कारवाईला वेग, STचे आणखी 174 संपकरी बडतर्फ; आतापर्यंत घरी पाठवलेल्या कर्मचाऱ्यांचा आकडा किती?

आज एकूण 174 एसटी कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. तर शुक्रवारी 182 कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं होतं.

कारवाईला वेग, STचे आणखी 174 संपकरी बडतर्फ; आतापर्यंत घरी पाठवलेल्या कर्मचाऱ्यांचा आकडा किती?
अनिल परब, एसटी कर्मचारी आंदोलन
Follow us
| Updated on: Dec 27, 2021 | 7:28 PM

मुंबई : गेले दीड महिन्यापेक्षा अधिक काळ गाजलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट हाती येते आहे. आज एकूण 174 एसटी कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. तर शुक्रवारी 182 कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं होतं. दरम्यान, आतापर्यंत एकूण 415 संपकरी कर्मचारी बडतर्फ झाले असल्याची माहिती समोर आली आहे.

कारवाईला आणखी वेग

दरम्यान, संपकरी एसी कर्मचाऱ्यांवरील कारवाईला आता अधिक वेग आला आहे. शुक्रवारपर्यंत एकूण 241 एसटी कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं होत. त्यानंतर आलेल्या सलगच्या सुट्ट्यांमुळे ही कारवाई थंड झाली होती. आता पुन्हा या कारवाईला वेग आला असून आज पुन्हा 174 कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं असल्याची माहिती समोर आली आहे.

कारवाई मागे घेणार नाही?

दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यावर करण्यात येत असलेल्या कारवाई कोणत्याही परिस्थिती मागे घेतली जाणार नसल्याचं वक्तव्य परिवहन मंत्री अनिल परब यांनी केलं आहे. त्यामुळे बडतर्फ कर्मचाऱ्यांना दिलासा मिळण्याची आता कोणतीही शक्यता नसल्याचं बोललं जातंय. सुरुवातील निलंबन झालेल्यांना कामावर रुजू होण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. मात्र सरकारच्या आवाहनला संपकरी कर्मचाऱ्यांनी केराची टोपली दाखवली. या काळात जे कर्मचारी कामावर रुजू झाले होते, त्यांच्यावरील कारवाई मागे घेतली गेली आहे. मात्र तरिही अनेकजण संपावर ठाम आहेत. अशांवर निलंबनाची कारवाई केली जाते आहे, अशी माहिती अनिल परब यांनी दिली आहे. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यावर होत असलेली कारवाई मागे घेतली जाणार नाही, असंही त्यांनी म्हटलंय.

इतर बातम्या –

ठाकरे सरकार सत्तेचा दुरुपयोग करतंय, थेट केंद्रीय राज्यमंत्र्यांचा हल्लाबोल; नितेश राणेंची केली पाठराखण

ठरलं! पुढचं अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपुरातच; तारीखही ठरली

Ahmednagar Corona | अहमदनगरमध्ये नवोदय विद्यालयात कोरोनाचा स्फोट, आणखी 20 विद्यार्थ्यांना लागण, एकूण 70 विद्यार्थ्यांवर उपचार सुरु

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.