नाशिक महापालिका निवडणुकीचे पडघम, भाजपकडून उद्घाटनांचा धडाका, शिवसेनेचा आक्षेप

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते येत्या 22 फेब्रुवारीला नाशिकमध्ये 250 कोटी रुपयांची कामं आणि 2 उड्डाणपुलांचं भूमिपूजन होणार आहे.

नाशिक महापालिका निवडणुकीचे पडघम, भाजपकडून उद्घाटनांचा धडाका, शिवसेनेचा आक्षेप
Follow us
| Updated on: Feb 17, 2021 | 6:34 PM

नाशिक : वर्षभरावर येऊन ठेपलेल्या महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपच्या गोटात आता हालचाली वाढल्याचं पाहायला मिळत आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते येत्या 22 फेब्रुवारीला नाशिकमध्ये 250 कोटी रुपयांची कामं आणि 2 उड्डाणपुलांचं भूमिपूजन होणार आहे. दरम्यान, शिवसेनेनं मात्र भाजप आता श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केलाय.(Devendra Fadnavis will inaugurate many works in Nashik)

महापालिका निवडणुकीसाठी आता सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. एकीकडे शिवसेनेनं चौकाचौकात शाखा उद्घाटनाचा धडाका लावला आहे. तर दुसरीकडे भाजपनं आता ‘मौका देख के चौका’ मारण्याचं ठरवलं आहे. याचाच एक भाग म्हणून 22 फेब्रुवारीला देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नाशिकमध्ये 2 उड्डाणपूल आणि अडीचशे कोटी रुपयांच्या कामांचं उद्घाटन होणार आहे.

शिवसेनेकडून मात्र भाजपच्या या उद्घाटन कार्यक्रमावर आक्षेप घेण्यात आला आहे. शिवसेना नगरसेवकांच्या प्रयत्नामुळे होत असलेल्या कामांचं श्रेय लाटण्याचा भाजप प्रयत्न करत असल्याचा आरोप शिवसेनेनं केला आहे. सिडको उड्डाणपुलावरुन यापूर्वीच शिवसेना आणि भाजप आमनेसामने आल्याचं पाहायला मिळालं होतं. मात्र, आता नाशिक भाजपने फडणवीस यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमांची तारीखच जाहीर केली आहे. त्यामुळे आता शिवसेना काय भूमिका घेतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

राष्ट्रवादीची स्वबळाची तयारी

आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी पक्ष संघटन अधिक मजबूत करत कामाला लागावे. तसेच वरिष्ठ पातळीवर काय निर्णय होईल याची वाट न बघता प्रसंगी नाशिक महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचीदेखील तयारी ठेवा, असे आदेश राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना दिले. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत 14 फेब्रुवारी रोजी नाशिक शहरातील राष्ट्रवादी भवन मुंबई नाका येथील कार्यालयात आढावा बैठक पार पडली, यावेळी भुजबळांनी पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत.

नाशिकचा पुढचा महापौर शिवसेनेचा – राऊत

शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुढील नाशिक महापौर शिवसेनेचा होईल, अशी राजकीय भविष्यवाणी केल्यानंतर नाशिकच्या राजकीय वर्तुळात चांगलीच दंगल सुरु झालीय. राऊत कुठल्या जोरावर ही गोष्ट बोलताहेत हीच कल्पना विरोधकांना येत नाहीये. त्यामुळेच राऊतांच्या दाव्याविषयी तर्कवितर्क लावण्यास उधाण आलंय.

तिकडं मनसेही नाशिक मनपा निवडणुकीची कसून तयारी करतेय. भाजपनं मनसेचे अनेक नगरसेवक पळवले. त्यामुळं स्थानिक पातळीवर मनसैनिकांमध्ये भाजपबद्दल रोष आहे. मात्र, असं असलं तरी मनसेची भूमिका कृष्णकुंजवरच ठरणार आहे.

नाशिक मनपामध्ये पक्षीय बलाबल

भाजप – 65 शिवसेना – 35 राष्ट्रवादी – 6 काँग्रेस – 6 मनसे – 6 रिपाई – 1

संबंधित बातम्या :

बाळासाहेब, पवारांचे बोट धरून पुढे आलो; पवारांचे वय मोजू नये: संजय राऊत

नाशिकचा पुढचा महापौर शिवसेनेचाच; संजय राऊतांचा दावा

Devendra Fadnavis will inaugurate many works in Nashik

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.