MVA Sangli : अखेर महाविकास आघाडीत ठरलं, सांगलीमधून लोकसभेची निवडणूक कोण लढणार?
MVA Sangli : सांगलीच्या जागेवर ठाकरे गटाने परस्पर उमेदवार जाहीर केल्याने वातावरण तापलं होतं. ठाकरे गटाने सांगलीच्या जागेवर चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. प्रत्यक्षात इथे ग्राऊंड लेव्हलवर काँग्रेसची ताकद आहे. सांगली जिल्ह्यात पंचायत समित्यांपासून जिल्हा परिषदेत काँग्रेसची ताकद आहे.
आज गुढी पाडव्याच्या निमित्ताने महाविकास आघाडीची पत्रकार परिषद होत आहे. या पत्रकार परिषदेला ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, शरद पवार काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण उपस्थित आहेत. पत्रकार परिषदेला सुरुवात करताना जयंत पाटील यांनी मविआच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. त्यानंतर माईक संजय राऊत यांच्याकडे सोपवला. संजय राऊत यांनी महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस कुठल्या जागांवर लढणार ते वाचून दाखवलं. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस एकूण 17 जागांवर लढणार असल्यात त्यांनी सांगितलं. यात सांगलीच्या जागेवरुन महाविकास आघाडीमध्ये मोठा वाद झालेला. उद्धव ठाकरे यांनी घटक पक्षांना विश्वासात न घेता उमेदवारी जाहीर केल्याचा आरोप झाला होता. त्यावरुन महाविकास आघाडीत आरोप-प्रत्यारोप सुद्धा झालेत.
सांगलीच्या जागेवर ठाकरे गटाने परस्पर उमेदवार जाहीर केल्याने वातावरण तापलं होतं. ठाकरे गटाने सांगलीच्या जागेवर चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. प्रत्यक्षात इथे ग्राऊंड लेव्हलवर काँग्रेसची ताकद आहे. सांगली जिल्ह्यात पंचायत समित्यांपासून जिल्हा परिषदेत काँग्रेसची ताकद आहे. काँग्रेसचे आमदार या जिल्ह्यात आहेत. सहकाराच मोठ जाळ काँग्रेसने इथे उभारलं आहे. त्यामुळे काँग्रेस नेते विश्वजीत कदम, विशाल पाटील नाराज झाले. त्यांनी दिल्लीला जाऊन काँग्रेस हायकमांडची भेट घेतली. संजय राऊत नुकतेच तीन दिवसांच्या सांगली दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी जिल्ह्यातील काँग्रेस नेते आणि त्यांच्यामध्ये शाब्दीक कलगीतुरा रंगला होता.
काय निकाल लागला?
अखेर या जागेचा निकाल लागला आहे. सांगलीची जागा ठाकरे गटाच्या वाट्याला गेली आहे. सांगलीतून उद्धव ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील उमेदवार असणार आहेत. फक्त आता ग्राऊंड लेव्हलवर त्यांना काँग्रेसकडून कसं सहकार्य मिळतं, त्यावर बरच काही अवलंबून आहे. सांगली जिल्ह्यातून सध्या भाजपाचे संजय काका पाटील खासदार आहेत. मागच्या दोन टर्मपासून तेच खासदार आहेत. मोदींचा पराभूत करण हेच लक्ष्य आहे, असं मविआमधले नेते सांगतायत. पण स्थानिक पातळीवरील या नाराजीचा महायुतीला फायदा होऊ शकतो.