‘लोकसभेनंतर राज ठाकरे आणि अजित पवार महायुतीतून बाहेर पडणार’, प्रसिद्ध ज्योतिषाचं भाकीत

"लोकसभा निवडणुकीत एनडीएला 325 ते 350 जागा मिळतील. महाराष्ट्रात महायुतीला 37 ते 40 जागा मिळतील. उर्वरित जागा महाविकास आघाडीला जातील", असं भाकीत प्रसिद्ध ज्योतिषाने वर्तवलं आहे.

'लोकसभेनंतर राज ठाकरे आणि अजित पवार महायुतीतून बाहेर पडणार', प्रसिद्ध ज्योतिषाचं भाकीत
अजित पवार आणि राज ठाकरे यांचा फोटो
Follow us
| Updated on: May 27, 2024 | 9:57 PM

प्रसिद्ध ज्योतिषी अनिल थत्ते यांनी महाराष्ट्राच्या राजकारणबाबत आगामी काळात काय-काय घडामोडी घडू शकतात? याबाबत अनेक मोठे भाकीतं केली आहेत. देशात लोकसभा निवडणुकीत कुणाला सर्वाधिक जागा मिळतील, केंद्रात कुणाचं सरकार बनेल? तसेच लोकसभेत महाविकास आघाडी की महायुतीला सर्वाधिक जागा मिळतील? याबाबत अनेक भाकीतं वर्तवली आहे. अनिल थत्ते यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पक्षाबद्दल अतिशय मोठं भाकीत वर्तवलं आहे. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिला. राज ठाकरे यांनी महायुतीच्या उमेदवारांसाठी काही ठिकाणी सभादेखील घेतल्या. पण लोकसभा निवडणुकीनंतर राज ठाकरे महायुतीतून बाहेर पडतील. फक्त राज ठाकरे हेच नाही तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील महायुतीतून बाहेर पडणार, असं भाकीत अनिल थत्ते यांनी वर्तवलं आहे.

“राज ठाकरे महायुतीतून बाहेर पडतील. अजितदादाही महायुतीतून बाहेर पडतील. राज ठाकरे यांचं आत्तापर्यंत कोणाशी पटले नाही. त्यामुळे आताही यांच्याशी पटणार नाही. ठाणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत देखील राज ठाकरेंनी अभिजीत पानसेंना उभं केलं आहे. दोघेही माघार घेणार नाहीत. तिथेच महायुतीत फूट पडली आहे. लोकसभेसाठी मनसे महायुतीत राहील. त्यानंतर ते महायुतीत राहणार नाहीत”, अशी भविष्यवाणी अनिल थत्ते यांनी वर्तवली आहे.

एनडीएला किती जागा मिळणार?

“लोकसभा निवडणुकीत एनडीएला 325 ते 350 जागा मिळतील. महाराष्ट्रात महायुतीला 37 ते 40 जागा मिळतील. उर्वरित जागा महाविकास आघाडीला जातील”, असं भाकीत अनिल थत्ते यांनी वर्तवलं. “मोदींना दोन तृतीयांश बहुमत मिळेल. 2029 ला ही उमेदवार पुन्हा तेच असतील, असेही वाटते. 75 वय वगैरे सगळे इतरांकरता आहे. त्यांच्यासाठी नाही. 407 जागा मिळवण्यासाठी ते इतर पक्ष ही फोडू शकतात. देश हुकूमशाहीकडे जाईल असं मला वाटत नाही”, असं अनिल थत्ते म्हणाले. “अजित दादांना एकही सीट मिळणार नाही”, असा देखील दावा अनिल थत्ते यांनी केला.

‘ठाकरे-पवारांच्या पाठीमागे सहानुभूती’

“श्रीराम मंदिराचा मुद्दा देखील मला वाटत होतं की इलेक्शन होईपर्यंत वातावरण चैतन्यमय ठेवेल. मात्र हा मुद्दा कुठेतरी विरला. सहानुभूती नक्की मिळाली. अजित पवारांना शरद पवारांनी सगळं दिलं. मात्र असं असताना देखील अजित पवारांनी शरद पवार यांना धक्का दिला. वडिलधाऱ्या माणसांना त्यांनी या वयात छळलं. तर बाळासाहेबांचा वारसा हा उद्धव ठाकरेंकडेच आहे. त्यांना धक्का देणे हे देखील अत्यंत चुकीचे आहे. त्यामुळे सहानभूती त्यांच्याबद्दल देखील आहे”, असा दावा अनिल थत्ते यांनी केला.

“वंचित आघाडीची क्रेडीबिलिटी घालवण्याचे काम प्रकाश आंबेडकरांनी केलं. त्यांनी पहिल्यापासून कोलांटी उड्या मारण्याचे काम केलं. पहिल्यापासूनच ते आघाडीमध्ये जाण्यासाठी उत्सुक नव्हते. केवळ त्यांनी बहाणे शोधले”, असं वक्तव्य अनिल थत्ते यांनी केलं.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.