओ व्हायरल झाला आणि खूप ठिकाणी शेअर झाला. आताही मी चाहत्यांना विनंती करतेय की तो व्हिडीओ डिलिट करा. मी लाल महालात व्हिडीओ करण्याची चूक केली. मी जाणूनबुजून ती चूक केली नव्हती. मी माझी चूक मान्य करते. मी सर्वांची माफी मागते. एक मराठी मुलगी आणि शिवकन्या असल्याचा मला अभिमान आहे. मी पुन्हा कधीच अशी चूक करणार नाही असं वचन देते. फेमस होण्यासाठी हा व्हिडीओ केला असा आरोप अनेकांनी केला. पण असं काहीच नाही”, असं ती या व्हिडीओत म्हणताना दिसतेय.

वैष्णवीसोबत या व्हिडीओत कोरिओग्राफर आणि डान्सर केदार अवसरे यानेसुद्धा जाहीर माफी मागितली. “अर्धवट ज्ञानातून आणि बालबुद्धीने आमच्याकडून ही चूक झाली. यातून कोणालाही दुखावण्याचा आमचा हेतू नव्हता. मोठ्या मनाने आमची चूक पदरात घ्या आणि आम्हाला माफ करा”, असं तो म्हणाला.

खासदार उदयनराजेंचा इशारा

या प्रकरणी खासदार उदयनराजे भोसले यांनी थेट इशारा दिलाय. लाल महाल ही वास्तू नाच गाण्यांच्या चित्रीकरणाची जागा नाही. मात्र, या ठिकाणी कोणतेही ऐतिहासिक, सामाजिक किंवा सांस्कृतिक प्रसंगाशी संबंधित चित्रिकरण करण्यास आमचा आक्षेप नाही. पण या वास्तूचा इतिहास लक्षात घेऊन चित्रीकरण करणं गरजेचं आहे. केवळ व्यावसायिक हेतूनं कुणी या वास्तूचा वापर करत असेल, तर आम्ही ते खपवून घेणार नाही. त्यामुळे संबंधित दोषींवर पोलिसांनी कडक कारवाई करावी, असं उदयनराजे भोसले म्हणाले.

अखिल भारतीय मराठा महासंघाकडून वास्तूचं शुद्धीकरण

पुण्यातील लाल महालात लावणीचं चित्रिकरण झाल्यानंतर अखिल भारतीय मराठा महासंघाकडून शुद्धीकरण करण्यात आले आहे. ज्याठिकाणी गाण्याचे शूटिंग झाले, त्या संपूर्ण परिसराचे शुद्धीकरण अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे करण्यात आले आहे. माँ जिजाऊंच्या पुतळ्याला यावेळी दुग्धाभिषेक घालून अन् शूट झालेल्या ठिकाणी गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण करण्यात आले.

जितेंद्र आव्हाडांकडून संतप्त प्रतिक्रिया

लाल महाल ही ऐतिहासिक वास्तू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसोबत त्या वास्तूचं पवित्र नातं आहे. महाराजांच्या स्पर्श झालेल्या वास्तूमध्ये शुटिंग वाईठ नाही. मात्र, तुम्ही शुटिंग करत असाल तर त्या वास्तूचं एक महत्व आणि ऐतिहासिक वारसा जपला पाहिजे. लाल महालात लावणीचं शुटिंग आक्षेपार्ह आहे. यापुढे असं काही होणार नाही हे पाहिलं जावं, अशी प्रतिक्रिया आव्हाड यांनी दिलीय.

लाल महालात लावणीच्या चित्रिकरणाचा शिवसेनेकडून निषेध

लाल महालाबाहेर आज शिवसेनेकडून वैष्णवी पाटील विरोधात आंदोलन करण्यात आली. लाल महाल ही एक ऐतिहासिक वास्तू आहे. तिथे अशा गोष्टी होणं हे दुर्दैवी आहे. चित्रिकरण करण्यासाठी कोणत्या लोकप्रतिनिधीनं कर्मचाऱ्यावर दबाव टाकला होता याची चौकशी व्हावी. फक्त वैष्णवी पाटीलच नाही तर कर्मचाऱ्यांवरही कारवाई करण्याची मागणी शिवसेना शहराध्यक्ष संजय मोरे यांनी केलीय.

दोषींवर कारवाई करा, भाजपची मागणी

लाल महाल ही भारतभूमीची प्रेरणा असणारी वास्तू आहे. इथं अशा प्रकारचं चित्रीकरण होतं हे दुर्दैवी आहे. आम्ही पोलीस आयुक्तांना भेटून कारवाई करण्याची मागणी केलीय. राज्यातील कोणत्याही वास्तूत अशा पद्धतीचं चित्रीकरण होणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे. यात जो कुणी दोषी असेल त्यावर कारवाई व्हावी अशी मागणी भाजप नेते जगदीश मुळीक यांनी केलीय.

शिवाजी महाराज आणि लाल महालाचे ऐतिहासिक महत्व

छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण लाल महालात गेले. शिवाजी महाराजांच्या पराक्रमाला पाहून औरंगजेब हैराण झाला होता. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी त्याने आपला मामा शाहिस्तेखान याला शिवाजी महाराजांवर चाल करुन जाण्यास सांगितले. ‘सिवाजी तो चूहा है, खाविंद मै ऐसे पकडके लाऊंगा सिवाजी को..!” असं शाहिस्तेखान औरंगजेबाला म्हणाला होता. शाहिस्तेखान दिल्लीवरून एक लाखाची फौज घेऊन महाराष्ट्रात येत होता. त्यावेळी शिवाजी महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकले होते. शाहिस्तेखान काही महिन्यातच पुण्यात येऊन धडकला आणि त्याने आपल्ला मुक्काम लाल महालात ठोकला.

शिवाजी महाराज पन्हाळाच्या वेढ्यातून बाहेर पडत राजगडावर पोहचले. त्यावेळी त्यांना बातमी कळाली की शाहिस्तेखान पुण्यात उच्छाद मांडतोय. शाहिस्तेखानाने पुण्यात स्वैराचार सुरु केला होता. त्याने अनेक गावे उद्ध्वस्त करून प्रजेला हैराण केले होते. तीन वर्षे शाहिस्तेखान पुणे आणि आसपासच्या गावांना त्रास देऊन शिवाजी महाराजांना इशारा देत होता. शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाला धडा शिकवण्यासाठी युद्धनीती आखली. एका रात्री ते अवघ्या निवडक 400 मावळ्यांना घेऊन लालमहालात घुसले. त्यावेळी शिवाजी महाराज आणि शाहिस्तेखानाचा सामना झाला. शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची तीन बोटे छाटली. या लढाईत शाहिस्तेखानाचा मुलगा मारला गेला. याचा शाहिस्तेखानाला जबर हादरा बसला आणि तो अवघ्या तीन दिवसात पुणे सोडून दिल्लीकडे रवाना झाला.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.