MP Election Exit Poll Result : मध्यप्रदेशात काँग्रेसला बहुमत, भाजपचा मोठा पराभव; एक्झिट पोलच्या कौलने भल्यभल्यांना झटका

Madhya Pradesh Election Exit Poll Result 2023 : मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीचा एक्झिट पोल जाहीर झाला आहे. या एक्झिटपोलनुसार मध्यप्रदेशात काँग्रेसला बहुमत मिळणार असल्याचं स्पष्ट दिसून येत आहे. तर भाजपची सत्ता जाताना दिसत आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपसाठी हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.

MP Election Exit Poll Result : मध्यप्रदेशात काँग्रेसला बहुमत, भाजपचा मोठा पराभव; एक्झिट पोलच्या कौलने भल्यभल्यांना झटका
Follow us
| Updated on: Nov 30, 2023 | 6:21 PM

भोपाळ | 30 नोव्हेंबर 2023 : मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीचा एक्झिट पोल जाहीर झाला आहे. या एक्झिटपोलनुसार मध्यप्रदेशात काँग्रेसला बहुमत मिळणार असल्याचं स्पष्ट दिसून येत आहे. त्यामुळे भाजपला मोठा धक्का बसताना दिसत आहे. मात्र, हे एक्झिटपोलचे अंदाज आहेत. प्रत्यक्ष 3 डिसेंबर रोजी मतमोजणी सुरू होईल तेव्हाच राज्याचं खरं चित्र समोर येणार आहे. मध्यप्रदेशात 230 जागांसाठी मतदान झालं होतं. मध्यप्रदेशात भाजपचं सरकार गेल्यास त्याचं फार मोठं नुकसान भाजपला होणार आहे. या निकालाचा परिणाम लोकसभा निवडणुकीवर होताना दिसणार आहे.

मध्यप्रदेश विधानसभा निवडणूक निकाल 2023 : एक्झिट पोलचे अंदाज काय?

1) पोल स्टेट एक्झिट पोल

काँग्रेस – 111-121 भाजप – 106-116

2 ) इंडिया टुडे – अ‍ॅक्सिस माय इंडिया एक्झिट पोल (India Today-Axis My India exit poll)

काँग्रेस – 97-107 भाजप – 118-130

3) झी न्यूज एक्झिट पोल

काँग्रेस – 111-121 भाजप – 106-116

4) जन की बात

काँग्रेस – 102-125 भाजप – 100-123

5) रिपब्लिक – मॅट्रीज (Republic TV-P-Marq)

काँग्रेस – 118-130 भाजप – 97-107

6) सीएनएक्स

काँग्रेस- 111

भाजप- 116

हवा बदलतेय?

पोल ऑफ पोलमध्ये काँग्रेसला बहुमत मिळताना दिसत असलं तरी भाजपलाही चांगलं यश मिळालेलं दिसत आहे. भाजपला बहुमतासाठी फक्त दहा बारा जागा कमी पडताना दिसत आहेत. सर्व्हेच्यानुसार 45 टक्के मते काँग्रेसच्या खात्यात गेली आहेत. त्यामुळे काँग्रेसला मोठा फायदा होताना दिसत आहे. 8 हजार मतदारांचा सर्व्हे करून हा पोल ऑफ पोल जाहीर करणअयात आला आहे. त्यानुसार 48 टक्के पुरुष व्होटर्स काँग्रेसच्या बाजूने असल्याचं दिसत आहे. तर 43 टक्के महिला मतदारही काँग्रेसच्या बाजूने असल्याचं दिसून येत आहे. म्हणजेच लोकसभा निवडणुकीपूर्वी देशाची हवा बदलताना दिसत असून भाजपसाठी ही धोक्याची घंटा असल्याचं दिसून येत आहे.

काँग्रेसची मुसंडी

पोल स्टेट एक्झिट पोलनुसार काँग्रेसला 45.6 टक्के मते मिळाली होती. तर भाजपला 43.3 टक्के मते मिळाली होती. फक्त दोन टक्के मतांचा दोन्ही पक्षात अंतर आहे. मात्र, राज्यातील अनेक भागात काँग्रेसला एकगठ्ठा मते मिळाल्याने काँग्रेसने मुसंडी मारली आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.