Loksabha Election 2024 | ‘या’ काँग्रेस नेत्याच्या मुलीमुळे रक्षा खडसे यांचा लोकसभा निवडणुकीला पत्ता कट होणार?

Loksabha Election 2024 | आगामी लोकसभा निवडणूक 2024 मध्ये अनेक नवीन समीकरण आकाराला येणार आहेत. जिल्ह्याच्या राजकारणात काही प्रस्थापित पायंडे बदलू शकतात. महाराष्ट्रात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना आहे. मागच्या पाच वर्षात महाराष्ट्राच्या राजकराणात अनेक धक्कादायक बदल झाले आहेत, ज्याची कल्पनाही कोणी केली नव्हती.

Loksabha Election 2024 |  'या' काँग्रेस नेत्याच्या मुलीमुळे रक्षा खडसे यांचा लोकसभा निवडणुकीला पत्ता कट होणार?
raksha khadseImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jan 11, 2024 | 10:47 AM

रवी गोरे, जळगाव : 11 जानेवारी 2024 |

Loksabha Election 2024 | सध्या सर्वच पक्ष लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी करत आहेत. प्रत्येक पक्षाकडून उमेदवाराची चाचपणी सुरु आहे. पुढच्या काही महिन्यात जिल्ह्याच्या राजकारणात समीकरण बदलेली दिसू शकतात. काही नवीन समीकरण आकाराला येऊ शकतात. महाराष्ट्रात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना आहे. मविआमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि ठाकरे गट आहे. महायुतीमध्ये भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) आहे. महाराष्ट्रात यंदा लोकसभा निवडणूक चुरशीची होणार, यात अजिबात शंका नाही. कारण शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली असून दोन्ही पक्षांमधील प्रमुख नेते भाजपासोबत सरकारमध्ये सहभागी आहेत. त्यामुळे यंदाच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत बरीच समीकरण बदलू शकतात. ही निवडणूक म्हणजे काही नेत्यांसाठी राजकीय अस्तित्वाची लढाई ठरणार आहे.

जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभेची जागा नेहमीच चर्चेत असते. सध्या रावेर लोकसभा मतदारसंघातून एकनाथ खडसे यांची सून रक्षा खडसे खासदार आहे. सध्या एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार गटासोबत आहेत. रक्षा खडसे या भाजपामध्येच आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने रक्षा खडसे यांच्यासाठी चिंता वाढवणारी बातमी आहे. काँग्रेसचे रावेर लोकसभेचे माजी खासदार उल्हास पाटील यांची कन्या केतकी पाटील भाजपमध्ये वाटेवर असल्याची सूत्रांची माहिती आहे. केतकी पाटील भाजपमध्ये गेल्यास एकनाथ खडसे यांच्या सून विद्यमान खासदार रक्षा खडसेंचा पत्ता कट होणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.

केतकी पाटील काय म्हणाल्या?

या चर्चांवर केतकी पाटील यांनी स्पष्टीकरण दिलय. “अद्यापपर्यंत माझा निर्णय मी स्पष्ट केलेला नाही. मी भाजपच्या लोकांनाही आणि काँग्रेसच्या लोकांनाही भेटली. रावेर लोकसभा क्षेत्रात माझं वाढतं काम पाहून ही चर्चा रंगत आहे. कोणत्या पक्षात जायच हा निर्णय मी स्वत: सांगेन” असं केतकी म्हणाल्या.

एकनाथ खडसे काय म्हणाले?

“केतकी पाटील ह्या दोन चार दिवसात भाजपमध्ये प्रवेश करतील अशी माझी माहिती आहे. त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे. त्यांचे वडील उल्हास पाटील हे जन्मापासून काँग्रेसच्या विचारांचे आहेत, त्यांनी काँग्रेसचे विचार सर्वत्र पसरवले” असं एकनाथ खडसे म्हणाले. “केतकी पाटील भाजपमध्ये जावो किंवा रक्षा खडसे भाजपमध्ये राहोत. कोणाला कुठेही जाऊदे, माझी एकच भूमिका आहे, पक्षाने मला आदेश दिले तर मी लोकसभा लढवणार आहे” असं एकनाथ खडसे म्हणाले.

रक्षा खडसे म्हणाल्या?

“दोन टर्मपासून रावेर लोकसभेच नेतृत्व करत आहे. पक्षाने पुन्हा संधी दिली तर तिसऱ्यांदा जनतेच्या सेवेत राहणार. पक्षाने संधी दिली तर मी पुन्हा उमेदवार असणार” असं रक्षा खडसे म्हणाल्या.

Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'.
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?.
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक.
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!.
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?.
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख.
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले.
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?.
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'.
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्...
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्....