बेळगावमध्ये निवडून आलेले पेडणेकर, जाधव, कांबळे, धोत्रे, पाटील हे मराठी माणसं वाटत नाही का?; पडळकरांचा राऊतांना सवाल
गोपीचंद पडळकर म्हणाले, "संजय राऊतांना बेळगावमध्ये निवडून आलेले संतोष पेडणेकर, जयंत जाधव, सविता कांबळे, रवी धोत्रे, रेश्मा पाटील असे अनेक मराठी माणसं वाटत नाहीत का? कारण काय तर ते म्हणे ते शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आले नाहीत, म्हणून ते मराठीच राहिले नाहीत का? मराठी माणसाचा एवढा आकस?"
मुंबई : बेळगाव महापालिकेवरुन (Belgaum ) भाजपवर हल्लाबोल करणाऱ्या खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी घणाघात केला. शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आले नाहीत म्हणून ते मराठीच राहिले नाहीत का ? मराठी माणसाचा एवढा आकस का? असे प्रश्न गोपीचंद पडळकर यांनी विचारले आहेत. मराठी माणूस हरल्यावर पेढे वाटता, लाज वाटत नाही, असा संताप बेळगावच्या भाजपच्या विजयावर संजय राऊतांनी व्यक्त केला होता. त्याला पडळकरांनी उत्तर दिलं.
गोपीचंद पडळकर म्हणाले, “संजय राऊतांना बेळगावमध्ये निवडून आलेले संतोष पेडणेकर, जयंत जाधव, सविता कांबळे, रवी धोत्रे, रेश्मा पाटील असे अनेक मराठी माणसं वाटत नाहीत का? कारण काय तर ते म्हणे ते शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आले नाहीत, म्हणून ते मराठीच राहिले नाहीत का? मराठी माणसाचा एवढा आकस?”
तुम्ही मराठी माणसाच्या पाठीत खंजीर खुपसला
महाराष्ट्राच्या मतदाराने युतीला बहुमत दिले. पण नंतर तुम्ही मराठी माणसाच्या पाठीत खंजीर खुपसला. पाकिस्तानचे आणि कलम 370 चे गोडवे गाणाऱ्यांसोबत सत्तेचा मेवा तुम्ही खाताय. हे बेळगावलाच नाहीतर अखंड हिंदुस्थानाला समजले आहे. दिल्लीतल्या मॅडमला आणि युवराजांना सत्तेसाठी खुश करण्यासाठी तुम्ही वारकऱ्यांना गुन्हेगार ठरवून मराठीजणांचा सन्मान असलेल्या वारीवर दंडुकशाहीचा वापर केला, असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला.
वारकऱ्यांच्या खांद्यावरून भगवा पताका उतरवला. त्यांचाच शाप आणि तळतळाट तुम्हाला आता इथूनपुढेही भोगावा लागणार आहे. किंबहुना आपला पराभव म्हणजे बेळगावच्या मराठी माणसाने तुमच्या 15 कोटीच्या ‘पेंग्वीन’ विकासाचं मॉडेल नाकारले आहे. हिंदू सण आले की तुम्ही निर्बंध लादता आणि इतरांचा सणासुदीला सत्तेसाठी मुजरे करता अशा तुमच्या पाखंडी वृत्तीचा बुरखा फाटलाय आणि तुमचा खरा चेहरा प्रत्येक हिंदूच्या पुढे उजळून आलाय, असा हल्लाबोल पडळकर यांनी केला.
VIDEO :
संबंधित बातम्या
मराठी माणूस हरल्यावर पेढे वाटता, लाज वाटत नाही, बेळगावच्या भाजपच्या विजयावर राऊतांचा संताप