महाविकास आघाडी सरकार कधी कोसळेल ते कळणारही नाही, प्रवीण दरेकरांचा दावा
भाजप नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मोठं विधान केलं आहे. सह्याद्री अतिथीगृहातील स्लॅब कोसळला. (maha vikas aghadi government will ever fall, says pravin darekar)
मुंबई: भाजप नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मोठं विधान केलं आहे. सह्याद्री अतिथीगृहातील स्लॅब कोसळला. तसं राज्यातील आघाडी सरकार कधीही कोसळले. तेही कळणार नाही. तसे संकेत आहेत, असा दावा प्रवीण दरेकर यांनी केला आहे. दरेकर यांनी हा बॉम्बगोळा टाकल्याने एकच खळबळ उडाली आहे. (maha vikas aghadi government will ever fall, says pravin darekar)
मीडियाशी बोलताना प्रवीण दरेकर यांनी हा दावा केला आहे. काल सह्याद्री अतिथीगृहाचा स्लॅब कोसळला होता. त्याबाबत विचारलं असता दरेकर यांनी ही कोटी करत दावा केला. सह्याद्रीचा स्लॅब कोसळला आहे. स्लॅब कोसळतो आणि सरकारला माहीतही पडत नाही. तसंच हे सरकार कधीही कोसळेल. ते कळणारही नाही. तसे संकेत आहेत, असं सांगतानाच देवेंद्र फडणवीस पाच वर्षे मुख्यमंत्री राहिले आहेत. राज्यात त्यांना आणि भाजपला मोठा जनाधार आहे. त्यामुळे आम्हाला फ्रस्टेशन कशाचं असेल? फ्रस्टेशन फक्त सत्ताधाऱ्यांच्या चेहऱ्यावर आहे, असं दरेकर म्हणाले.
मंदिर उघडण्याचं मनोधैर्य नाही
राज्यात 18 जिल्ह्यांमध्ये अनलॉक करण्यात आलं आहे. त्यावरही त्यांनी मत व्यक्त केलं. अनलॉकबाबत काढण्यात आलेलं परिपत्रक ढोबळ पद्धतीने काढलं आहे. त्यात जिल्ह्यांबाबतचे निकष दिसत नाहीत, असं सांगतानाच मंदिर उघडण्याबाबतची सरकारची भूमिका विरोधी आहे. मंदिर उघडण्यासाठी सरकारचं मनोधैर्य का होत नाही?, असा सवाल त्यांनी केला. वारकरी आणि मंदिर या प्रश्नावर सरकारची अनास्था दिसते. सरकारने झोपेचे सोंग घेतले आहे. सरकारकडून मेळावे घेतले जातात. वारकरी संप्रदाय असेल किंवा मंदिर असेल यांचा प्रश्न आला की नियम दाखवले जातात, असा आरोपही त्यांनी केला.
पालिकेने विश्वासहार्यता गमावली का?
महापालिकेच्या ग्लोबल टेंडरवरून त्यांनी पालिकेवर टीका केली. ग्लोबल टेंडर रद्द झालं आहे. त्यामुळे महापालिकेच्या विश्वासहार्यतेवर प्रश्नचिन्हं निर्माण झाला आहे का? असा सवाल करतानाच निविदा प्रक्रियाते चांगल्या कंपन्या येणे अपेक्षित होते, असंही ते म्हणाले. (maha vikas aghadi government will ever fall, says pravin darekar)
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 5 June 2021 https://t.co/KMFf4j8nrh #News #Bulletin #Maharashtra
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 5, 2021
संबंधित बातम्या:
शंभर टक्के सांगतो ‘ती’ चूकच होती, पण…; पहाटेच्या ‘त्या’ शपथविधीवर देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
देशाची अर्थव्यवस्था मोजण्यात गव्हर्नर अपयशी ठरले तर संपूर्ण अर्थव्यवस्थाच कोलमडेल: राष्ट्रवादी
राज-उद्धव एकत्र येणार का, राज म्हणाले परमेश्वराला ठाऊक, आता संजय राऊतांचं मोठं विधान
(maha vikas aghadi government will ever fall, says pravin darekar)