“बा विठ्ठला, मुख्यमंत्री स्वत: गाडी चालवत मंत्रालयात सुद्धा जाऊदेत”
मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या पंढरपूर (Pandharpur) दौऱ्यावरुन पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.
मुंबई : मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या पंढरपूर (Pandharpur) दौऱ्यावरुन पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री जसे स्वत: गाडी चालवत विठ्ठलाच्या भेटीला आले, तसेच ते स्वत: गाडी चालवत मंत्रालयात सुद्धा जाऊदेत असा टोमणा संदीप देशपांडे यांनी लगावला. देशपांडे यांनी ट्विट करुन हल्लाबोल केला.
संदीप देशपांडे म्हणतात, ” हे बा विठ्ठला जसे आमचे मुख्यमंत्री स्वतः गाडी चालवत तुझ्या भेटीला आले तसेच स्वतः गाडी चालवत मंत्रालयात सुद्धा जाऊदे. आणि जशी तुझी भेट घेतली तशी एकदा जनतेशी पण भेट घेउदे हीच तुझ्या चरणी प्रार्थना. पांडुरंग… पांडुरंग..”
संदीप देशपांडे यांचं ट्विट
हे बा विठ्ठला जसे आमचे मुख्यमंत्री स्वतः गाडी चालवत तुझ्या भेटीला आले तसेच स्वतः गाडी चालवत मंत्रालयात सुद्धा जाऊदे. आणि जशी तुझी भेट घेतली तशी एकदा जनतेशी पण भेट घेउदे हीच तुझ्या चरणी प्रार्थना. पांडुरंग… पांडुरंग..
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) July 20, 2021
मुख्यमंत्री स्वत: ड्रायव्हिंग करत पंढरपुरात
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आषाढी एकादशी निमित्त (Ashadhi Ekadashi 2021) विठ्ठल रुक्मिणीच्या शासकीय पूजेसाठी काल दुपारी पंढरपूरला (Pandharpur) रवाना झाले. काल रात्री 9 च्या सुमारास ते पंढरपुरात दाखल झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या कुटुंबासह मुंबईतील मातोश्री निवासस्थानावरुन दुपारी अडीचच्या सुमारास पंढरपूरकडे रवाना झाले होते. यावेळी ते स्वत: ड्रायव्हिंग करत होते.
शासकीय महापूजा
आषाढी एकादशीनिमित्त (Ashadhi Ekadashi 2021) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी पंढरपुरात पत्नी रश्मी ठाकरे यांच्यासह विठ्ठल-रखुमाईची शासकीय महापूजा केली. यावेळी वर्धा जिल्ह्यातील कोलते दाम्पत्याला महापूजेचा मान मिळाला. पहाटे 3 वाजून 40 मिनिटांनी विठ्ठल-रखुमाई यांची शासकीय महापूजा करण्यात आली.
आषाढी एकादशीनिमित्त महापूजेसाठी वारकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विठ्ठल मंदिरातील विणेकरी केशव शिवदास कोलते (वय 71 वर्ष) आणि इंदुबाई केशव कोलते (वय 60 वर्ष) यांना महापूजा करण्याचा मान मिळाला. केशव कोलते 20 वर्षांपासून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विणेकरी म्हणून सेवा बजावत आहेत.
संबंधित बातम्या
“आमच्या वर्गातला एक मुलगा अभ्यास करायचा नाही, पण नंबर वन यायचा, मुख्यमंत्र्यांचं तसंच आहे”