Baramati Election | …तर सुनेत्रा पवारच बारामतीमधून उमेदवार, TV 9 च्या कार्यक्रमात सुनील तटकरेंच मोठ विधान

Baramati Election | बारामतीमध्ये यंदा नणंद विरुद्ध भावजय असा सामना रंगू शकतो अशी चर्चा आहे. त्या संबंधी बोलताना सुनील तटकरे यांनी महत्त्वाच भाष्य केलं आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार कोण असणार? या बद्दल सुनील तटकरे यांनी मोठ विधान केलं.

Baramati Election | ...तर सुनेत्रा पवारच बारामतीमधून उमेदवार, TV 9 च्या कार्यक्रमात सुनील तटकरेंच मोठ विधान
Sunil Tatkare
Follow us
| Updated on: Mar 01, 2024 | 3:07 PM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीबद्दल महत्त्वाच भाष्य केलं आहे. बारामतीमध्ये यंदा नणंद विरुद्ध भावजय असा सामना रंगू शकतो अशी चर्चा आहे. टीव्ही 9 मराठीच्या लोकसभेचा महासंग्राम या कार्यक्रमात बोलताना सुनील तटकरे यांनी बारामतीमधून उमेदवार कोण असणार? या बद्दल महत्त्वाच विधान केलं. बारामती लोकसभा मतदरासंघात सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा सामना रंगणार असल्याची चर्चा आहे. दोन्ही बाजूंनी जोरदार तयारी सुरु आहे. जनसंपर्क मेळावे, उद्घाटन कार्यक्रम सुरु आहेत. बारामतीमध्ये यंदा पवार विरुद्ध पवार असा सामना रंगू शकतो. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अत्यंत महत्त्वाच विधान केलय. त्यावरुन पुढच बरचस चित्र स्पष्ट होणार आहे.

सुनेत्रा पवार बारामतीमधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार असतील, असं सुनील तटकरे म्हणाले. पण या बद्दल अंतिम निर्णय जागावाटप जाहीर झाल्यानंतरच होईल असही त्यांनी स्पष्ट केलं. लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या जागावाटपाबद्दल अजून अंतिम निर्णय झालेला नाही. पण बारामतीची जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आली तर सुनेत्रा पवारच उमेदवार असतील असं सुनील तटकरे यांनी सांगितलं. “आम्ही बारामतीची जागा महायुती म्हणून लढणार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा आणि शिवसेना एकत्रित बसून निर्णय घेऊ. महायुतीमधून बारामतीची जागा आमच्याकडे येईल अशी अपेक्षा आहे” असं सुनील तटकरे यांनी सांगितलं.

गैरसमज निर्माण होऊ नये, म्हणून सुनील तटकरे काय म्हणाले?

“अजून चर्चा झालेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस बारामतीची जागा लढणार असेल, तर सुनेत्रा पवार पक्षाकडून अधिकृत उमेदवार असतील” असं सुनील तटकरे म्हणाले. “महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघांपैकी सर्वांच लक्ष बारामती मतदारसंघावर आहे. भाजपा, शिवसेनेला विचारात न घेता प्रदेशाध्यक्षांनी बारामतीमधून उमेदवारी जाहीर केली, असं म्हटलं जाईल. पण असं नाहीय. महायुती म्हणून आम्ही मनाने एकत्रित आहोत. आमच्यात कुठलाही संभ्रम नाही. आमचे हितचिंतक दुर्बीण घेऊन बसले आहेत. एका वाक्याचा आधार घेऊन आमच्यात गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न होईल. पण असं नाहीय. महायुती म्हणून जागा वाटप ठरलं. बारामतीची जागा राष्ट्रवादीकडे आली, तर सुनेत्रा पवार उमेदवार असतील” असं सुनील तटकरे यांनी सांगितलं.

अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.