Eknath Shinde : काशीचा लूक आता चंद्रभागेला, पंढरीचे रुपडे बदलण्यावर मुख्यमंत्र्याचा भर

पंढरपुरात दाखल होताच जागोजागी वारकऱ्यांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वागत केले. या दरम्यानच्या काळात वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरील भाव आपल्याला समजल्याचे त्यांनी सांगितले. आपले रोजचे प्रश्न, दुःख, अडचणी सोडवण्यासाठी आपण कटीबध्द तर आहेच पण सत्ता स्थापनेनंतर ज्या सर्वसामान्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत त्या देखील पूर्ण केल्या जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Eknath Shinde : काशीचा लूक आता चंद्रभागेला, पंढरीचे रुपडे बदलण्यावर मुख्यमंत्र्याचा भर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Follow us
| Updated on: Jul 10, 2022 | 3:50 PM

पंढरपूर :  (CM Eknath Shinde) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय पूजा झाल्यानंतर पंढरपुरातील विकास कामाबाबत त्यांनी वेगवेगळ्या घोषणाही केल्या आहेत. सबंध राज्यात (Pandharpur) पंढरपूरचे महत्व अधिरोखित व्हावे या दृष्टीने वेगवेगळे उपक्रम राबवले जाणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. एवढेच नाही तर पंढरपूरचा एक विशेष आराखडा (Development Plan) विकास आराखडा तयार करण्याच्या सूचना देखील त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तर भविष्यात काशी घाटाप्रमाणेच चंद्रभागेला लूक देण्याचा सरकारचा मानस आहे. त्याअनुशंगाने अनेकांनी माझ्याजवळ इच्छा व्यक्त केली आहे. भविष्यात काशीप्रमाणेच चंद्रभागेचा लूक केला जाणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. पंढरपूर येथील विकास कामाच्या उद्घाटन प्रसंगी त्यांनी पंढरपूरचा आणि चंद्रभागा परिसरातील विकास कामाचा आढावा उपस्थितांसमोर ठेवला.

गरज फक्त विठुरायाच्या आशिर्वादाची

पंढरपुरात वर्षातून दोनवेळा वारकऱ्यांचा मेळा होतो. शिवाय विठ्ठल सर्वासामान्यांच्या मनात आहे. त्यामुळे तीर्थक्षेत्र असलेल्या पंढरपूराचे महत्व अधिक वाढावे या दृष्टीने विकासकामे हाती घेतली जाणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. चंद्रभागेचा विकास आराखडा आम्ही तयार करू आणि याच्यामध्ये पंढरपूरमध्ये एक आमुलाग्र बदल पांडुरंगाच्या आशीर्वादाने नक्की करणार असल्याचे सांगितले आहे. सोलापूर जिल्ह्यासाठी जेवढं काय आपल्याला करता येईल तेवढे केंद्राच्या मदतीने आणि वारकऱ्यांच्या आशिर्वादाने पूर्ण केले जाणार आहेत.

वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरील भावना ओळखल्या

पंढरपुरात दाखल होताच जागोजागी वारकऱ्यांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वागत केले. या दरम्यानच्या काळात वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरील भाव आपल्याला समजल्याचे त्यांनी सांगितले. आपले रोजचे प्रश्न, दुःख, अडचणी सोडवण्यासाठी आपण कटीबध्द तर आहेच पण सत्ता स्थापनेनंतर ज्या सर्वसामान्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत त्या देखील पूर्ण केल्या जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. एकदंरीत सत्ता स्थापन होताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शासकीय पूजा तर झालीच पण विकास कामाबाबच्या आश्वासनाने वारकरीही तृप्त झाला अशाच प्रत्येकाच्या भावना होत्या.

हे सुद्धा वाचा

शासन आणि प्रशासन हेच मुख्य घटक

शासन आणि प्रशासन हे रथाची दोन चाके आहेत. सरकारच्या माध्यमातून योजना राबवल्या जात असल्या तरी शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्याचे काम हे प्रशासकिय अधिकारी करीत असतात. त्यामुळे हा घटक देखील महत्वाचे असल्याचे सांगत मुख्यमंत्री शिंदे यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी शंभरकर यांच्या नियोजनाचे कौतुक केले आहे. सबंध वारीतील नियोजन योग्यरित्या झाले आहे. शिवाय वारकऱ्यांच्या सोई-सुविधांसाठी कुठेही कमतरता राहणार नाही. त्यामुळेचे शासकीय निधीमध्ये वाढ केली असल्याचेही शिंदे यांनी सांगितले आहे.

'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.