VIDEO : खोतकर-दानवे वादाचा लाईव्ह व्हिडीओ

जालना : जालना जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या ‘खोतकर-दानवे’ वाद तुफान गाजत आहे. शिवसेनेचे मंत्री अर्जुन खोतकर आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दाने यांच्यातील वाद एव्हाना जगजाहीर आहे. दानवेंना लोकसभा निवडणुकीत पराभवाची धूळ चारण्यासाठी खोतकरांनी शड्डू ठोकला आहे. त्यामुळे शिवसेना-भाजप युतीमध्ये सध्या खळबळ उडाली आहे. या सर्व वादाची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचं शिष्टमंडळ […]

VIDEO : खोतकर-दानवे वादाचा लाईव्ह व्हिडीओ
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:21 PM

जालना : जालना जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या ‘खोतकर-दानवे’ वाद तुफान गाजत आहे. शिवसेनेचे मंत्री अर्जुन खोतकर आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दाने यांच्यातील वाद एव्हाना जगजाहीर आहे. दानवेंना लोकसभा निवडणुकीत पराभवाची धूळ चारण्यासाठी खोतकरांनी शड्डू ठोकला आहे. त्यामुळे शिवसेना-भाजप युतीमध्ये सध्या खळबळ उडाली आहे. या सर्व वादाची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचं शिष्टमंडळ खोतकरांची समजूत काढण्यासाठी खोतकरांच्या जालन्यातील घरी पाठवलं. या शिष्टमंडळात दानवे होते. त्यामुळे खोतकरांच्या घराबाहेरही ‘खोतकर-दानवे’ वादाचा एक अंक पाहायला मिळाला.

खोतकरांच्या घराबाहरे नेमकं काय झालं?

नाराज असलेले शिवसेनेचे नेते आणि मंत्री अर्जुन खोतकर यांची नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी एक शिष्टमंडळ खोतकरांच्या घरी पाठवलं. सहकारमंत्री सुभाष देशमुख आणि रावसाहेब दानवे हे या शिष्टमंडळात होते. हे शिष्टमंडळ आज सकाळीच खोतकरांच्या जालन्यातील घरात गेले. यावेळी देशमुख आणि दानवेंच्या स्वागतासाठी स्वत: अर्जुन खोतकर घराबाहेर आले. मात्र, तिथे काहीसं वेगळंच घडलं.

दानवे आणि देशमुख गाडीतून उतरल्यावर दानवे पुढे आले. खोतकरही त्याचवेळी घराबाहेर आले. खोतकर आणि दानवेंनी एकमेकांकडे काही सेकंद पाहिले आणि निसटता नमस्कार केला. दानवे पुढे कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी गेले आणि खोतकरांनी पुढे येत सुभाष देशमुखांची गळाभेट घेतली. यावेळी खोतकरांनी दानवेंची गळाभेट घेतली नाही. किंबहुना, अगदीच औपचारिकता म्हणून नमस्कार केला. त्यामुळे पुन्हा एकदा ‘खोतकर-दानवे’ वादाचा अंक पाहावयास मिळाला.

पाहा ‘खोतकर-दानवे’ वादाचा लाईव्ह व्हिडीओ :

वाद काय आहे?

जालना जिल्ह्यात शिवसेना नेते अर्जुन खोतकर विरुद्ध भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हा वाद जुना आहे. त्यात खोतकरांनी लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र, आधी स्वबळाची भाषा करणाऱ्या शिवसेनेने ऐनवेळी कच खाल्ली आणि भाजपसोबत सलगी करत युती केली. त्यामुळे खोतकरांच्या इच्छेवर पाणी फेरण्याची लक्षणं दिसून लागली. मात्र, दानवेंविरोधात आपण लढणारच, अशी ताठर भूमिका खोतकरांनी घेतली.

खोतकरांच्या नाराजीचा भाजपला धसका, दानवेंसह सहकारमंत्री भेटीला

गेल्या काही दिवसात अर्जुन खोतकर यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांची दोनदा भेट घेतली, त्यानंतर कालच खोतकरांनी काँग्रेसचे सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांच्याशी जवळपास तासभर बंद दाराआड चर्चा केली. त्यामुळे खोतकर काँग्रेसचा ‘हात’ पकडणार का, अशीही जालन्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. हेच लक्षात घेऊन आता भाजपने हातपाय हलवायला सुरुवात केली आहे.

एकीकडे खोतकर-सत्तार गुफ्तगू, दुसरीकडे दानवे-टोपे गळाभेट

भाजपने खोतकरांची नाराजी दूर केली नाही, तर जालना लोकसभा मतदारसंघातून रावासाहेब दानवे यांना खोतकरांच्या रुपाने तगडं आव्हान उभं राहण्याची दाट शक्यता आहे. ही शक्यता ओळखूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भाजपचं शिष्टमंडळ खोतकरांच्या भेटीला पाठवलं आहे. यात स्वत: रावसाहेब दानवेही असल्याने या भेटीत नेमके काय होणार, याकडे जालन्यासह संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.