LIVE: राज्यभरात भाजपचं मंदिरं सुरु करण्यासाठी घंटानाद आंदोलन, ‘दार उघड, उद्धवा दार उघड’ची घोषणाबाजी

भाविकांना दर्शनासाठी मंदिरं खुली करावीत या मागणीसाठी आज भाजपतर्फे राज्यभरात घंटा नाद आंदोलन करण्यात येत आहे (Live Updates of Ghantanad Andolan Maharashtra).

LIVE: राज्यभरात भाजपचं मंदिरं सुरु करण्यासाठी घंटानाद आंदोलन, 'दार उघड, उद्धवा दार उघड'ची घोषणाबाजी
Follow us
| Updated on: Aug 29, 2020 | 11:53 AM

मुंबई : भाविकांना दर्शनासाठी मंदिरं खुली करावीत या मागणीसाठी आज भाजपतर्फे राज्यभरात घंटा नाद आंदोलन करण्यात येत आहे (Live Updates of Ghantanad Andolan Maharashtra). पुणे, अहमदनगर, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद, बीडमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी मंदिर उघडण्याची मागणी करत घंटानाद आंदोलन केलं. यावेळी ‘दार उघड, उद्धवा दार उघड’ची जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. राज्यात कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे धार्मिक स्थळे उघडण्याची परवानगी नाही. मात्र, भाजपने मंदिरं सुरु करण्याची मागणी लावून धरली आहे.

बीडमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी बालाजी मंदिरचं दार उघडलं आहे. टाळ, मृदंग आणि घंटा वाजवत आंदोलन केलं. आंदोलनात वसुदेवासह भजनी मंडळाचाही सहभाग पाहायला मिळाला. औरंगाबादमध्येही भाजपने घंटानाद आंदोलन सुरु केलं. गजानन महाराज मंदिरासमोर भाजपने आंदोलन केलं. यावेळी भाजपचे असंख्य कार्यकर्ते मंदिरासमोर जमा झाले. भाजप शहराध्यक्ष संजय केनेकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. ‘दार उघड, दार उघड, उद्धवा दार उघड’ अशा घोषणा देत मंदिर उघडण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

कल्याण डोंबिवली

भाजपचे आमदार व माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भाजप पदाधिकाऱ्यांनी डोंबिवली गणेश मंदिरासमोर घंटानाद आंदोलन केलं. संपूर्ण देशात सर्व भागांमध्ये मंदिरात भाविकांना दर्शन सूरु झालेलं आहे. कोरोना संकट काळात भाविकांना मंदिरात प्रवेश बंद होता. मात्र आता कोरोना संकट कमी होऊ लागलं आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र शासनाकडे देवालयात भाविकांना परवानगी द्या, अशी मागणी केली जात आहे. मात्र, शासन हिंदू सणांवर निर्बंध कसे घातले जातील या दृष्टिकोनातून प्रयत्न करत आहे, असा आरोप रवींद्र चव्हाण यांनी केला. या सरकारला हिंदू भाविकांच्या भावना लक्षात याव्यात आणि सरकारला जागे करण्यासाठी आज महाराष्ट्रात जागोजागी घंटानाद आंदोलन छेडण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

पुणे

पुणे भाजपकडून सारसबाग गेटवर घंटानाद आंदोलन करण्यात आलं. भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. भाविकांना दर्शनासाठी राज्यातील मंदिरं खुली करण्याच्या मागणीसाठी भाजपकडून राज्यभरात घंटानाद आंदोलन केले जात आहे.

अहमदनगर

मंदिरं खुली करावीत या‌ मागणीसाठी भाजपने शिर्डीतील साई मंदिराजवळ आंदोलन केलं. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी साई मंदिरचं गेट नंबर 4 बंद केलं. पोलिसांनी या भागात मोठ्या प्रमाणात बंदोबस्तही ठेवला आहे. भाजपच्या या आंदोलनात आमदार राधाकृष्ण विखे, खासदार सुजय विखे यांच्यासह अनेक भाजप कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.

कोल्हापूर

राज्यातील मंदिरं खुली करण्याच्या मागणीसाठी भाजपने करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात आंदोलन केलं आहे.

नाशिक

रामकुंड परिसरात साधू महंत यांनी घंटानाद आंदोलन करत मंदिरं खुले करण्याची मागणी केली आहे. या आंदोलनात राज्यातील मंदिरं सुरु करण्याची मागणी करत अनेक साधू, महंत, पुरोहित संघाचे पदाधिकारी सहभागी झाले. ‘उध्दवा अजब तुझे सरकार, कधी उघडतो मंदिरांचे द्वार’ अशी घोषणा देत आंदोलक सरकारचा निषेध करत आहेत.

नागपूर 

नागपूर जिल्ह्यात भाजपने घंटानाद आंदोलन करत मंदिरं खुली करण्याची मागणी. हे आंदोलन प्रसिद्ध कोराडी मंदिर येथे झाले. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी ‘उद्धवा दार उघड’च्या घोषणाही दिल्या. भाजप प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळेंच्या नेतृत्त्वात हे आंदोलन झालं.

वाशिम

वाशिम जिल्ह्यातील कामरगाव येथे भारतीय जनता पार्टी आणि वारकरी समुदाय (कामरगाव) यांच्या संयुक्त विद्यमाने गजानन महाराज मंदिर येथे घंटानाद आंदोलन करण्यात आले.

संबंधित व्हिडीओ :

हेही वाचा :

CBI Inquiry | आठव्या दिवशी रियाचा सीबीआयशी सामना, चौकशीत नेमकं काय झालं?

मुंबईत आईस्क्रीम विक्री, मीडिया हाऊस ते चित्रपट निर्मिती, सुशांत प्रकरणाशी संदीप सिंहचा संबंध काय?

Rhea Chakraborty | सुशांतला मानसिक आजार, तो नेहमी मॅरिजुआना ड्रग्ज घ्यायचा – रिया चक्रवर्ती

Live Updates of Ghantanad Andolan Maharashtra

...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत.
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.